* डॉ. शोभा गुप्ता, मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटर, आयव्हीएफ तज्ज्ञ
प्रश्न : माझं वय ३८ वर्षं आहे. माझं वजन ५५ किलो आहे. मी एंडोमिट्रीयममध्ये तापमानांसंबंधित पीसीआर तपासणी केली आहे. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आहे. मी गेल्या ३ महिन्यांपासून रह्यूमेटोइड घेत आहे. गेल्या महिन्यात माझं आयव्हीएफ अयशस्वी झालं होतं. आणखी एक आयव्हीएफ होऊ शकतं का आणि माझ्या पतीने मायकोबॅक्टीरियम तपासणी करावी का?
उत्तर : तुमचं वय वाढत आहे. ३५ व्या वर्षांनंतर महिलांमध्ये अंडाशयाची गुणवत्ता खालावत जाते. शिवाय तुमची पीसीआर तपासणीही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तुम्ही आयव्हीएफची पुढची तपासणी करून घेऊ शकता. पण हिस्टेरोस्कोपीच्या मदतीने गर्भाशयाचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. आयव्हीएफ अयशस्वी होण्याचे कारण एएमएचं मूल्य आणि इंट्रालिपिड इन्फ्यूजनच्या मदतीने प्रत्यारोपणाच्या सुधारणेतील यशाच्या दरात वाढ होत आहे की नाही हे जाणून घेणं आवश्यक आहे. पतीमध्ये तापाची लक्षणं असतील तर त्यांचीही तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
प्रश्न : माझं वय ३० वर्षं आहे. लग्नाला २ वर्षं झाली आहेत. लग्नानंतर मी गर्भधारण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी लग्नाआधी गर्भपात करून घेतला होता. त्यानंतर माझी पाळी अनियमित झाली आहे आणि पाळीमध्ये रक्तस्त्रावही कमी होतो. मी काय करू सांगा?
उत्तर : पाळीदरम्यान रक्तस्त्राव कमी होण्याची बरीच कारणं असू शकतात. कारण जाणून घेण्यासाठी प्राथमिक परीक्षण म्हणून तुमच्या पॅल्विकचं अल्ट्रासाउंड केलं पाहिजे. यात तुमच्या गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या रूंदीचं माप घेतलं जाईल. हार्मोन्सचीही तपासणी होईल. त्यानंतर अश्रमैंस सिंड्रोमची माहिती करून घेण्यासाठी हिस्टोरोस्कोपी चाचणी महत्त्वाची आहे. याशिवाय जननेंद्रियाच्या तापमानाची तपासणी करण्यासाठी त्याची बायोप्सी करून तपासणीसाठी पाठवण्यात येईल. कारण पाळीच्यावेळी रक्तस्त्राव कमी होण्याचं हे सामान्य कारण आहे.
प्रश्न : माझं वय २९ वर्षं आहे. मला सतत व्हजायनल इन्फेक्शन होत असतं. कृपया यावर उपाय सांगा?
उत्तर : व्हजायनल इन्फेक्शनची बरीच कारणं असू शकतात. इथे तुम्ही तुमच्या कोणत्याही तपासणीच्या रिपोर्टचा उल्लेख केलेला नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही समस्या कायम जाणवते. तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली पाहिजे. त्यामध्ये तुमच्या समस्येमागचं खरं कारण समजू शकेल.
प्रश्न : माझं वय ३२ वर्षं आहे. माझी पाळी अनियमित आहे. गोळ्या घेतल्यावरच पाळी येते. माझी मुलगी ५ वर्षांची आहे. ती ऑपरेशनने झाली होती. मला दुसरं मुल हवं आहे. कृपया सांगा मी काय करू?
उत्तर : औषध घेतल्याशिवाय तुम्हाला पाळी येत नसेल तर तुम्ही तपासणी करून घ्या. यासाठी तुम्ही स्त्रीराग तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. त्या तुम्हाला अल्ट्रासाउंडसह इतर तपासण्या करायला सांगतील. यामुळे तुम्हाला खरं कारण समजू शकेल. पाच वर्षांपूर्वी ऑपरेशनने मुलगी झाली होती. म्हणजे दुसरं मूलही ऑपरेशनने होईल असं काही नाही. पण गरोदर राहण्याआधी तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
प्रश्न : माझं वय ३० वर्षं आहे. आणखी २ वर्षं तरी लग्न करण्याची माझी इच्छा नाही. जास्त वयामुळे आई बनताना काही अडथळे येणार नाहीत ना?
उत्तर : उशिरा लग्न झाल्यामुळे बऱ्याचदा गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. तुम्हाला इतक्यात लग्न करायचं नसेल तर तुम्ही थांबू शकता. पण गर्भधारणा करण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असेल. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घेतलात तर तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी योग्य ठरेल.
प्रश्न : मी १९ वर्षांची आणि अविवाहित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माझी पाळी आलेली नाही. याआधीही असं झालं होतं की मला ४ महिने पाळी आली नव्हती. त्यावेळी मला स्त्रीरोग तज्ज्ञांने प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन घ्यायला सांगितलं. त्यानंतर माझी पाळी नियमित सुरू झाली. नुकतीच मी एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली. त्यांनी मला सोनोग्राफी करण्यास सांगितली. त्यात कळलं की माझ्या युटरसचा आकार लहान आहे. अनियमित पाळीचं हेच कारण सांगितलं गेलं. कृपया यावर उपाय सांगा.
उत्तर : तुम्ही काळजी करू नका. सुरूवातीच्या १-२ वर्षांत पाळी अनियमित आणि कमी असू शकते. सामान्यत: त्यावेळी युटरसचा आकार छोटा असतो. तुम्ही सर्व रिपोर्ट्स सांभाळून ठेवा आणि एक थायरॉइड टेस्ट करून घ्या. रिपोर्ट नॉर्मल आले तर काळजी करू नका आणि थ्री डायमेन्शन अल्ट्रासाऊंड करून घ्या. यामुळे युटरसमधील समस्येची माहिती होईल. जर युटरस आणि पाळी सामान्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉन्ट्रासेप्टिव पिल्सचा वापर करा.