* अनुराधा गुप्ता
हेअर रिबाँडिंग, हेअर स्टे्टनिंग आणि हेअर स्मूदनिंग या तिन्ही ट्रीटमेंट भारतीय महिलांसाठी नवीन नाहीत. देशातील ७० टक्के महिलांनी यातील एखाद्या ट्रीटमेंटचा अनुभव तर नक्कीच घेतला असेल. विशेषत: तरुण महिलांबद्दल बोलायचे झाल्यास रिबाँडिंग, स्ट्रेटनिंग, स्मूदनिंगशिवाय तर त्या पाऊलच उचलत नाहीत. मात्र या तिन्हींबरोबर काही हेअर ट्रीटमेंटही जोडल्या गेल्या आहेत. कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये हेअर केराटिन ट्रीटमेंटच्या नावाने प्रसिद्ध असलेली ही ट्रीटमेंट केसांमधील केराटिनचे प्रमाण वाढविण्यासाठी केली जाते.
काय आहे केराटिन ट्रीटमेंट
‘गृहशोभिका’च्या ‘फेब’ मीटिंगमध्ये ब्युटीशिअन्सना विस्तृत माहिती देण्यासाठी आलेले एक्सपर्ट सॅम या केराटिन ट्रीटमेंटबाबत सांगतात, ‘‘महिलांमध्ये वाढत्या वयामुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे केस आणि नखांवर सर्वात अधिक प्रभाव पडतो. जिथे नखांचे क्युटिकल खराब होण्याची समस्या असते, तिथे केसांनाही प्रोटीन लॉसच्या समस्येचा सामना करावा लागतो. कारण आपले केस केराटिन नावाच्या प्रोटीनने बनलेले असतात. त्यामुळे ते लॉस झाल्यास केस पातळ व फ्रिजी होतात. अशा केसांवर रिबाँडिंग व स्ट्रेटनिंगचाही काही खास परिणाम होत नाही. कारण कमजोर केसांमध्ये केसगळतीची समस्या आणखी वाढते. अशा केसांसाठी केराटिन ट्रीटमेंट वरदान आहे. या ट्रीटमेंटमध्ये केसांवर प्रोटीनचा थर दिला जातो आणि प्रेसिंगद्वारे प्रोटीनला लॉक केले जाते.’’
केराटिन ट्रीटमेंटची प्रक्रिया
ही ट्रीटमेंट करण्यापूर्वी केसांचा चिकटपणा पूर्णपणे घालविण्यासाठी केसांना दोन वेळा शाम्पू केला जातो. त्यानंतर केसांना १०० टक्के ब्लो ड्राय केले जाते. याचे कारण म्हणजे केसांमध्ये मॉइश्चराइजर जराही राहू नये आणि केराटिन प्रॉडक्ट चांगल्याप्रकारे केसांमध्ये पेनिट्रेट केले जाऊ शकेल. ब्लो ड्रायनंतर केसांचे चार भाग करून मानेकडील भागाकडून प्रॉडक्ट लावायला सुरुवात केली जाते. प्रॉडक्ट लावल्यानंतर केसांना फॉइल पेपरने २५ ते ३० मिनिटांसाठी कव्हर केले जाते. त्यानंतर केसांना पुन्हा ब्लो ड्राय केले जाते आणि १३० ते २०० डिग्री तापमानात केसांना प्रेसिंग केली जाते, जेणेकरून प्रॉडक्ट केसांमध्ये चांगल्याप्रकारे पेनिट्रेट होईल.
या प्रक्रियेच्या २४ तासांनंतर केस पाण्याने स्वच्छ करून पुन्हा १८० डिग्री तापमानावर प्रेसिंग केले जाते. प्रेसिंगनंतर केसांना चांगल्या केराटिन शाम्पूने स्वच्छ केले जाते आणि केराटिनयुक्त कंडिशनर लावून ७-८ मिनिटे तसेच ठेवले जाते. त्यानंतर केस स्वच्छ करून ब्लो ड्राय केले जाते आणि अशाप्रकारे केराटिनची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
केराटिन ट्रीटमेंट नव्हे रिबाँडिंग
बहुतेक महिला केराटिन ट्रीटमेंटला रिबाँडिंग समजण्याची चूक करतात आणि त्यानंतर ट्रीटमेंटमध्ये चुका काढायला सुरुवात करतात. सॅम सांगतात, ‘‘केराटिन ट्रीटमेंट केसांना शायनी आणि स्मूद बनविते. मात्र ही केसांना स्ट्रेट करत नाही. हो, ज्या महिलांचे केस आधीच स्ट्रेट आहेत, त्यांच्या केसांना काही काळ स्ट्रेटनिंगचा इफेक्ट जरूर येईल. परंतु ज्यांचे केस कुरले आहेत, त्यांचे केस शाम्पूनंतर पहिल्यासारखेच होतात. मात्र स्मूदनेस व शायनिंग तशीच टिकून राहते. त्याचबरोबर केस पहिल्यापेक्षा जास्त हेल्दी वाटतात.’’
महिलांमध्ये हाही गैरसमज आहे की, केराटिन ट्रीटमेंट कायमस्वरूपी असते, तर असे काही नाहीए. सॅमच्या मतानुसार, केराटिन ट्रीटमेंटमध्ये खूप माइल्ड प्रॉडक्टचा वापर होतो, याउलट स्मूदनिंग आणि रिबाँडिंगमध्ये हार्ड केमिकल्सचा वापर केला जातो. केराटिन ट्रीटमेंटचा परिणाम केसांवर ४-५ महिन्यांपर्यंत राहतो. त्यानंतर पुन्हा ही ट्रीटमेंट द्यावी लागते.