* डॉ. क्षितिज मुर्डिया, इंदिरा इनफर्टिलिटी क्लीनिक एण्ड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी दिल्ली

एण्डोमॅट्रिओसिस गर्भाशयाशी निगडित एक समस्या आहे. ही समस्या स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेला सर्वात जास्त प्रभावित करते; कारण गर्भधारणा आणि मुलाला जन्म देण्यात गर्भाशयाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेक स्त्रिंमध्ये ही समस्या जास्त गंभीर होऊन शरीरातील इतर अवयवांवरही प्रभाव टाकते. तसंही अत्याधुनिक औषधं आणि उपचारांच्या वेगवेगळ्या पर्यायांनी वेदना आणि वांझपणा या दोन्हीपासून सुटका मिळवून दिली आहे. एण्डोमॅट्रिओसिसचा हा अर्थ नाही की याने ग्रस्त असलेल्या स्त्रिया कधीच आई होऊ शकत नाही, मात्र यामुळे गर्भधारणा करण्यास अडचण नक्कीच येते.

एण्डोमॅट्रिओसिस म्हणजे काय?

एण्डोमॅट्रिओसिस गर्भाशयातील आंतरिक थरावरील पेशींचा असामान्यरीत्या झालेला विकास असतो. ही समस्या तेव्हा होते जेव्हा पेशी गर्भाशयाच्या बाहेर विकसित होतात. याला एण्डोमॅट्रिओसिस इंप्लांट म्हणतात. हे इंम्प्लांट्स सामान्यपणे अंडाशय, फॅलोपियन ट्यूब्स, गर्भाशयाचा बाह्य स्तर किंवा आतड्या किंवा श्रोणिय गुहेच्या थरावर उद्भवत असतात. योनीमार्ग, सरविक्स आणि ब्लेडरवरही हे असू शकतात. फारच कमी प्रमाणात एण्डोमॅट्रिओसिस इंम्प्लांट्स श्रोणीच्या बाहेर यकृतावर किंवा कधी कधी फुफ्फुस वा मेंदूच्या आजूबाजूलाही होतात.

एण्डोमॅट्रिओसिसची कारणं

एण्डोमॅट्रिओसिसचा परिणाम स्त्रियांना त्यांच्या प्रजनन काळादरम्यान होतो. याची अनेक प्रकरणं २५ ते ३५ वर्षांच्या स्त्रियांमध्ये आढळतात. बऱ्याचदा १०-११ वर्षांच्या मुलींमध्येही अशा प्रकारची समस्या आढळून येतात. मॅनोपॉजचं वय ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये ही समस्या खूपच कमी असते. जगभरात कोट्यवधी स्त्रिया या समस्येने ग्रस्त आहेत. ज्या स्त्रियांना गंभीर श्रोणीय वेदना होते, त्यांच्यापैकी ८० टक्के एण्डोमैट्रिओसिसने ग्रस्त असतात.

यामागचं खरं कारण तर माहीत नाही, पण सर्वेक्षणांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की एण्डोमैट्रिओसिसची समस्या त्या स्त्रियांना जास्त असते ज्यांचा बौडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी असतो. मोठ्या वयात आई होणाऱ्या किंवा कधीच आई न झालेल्या स्त्रियांमध्येही ही समस्या असू शकते. त्याचबरोबर ज्या स्त्रियांना पाळी लवकर सुरू होते किंवा मेनोपौज उशिराने होतो त्यांनाही याचा धोका संभवतो. त्याचबरोबर अनुवंशिक कारणंही यात महत्त्वाची भूमिका साकारतात.

एण्डोमॅट्रिओसिसची लक्षणं

अनेक स्त्रियांमध्ये एण्डोमॅट्रिओसिसची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. पण जी लक्षणं दिसतात त्यामध्ये पाळीच्या वेळेस जास्त वेदना होणं, पाळी किंवा अंडोत्सर्गाच्या वेळी पॅल्विक पेन एण्डोमॅट्रिओसिसचं एक लक्षण आहे. पण ही लक्षणं सामान्य स्त्रियांमध्येही दिसू शकतात.

* श्रोणी क्षेत्रात वेदना म्हणजे ओटीपोटात वेदना होणं आणि ही वेदना अनेक दिवस राहू शकते. याने कंबर आणि पोटदुखीही होऊ शकते आणि अनेक दिवस चालू शकते. मल-मूत्रोत्सर्जन करताना वेदना होऊ शकते. ही समस्या बऱ्याचदा पाळीच्या वेळेस जास्त होते. पाळीच्या वेळेस जास्त रक्तस्त्राव होणं, कधी कधी पाळी दरम्यानच जास्त रक्तस्त्राव होणं, शारीरिक संबंध ठेवताना किंवा नंतर वेदना होणं, डायरिया, मलावरोध किंवा जास्त थकवा येणं या समस्या होऊ शकतात. छातीमध्ये वेदना किंवा खोकताना रक्त येणं यांसारख्या समस्या फुफ्फुसांमध्ये एण्डोमॅट्रिओसिस असल्यास उद्भवतात आणि मेंदूमध्ये एण्डोमॅट्रिओसिस असल्यास डोकेदुखी आणि चक्कर येणं यांसारख्या समस्या उद्भवतात.

धोकादायक गोष्टी

अनेक गोष्टी एण्डोमॅट्रिओसिसची शक्यता वाढवतात. जसं की –

* मुलाला कधीच जन्म देऊ न शकणं.

* आपल्याजवळच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त नातलगांना एण्डोमॅट्रिओसिस असणं.

* दुसरं एखादं वैद्यकीय कारण ज्यामुळे शरीरातून मासिक पाळीच्या स्त्रावाचा सामान्य मार्ग बाधित होतो.

* यूरिनचा असामान्यपणा.

एण्डोमॅट्रिओसिस आणि इनफर्टिलिटी

ज्या स्त्रियांना एण्डोमॅट्रिओसिस आहे त्यांच्यापैकी ३५ ते ५० टक्के स्त्रियांना गर्भधारणा करण्यास समस्या उद्भवते. यामुळे फॅलोपियन ट्यूब्स बंद पडतात, ज्यामुळे अंड आणि शुक्राणूंचं निषेचन (फलित होणं) होत नाही. कधी कधी अंड किंवा शुक्रांणूनाही अपाय होतो. यामुळेदेखील गर्भधारणा होत नाही. ज्या स्त्रियांमध्ये ही समस्या जास्त गंभीर नसते, त्यांना गर्भधारणा करण्यास जास्त अडचण येत नाही. डॉक्टरांचा सल्ला आहे की ज्या स्त्रियांना अशा प्रकारची समस्या आहे त्यांनी मुलाला जन्म देण्यास उशीर करू नये; कारण दिवसेंदिवस अशा स्त्रियांची परिस्थिती आणखीनच खराब होत जाते.

पहिल्यांदा एण्डोमॅट्रिओसिस माहिती तेव्हा कळली जेव्हा काही स्त्रिया वांझपणावर उपचार करत होत्या. एका आकडेवारीनुसार २५ ते ५० टक्के वांझ स्त्रिया एण्डोमॅट्रिओसिसने ग्रस्त असतात, तर ३० ते ५० टक्के स्त्रिया, ज्यांना एण्डोमॅट्रिओसिस असतं, त्या वांझ असतात.

वांझपणाची तपासणी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या लॅप्रोस्कोपिक परीक्षणाच्या वेळेस एण्डोमॅट्रियल इंप्लांटची माहिती कळते. अनेक अशा स्त्रियांमध्येही याची माहिती कळते, ज्यांना कसलीच वेदना होत नाही. एण्डोमॅट्रिओसिसमुळे स्त्रियांची प्रजननक्षमता का प्रभावित होते हे तर पूर्णपणे कळलं नाहीए, पण शक्यतो ऐनाटॉमिकल आणि हारमोनल कारणांमुळे ही समस्या उद्भवते.

एण्डोमॅट्रिओसिस आणि कॅन्सर

एका सर्वेक्षणानुसार ज्या स्त्रियांना एण्डोमॅट्रिओसिस असतं त्यांच्यात अंडाशयाची कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढते. हा धोका त्या स्त्रियांना जास्त असतो ज्या वांझ असतात किंवा कधीच आई होऊ शकत नाहीत.

अजूनपर्यंत एण्डोमॅट्रिओसिस आणि ओवेरियन ऐपिथेलियन कॅन्सरमध्ये काय संबंध आहे याचं स्पष्ट कारण कळलं नाहीए. अनेक सर्वेक्षणांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की एण्डोमॅट्रिओसिस इंम्प्लांटच पुढे कॅन्सरमध्ये बदलतो. असंही सांगितलं जातं की, एण्डोमॅट्रिओसिस अनुवंशिक आणि पर्यावरणीय कारणांनीदेखील निगडित असू शकतं.

डायग्नोसिस

एण्डोमॅट्रिओसिसचं निदान करण्यासाठी या तपासण्या केल्या जातात –

* पॅल्विक ऐग्जाम : या तपासणीत डॉक्टर हातांनी ओटीपोटाची तपासणी करून कुठे काही असामान्य तर दिसत नाही, हे पाहातात.

* अल्ट्रासाउंड : याने एण्डोमॅट्रिओसिस असल्याचं कळत तर नाही, पण त्यांच्याशी निगडित सिस्टची ओळख होते.

* लॅप्रोस्कोपी : एण्डोमॅट्रिओसिस आहे की नाही याचं निदान करण्यासाठी एक लहानशी शस्त्रक्रिया केली जाते ज्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. यामध्ये पेशींचे नमुनेही घेतले जातात, ज्यांची बायोप्सी केल्याने हे कळतं की एण्डोमॅट्रिओसिस शरीरात कुठे उपस्थित आहे.

रिस्क फॅक्टर

पाळीच्या वेळेस होणारा रक्तस्त्राव आणि सहवास करताना होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका. परिस्थिती जास्त गंभीर होण्यापूर्वीच एखाद्या फर्टिलिटी तज्ज्ञाची भेट घ्या. याच्या उपचारासाठी औषधं आणि शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. याच्या उपचारासाठी हारमोन थेरेपीरही वापरली जाते. कारण मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या हारमोन परिवर्तनामुळेदेखील ही समस्या उद्भवते. हारमोन थेरेपीमुळे एण्डोमॅट्रिओसिसचा विकास मंदावतो आणि पेशींचा नवीन इंन्प्लांटही थांबतो.

एण्डोमॅट्रिओसिसमुळे होणाऱ्या वेदनेसाठी डॉक्टर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करणं योग्य समजतात. तसंच वांझपणाच्या समस्येसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा सल्ला दिला जातो, जेणेकरून जास्त अपाय होण्यापूर्वीच अपत्य प्राप्ती केली जाऊ शकेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...