* पारूल भटनागर

डेटिंगवर जायचे असेल पण बिझी शेड्युलमुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांतच स्वत:ला उत्तम लुक देऊन मित्र-मैत्रिणींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकता.

यासंदर्भात ब्यूटी एक्स्पर्ट बुलबुल साहनी यांनी दिलेल्या काही टीप्स जाणून  घ्या :

मेकअप करण्यापूर्वी काय करावे

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर झटपट उजळपणा हवा असेल तर मेकअप करण्यापूर्वी १० मिनिटे आधी आपल्या चेहऱ्यावर दही लावा. दही ब्लीचचे काम करते. यामुळे त्वचा उजळण्यासोबतच मेकअपचाही खूप छान रिझल्ट मिळतो.

उजळ त्वचेसाठी तुम्ही आठवडयातून तीन दिवस दह्यात लिंबू किंवा टोमॅटो मिसळून लावू शकता. त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावण्याचीही गरज भासणार नाही. हे प्रायमरचे काम करते.

घरात ठेवा कॉस्मेटिक प्रोडक्ट्स

तुम्ही घरात मेकअप किटमध्ये क्रीम, कन्सिलर, फाउंडेशन, ब्रश, कॉम्पॅक्ट, आयशॅडो, काजळ, लायनर, ब्लशर, लिपस्टिक, लिप पेन्सिल, हेअर अक्सेसरीज, टिकली, नेलपॉलिश इत्यादी नक्की ठेवा. यामुळे तुम्हाला काही मिनिटांतच मेकअप करणे सोपे होईल.

मेकअप कसा करावा

त्वचा जास्त कोरडी दिसत असेल तर मेकअपचा तितकासा इफेक्ट जाणवणार नाही. म्हणून सर्वप्रथम त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी चेहऱ्यावर कोल्ड क्रीम लावा. हे काळी वर्तुळे लपविण्याचे काम करते.

त्यानंतर चेहऱ्यावर चांगले फाउंडेशन लावा. मानेवरही फाउंडेशन लावायला विसरू नका. यामुळे नॅचरल स्किन टोनसह त्वचा स्वच्छ दिसू लागते. बेस तयार झाल्यावर ब्रशच्या मदतीने कॉम्पॅक्ट लावा. ते तुम्हाला परफेक्ट लुक देण्याचे काम करेल. लक्षात ठेवा की कॉम्पॅक्ट नेहमी अँटीक्लॉकव्हाईस लावा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो.

त्यानंतर आयशॅडो वापरून डोळयांचा मेकअप करा. आजकाल स्मोकी डोळयांची खूप क्रेझ आहे, त्यामुळे तुम्ही गडद रंगापासून स्मोकी डोळयांसह भुवयाही त्याच पण सौम्य रंगाने रंगवून त्यावर थोडे ग्लिटर लावा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार डोळयांवर पातळ किंवा जाड लायनर लावा. नंतर मस्कराचे ३-४ कोट लावा. मस्करामुळे पापण्या दाट दिसू लागतील. आता काजळ लावा. यामुळे तुमचे डोळे अधिक सुंदर दिसतील.

यानंतर नाकाजवळून ते भुवयांपर्यंत ब्लशर लावा आणि बोटांनी सर्वत्र नीट पसरवा. ब्लशरनंतर हाइलायटर लावा. यामुळे थोडया वेळाने मेकअप चमकू लागतो. आता पेन्सिलने ओठांची रेषा काढा आणि त्यामध्ये लिपस्टिक लावा. यामुळे लिपस्टिक पसरत नाही.

सर्वात शेवटी, केस तुमच्या मनाप्रमाणे बांधा. तुम्ही ते मोकळेदेखील सोडू शकता किंवा केस लहान असतील तर आधी हळू हातांनी मागून विंचरा आणि बन बनवून पिन व डोनटने चांगले झाकून घ्या. पुढील केसांना थोडे प्रेस करून चांगल्याप्रकारे सेट करा. हा लुक तुमच्या मेकअप आणि आउटफिटसाठी खुलून दिसेल. अशाप्रकारे, तुम्ही डेटिंगवर जाण्यासाठी स्वत:ला अगदी काही मिनिटांतच तयार करू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...