* अनुराधा गुप्ता
आजच्या स्त्रिया घराची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच स्वत:ला इतर कामातही व्यस्त ठेवू लागल्या आहेत. त्या जर नोकरदार असतील तर त्यांचं प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफही वेगवेगळं असेल आणि त्यानुसारच त्यांना अनेक प्रसंगात सहभागीही व्हावं लागतं, तसंच अनेक वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधावा लागतो. ही सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आणि प्रत्येक प्रसंगी स्वत:ला प्रेझेंटेबल दाखवण्यासाठी फॅशन ट्रेण्ड्सची योग्य माहिती असणंही फार गरजेचं आहे.
फॅशन डिझायनर श्रुती संचेती सांगते की, ‘डिस्को’ पार्टीमध्ये जर कोणी स्त्री लहेंगा घालून गेली तर हे फॅशन डिजास्टरच ठरेल. म्हणून योग्य प्रसंगी योग्य ड्रेस घालणं खूप महत्त्वाचं ठरतं.
नाइटआउटला काय घालावं
अलीकडे मोठमोठ्या शहरांमध्ये तरुण वर्गाचं आपल्या मित्रांच्या घरात रात्री थांबणं आणि मजामस्ती करण्याचा ट्रेण्ड फार जोरावर आहे. मुलीदेखील याचा आनंद घेत आहेत. तसं यात काही चुकीचंही नाहीए. अशा प्रकारचे प्रसंग स्टे्रस बस्टरसारखे असतात आणि याचा आनंद घ्यायला मागेही राहू नये. शिवाय हे प्रसंग तुम्ही आणखीन गमतीदार बनवू शकता, जर तुम्ही योग्य आउटफिट्सची निवड केली असेल तर.
श्रुती सांगते की, नाइटआउट म्हणजे मजामस्ती, पार्टी, कुकिंग आणि गेम्स. या सर्वांचा पुरेपूर आनंद फक्त आरामदायक कपड्यांमध्येच घेतला जाऊ शकतो. पण आता जेव्हा नाइटआउट करणं एक ट्रेण्ड झाला आहे, म्हणून या ट्रेण्डमध्ये फॅशनची धूमदेखील खूप गरजेची आहे.
श्रुती या प्रसंगी घातल्या जाणाऱ्या ड्रेसेसबद्दल सांगते की :
* या प्रसंगी अनेक अॅक्टिविटीज कराव्या लागतात; ज्यासाठी असे कपडे घालावेत जे फ्लेक्सिबल असतील. लाँग कॉटन स्कर्टबरोबर शॉर्ट कुर्ती, रॅपराउंड स्कर्टबरोबर स्टायलिश स्पेगेटी आणि स्टोल या प्रसंगी खूपच आरामदायक पर्याय आहे.
* अलीकडे बाजारात प्रिंटेड कॉटन पॅण्ट्सदेखील मिळतात. नाइटआउटसारख्या मनमोकळ्या प्रसंगी हा ड्रेस खूपच स्टायलिश लुक देतो. याच्यासोबतदेखील शॉर्ट कॉटन कुर्ती घातली जाऊ शकते.
* कॅज्युअल अफगाणी पायजम्यासोबत स्टायलिश स्लीव्हलेस टीशर्टदेखील याप्रसंगी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा लुक देण्यासाठी पुरेसा असतो.
फंकी लुक खास शॉपिंगसाठी
नाइट आउटसारखंच शॉपिंगदेखील स्त्रियांसाठी स्टे्रस बस्टर आहे. हा प्रत्येक स्त्रीचा फेवरेट टाइमपास असतो. या वेळेचा आनंद घेण्यासाठी हे जरुरी आहे की कपडेही तसेच घातले जावे. जरा विचार करा, शॉपिंगला जर तुम्ही शॉर्ट फ्रॉक किंवा स्कर्ट घालून गेलात तर प्रत्येक क्षणी तुमचं याच गोष्टीवर लक्ष लागून राहील की तुमच्यासोबत मालफंक्शनिंग तर होणार नाही ना आणि मार्केट एरियासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सगळे तुमची चेष्टा तर करणार नाही. पण असंही नाही की शॉपिंगसाठी तुम्ही वरून खालपर्यंत कपड्यांतच स्वत:ला गुंडाळून घ्यावं.
श्रुती सांगते की, शॉपिंगला जाणं एक असा प्रसंग असतो जेव्हा अनेक वेळा फिटिंग चेक करण्यासाठी कपडे बदलावे लागतात. अशावेळी जास्त कॉप्लिकेटेड ड्रेस घातल्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या सगळ्यापासून बचावण्यासाठी ईझी टू वेअर आणि ईझी टू रिमूव आउटफिट्स चांगले ठरतात.
शॉपिंगसाठी घातल्या जाणाऱ्या स्टायलिश आउटफिट्ससाठी श्रुती अनेक पर्याय सांगत आहे.
* या प्रसंगी डेनिम जीन्स स्त्रियांची ऑलटाइम फेवरेट असते. तसंही जीन्स या प्रसंगासाठी एक फार चांगला पर्याय आहे. पण याला स्टायलिश लुक देण्यासाठी ट्रेण्डी टॉपसोबत क्लब करायला पाहिजे.
* जंम्पसूट्स या प्रसंगी खूपच स्टायलिश आणि आरामदायक असतात. बाजारात याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत, शॉपिंग टाइमसाठी फंकी लुकचा एखादा जंपसूट तुम्ही घालू शकता.
* कुलोट्स आणि क्रॉप टॉप फॅशन ट्रेण्ड्समध्ये सर्वात लेटेस्ट आहेत आणि हे कॉम्बिनेशन शॉपिंग टाइमसाठीदेखील सर्वात स्टायलिश आहे.
* अलीकडे बाजारात अनेक प्रकारचे प्रिंटेड प्लाजो मिळतात. हे तुम्ही शॉर्ट टॉप किंवा स्टायलिश स्पेगिटी आणि स्टोलसोबत घालू शकता.
* फक्त वेस्टर्नच नव्हे, तर भारतीय पेहरावदेखील शॉपिंग करताना खूप आरामदायक आणि स्टायलिश लुक देतात. जसं की पॉकेट आणि कॉलरच्या कुर्त्यांबरोबर अॅन्कल लेन्थ लेगिंग्जचं खूप चलन आहे. त्याबरोबर अफगाणी पायजम्याबरोबर स्टायलिश टीशर्टदेखील तुम्हाला फॅशनेबल स्त्रियांच्या रांगेत नेऊन उभं करेल.
* सिमॅट्रिकल टॉप आणि सॉफ्ट डेनिम पॅण्ट्सदेखील फॅशनमध्ये आहेत. स्त्रियांना हे खूप आवडत आहे. हे फ्लेक्सिबल असण्याबरोबरच खूपच कूल लुक देतात.
जेव्हा पार्टीची शान बनायचं असेल
फक्त शॉपिंगच नव्हे, तर भारतीय स्त्रियांमध्ये सतत वाढणाऱ्या पार्टीच्या क्रेझने फॅशन इंडस्ट्रीला दर दिवशी बाजारात काही तरी नवीन सादर करण्यासाठी मजबूर केलं आहे.
श्रुती सांगते की पूर्वी स्त्रिया अशा प्रसंगी इंडियन आउटफिट्सच जास्त घालणं पसंत करायच्या, पण आता त्यांना असा पेहराव हवा आहे जो इंडियनही असावा आणि वेस्टर्नही. यासाठी डिझायनर्सनी अनेक प्रकारचे इंडोवेस्टर्न फ्यूजन डे्रस डिझाइन केले आहेत.
* लहेंग्याची फॅशन कधीच आउट होऊ शकत नाही. पण स्त्रिया याला कंटाळल्या आहेत. म्हणूनच डिझायनर्सनी आता स्त्रियांना लहेंग्याऐवजी वेडिंग गाउनचा पर्याय दिला आहे. गाउन वेगवेगळ्या प्रसंगानुसार बाजारात उपलब्ध आहेत. जसं की लग्नप्रसंगी घालण्यासाठी सिल्क, नेट, वेल्वेट यांसारख्या फॅब्रिक्सवर गोटा वर्क, सीक्वेन्स वर्क अणि जरीकाम केलेला गाउन घातला जाऊ शकतो, तर बर्थ डे पार्टी, संगीत, मेंदी किंवा साखरपुडा इत्यादी प्रसंगी शिफॉनवर ब्रोकेड वर्क, फॅन्सी लेस वर्क आणि इंग्लिश एम्ब्रॉयडरीवाला गाउन फार चांगला पर्याय आहे.
* म्यूलेट डे्रसेजमध्ये वनपीस आणि सलवार सूटदेखील स्त्रियांना वेगळा लुक देतात. हे तुम्ही दुपट्टा आणि लेगिंग्जबरोबर घालू शकता.
* तुम्हाला जर लहेंगाच घालायचा असेल तर बाजारात मिळणाऱ्या पारंपरिक लहेंग्याऐवजी लाँग कोटसोबत घाघऱ्याच्या कॉम्बिनेशनला प्राधान्य द्या. हे तुम्हाला इंडोवेस्टर्न लुक देईल. घाघरा लाँग कुर्त्याबरोबरही घातला जाऊ शकतो. त्याचबरोबर केप आणि घाघऱ्याचं कॉम्बिनेशनदेखील स्टायलिश इंडोवेस्टर्न लुक देतो.
* शॉर्ट अनारकली कुर्त्यांची फॅशन पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये परतली आहे. मात्र, या वेळेस हे चूडीदारबरोबर नव्हे तर पटियाला किंवा अफगाणी पायजम्यांबरोबर घातले जात आहेत.
* बाजारात विशेषकरून लेगिंग्जवर नेसल्या जाणाऱ्या साड्या आल्या आहेत, ज्या खूपच आकर्षक दिसतात. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या साड्या सोनम कपूर, अदिती राव हैदरी, दीपिका पादुकोण यांसारख्या बॉलीवूड अभिनेत्रींनीही नेसलेल्या पाहायला मिळालं आहे. या साड्या बारीक आणि सडपातळ फिगर असलेल्या स्त्रियांवर खूपच स्टायलिश दिसतात.
ऑफिसला जा अपटुडेट बनून
मजामस्तीबरोबरच आता स्त्रिया कॉर्पोरेट कल्चरच्या रंगातही रंगलेल्या दिसत आहेत. या कल्चर म्हणजे संस्कृतीबरोबर चालण्यासाठी स्त्रियांनी आपल्या पेहरावांमध्ये अनेक बदल केले आहेत. एक काळ होता जेव्हा ‘चांदनी’ चित्रपटातील श्रीदेवीचा कट स्लीव्ह, ब्लाउज फॅशनेबल स्त्रियांनी ऑफिसात घालायलाही सुरुवात केली होती. आणि ही फॅशन आजपर्यंत आउटडेटे्ड झाली नाहीए.
श्रुती सांगते की, ब्लाउजच्या स्टाइलमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. पण साडीची क्रेज आजही नोकरदार स्त्रियांमध्ये जशीच्या तशी आहे. आता वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाने स्त्रियांचा ऑफिस ड्रेसिंगसेन्सही बराच बदलला आहे. साडी नेसायला १५ मिनिटं घालवण्याऐवजी त्यांना ट्राउजर आणि शर्ट घालणं योग्य वाटतं.
फक्त ट्राउजर आणि शर्टच नव्हे, तर आता स्त्रियांना ऑफिस वेअरमध्येही स्टाइलची धूम दाखवणं आवडत आहे. बघूया अशाच काही स्टायलिश ऑफिस वेअरची माहिती :
* फिटेड ड्रेसचं चलन तसं जुनं आहे, पण त्याच्यावर समर ब्लेझर घातला तर त्याचा पूर्ण लुकच बदलतो.
* चित्रपट ‘की एंड का’ मध्ये करीना कपूरने घातलेला बेबी कॉलर शर्ट सद्या ट्रेण्डमध्ये आहे.
* लाँग शर्ट ड्रेसदेखील कॉर्पोरेट वर्किंग स्त्रियांना सुंदर लुक देतात. सामान्य शर्टाच्या लांबीपेक्षा जास्त लांबी असलेल्या या शर्ट्सवर लावलेले बेल्ट यांना वेगळाच लुक देतात.