* पारूल भटनागर

आज जेव्हा सर्वत्र कोरोना विषाणूचा धोका आवासून उभा आहे अशावेळी खबरदारी घेण्याची गरज आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या संक्रमणापासून आपल्याला स्वत:चे रक्षण करता येईल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश डाएटमध्ये करू. तुमची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ति वाढवणाऱ्या गोष्टी तुम्हाला अन्य कुठे नव्हे तर तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील.

हो, येथे आम्ही स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांबाबतच सांगत आहोत. ते पदार्थांची चव तर वाढवतातच सोबतच तुमची इम्युनिटीही वाढवतात. चला, तर मग यासंदर्भात फरीदाबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डाएटिशियन डॉक्टर विभा यांच्याकडून जाणून घेऊया की, कोणते गरम मसाले इम्युनिटी वाढवायचे काम करतील.

हळद

हळद हा एक असा मसाला आहे जो प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात सहज मिळतो. शिवाय, सर्वसाधारणपणे प्रत्येक भाजीत घातला जातोच. याला फ्लू फायटर म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण ‘पब्लिक लेबरराय ऑफ सायन्स’मध्ये प्रकाशित अहवालानुसार, हळदीत करक्युमिन नावाचे तत्त्व असते जे अॅण्टीव्हायरल किंवा अॅण्टीइनफ्लेमेंटरी प्रॉपर्टीजसाठी ओळखले जाते. म्हणूनच तुम्ही हळद भाजीत घाला, दुधात किंवा हेल्थ ड्रिंकमध्ये घाला, यातील गुण कमी होत नाहीत.

डाएटिशियन डॉ. विभा यांनी सांगितले की, सध्या बाजारात मिळणाऱ्या हळदीत बरीच भेसळ असते. त्यात लेडही असते, ज्यामुळे शरीराची हानी होते. म्हणूनच हळद खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, त्यात ३ टक्के करक्युमिन आणि १०० टक्के नॅचरल ऑईल असणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या शरीराला हळदीतील वास्तविक गुणधर्म मिळू शकतील. नॅचरल ऑईलमध्ये अॅण्टीफंगल प्रॉपर्टीज असल्यामुळे ते फ्लूमुळे होणाऱ्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट या विषाणूला रोखण्यासाठी सक्षम असते.

नेहमी किती हळदीचे सेवन करावे : जर तुम्ही भाजीमधून हळदीचे सेवन करत असाल तर त्यात ३-४ चिमूट हळद पावडर घालावी. दूध किंवा हेल्थ ड्रिंकमध्ये ती टाकणार असाल तर १-१ चिमूट पुरेशी आहे.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

हळद शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करते. गरजेपेक्षा जास्त वापरामुळे पोटात जळजळ होऊ शकते. जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे हळद ही शरीरातील लोह शोषून घेते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. म्हणूनच मर्यादित मात्रेतच तिचे सेवन करावे.

दालचिनी

सर्दीखोकला झाल्यास दालचिनीची चहा किंवा दालचिनीचे पाणी दिल्यामुळे तो बरा होतो, कारण यात अॅण्टीबायोटिक आणि बॉडी वॉर्मिंग प्रॉपर्टीज असतात. सोबतच दालचिनीमुळे भाजीची चव वाढते. कुठल्याही वयाचे लोक तिचे सेवन करुन स्वत:चे रोगांपासून रक्षण करू शकतात.

यात पॉलिफेनॉल्स नावाचे अॅण्टीऑक्सिडंट असते, जे शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवण्याचे काम करते. सोबतच यात सिनेमेल्डिहाइड नावाचे तत्त्व असते जे विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवण्याचे काम करते. सिनेमन आयर्नमुळे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, फ्लू बरा होण्यासोबतच तो आपल्यातील इम्युनिटीही वाढवतो. दालचिनी तुम्ही अख्खी वापरा किंवा दालचिनीची पावडर वापरा, कुठल्याही स्वरुपात ती शरीरासाठी फायदेशीरच ठरते.

नेहमी किती दालचिनी खावी : तुम्ही दररोज १ ग्रॅम दालचिनीचे सेवन करू शकता. यामुळे शरीराचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

दालचिनीत सिनेमेल्डिहाइड नावाचे तत्त्व असते. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. दालचिनीचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास तोंड येणे, सूज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तिचे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.

मेथीदाणे

मेथीदाण्याला आरोग्यासाठी वरदान समजले तर ते चुकीचे ठरणार नाही. पण मेथी काहीशी कडवट असल्याने बहुतांश लोक तिचा वापर डाएटमध्ये करीत नाहीत. प्रत्यक्षात मेथीचे छोटे छोटे दाणे खूपच परिणामकारक असतात. यात अॅण्टीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे ती शरीराला आजारांपासून वाचवते. सोबतच मेथीत कॉपर, झिंक, मॅग्नेशियम, सोडियम, फॉलिक अॅसिड असल्यामुळे ती शरीराला आवश्यक सर्व प्रकारची पोषक तत्त्वे मिळवून देण्याचे काम करते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती खाऊ शकता.

नेहमी किती मेथीदाणे खावे : दररोज ५ ग्रॅम मेथीदाणे खाता येतील.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

मेथी गरम असल्यामुळे ती खाल्ल्यामुळे पोटासंबंधी समस्य निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ती मर्यादित प्रमाणातच खावी.

काळीमिरी

काळीमिरी प्रत्येक देशाच्या पाककृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तिच्या वापरामुळे पदार्थाची चव कित्येक पटीने वाढते. सोबतच यात पाइपराइन तत्त्वही असते ज्यात अॅण्टीबॅक्टेरियल आणि अॅण्टीइनफ्लमेटरी गुण असतात, जे आपले प्रत्येक प्रकारच्या संसर्गापासून रक्षण करतात. यात मोठया प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे ती आपल्यामध्ये रोगांविरोधात लढण्याची क्षमता निर्माण करते. म्हणूनच सर्दीखोकला झाल्यास काळीमिरी नॅचरल टॉनिकच्या रुपात वापरली जाते. अनेक जण जेवणाच्या पदार्थात घालूनही तिचा वापर करतात.

नेहमी किती प्रमाणात खावी : नेहमी १ चिमूटभर कालिमिरी खावी. ती अशक्तपणा दूर करण्यासोबतच तुमची अंतर्गत ताकदही वाढविण्याचे काम करते.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

जर तुम्ही दररोज अनेकदा आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात काळीमिरी खात असाल तर त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते, कारण यातील पाईपराइन हे तत्त्व जळजळ निर्माण करण्यासाठी कारणीभूत असते.

आले

आल्यात अॅण्टीइनफ्लेमेटरी आणि अॅण्टीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ज्या कफ, सर्दी आणि फ्लूपासून वाचवण्याचे काम करतात. आल्यातील अॅण्टीऑक्सिडंट प्रॉपर्टीज शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढून टाकण्याचे काम करतात.

नेहमी किती आले खावे : तुम्ही दररोज १ इंच आल्याचा तुकडा खाऊ शकता. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

गरजेपेक्षा जास्त आले खाल्ल्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढू शकते. सोबतच त्वचेची अॅलर्जी आणि पोटाची समस्याही निर्माण होऊ शकते. म्हणूनच गरजेपेक्षा जास्त आले खाऊ नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...