* भारती तनेजा, डायरेक्टर ऑफ एल्प्स ब्युटी क्लिनिक अँड अकॅडमी

पावसाळयात ना केवळ आपले केस चिपचिपे होऊ शकतात तर तुमचा सुंदर मेकअपही बिघडू शकतो. थोडा विचार करा, पावसाळयात तुम्ही छान तयार होऊन पार्टीसाठी निघाला आहात आणि अचानक पाऊस सुरु झाला, तर तुमचा सगळा मेकअप पावसात भिजून निघून जाईल.

या समस्या दूर करण्यासाठी या मोसमात मेकअप करण्याचे काही उपाय :

क्लिनिंग

मान्सूनमध्ये त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी चेहरा नियमित धुवा. चेहरा धुतल्यावर १० मिनिटांनी त्यावर बर्फ चोळा. यामुळे मेकअप अधिक काळ टिकून राहतो आणि यासोबतच मान्सूनमध्ये निस्तेज त्वचेलासुद्धा उजाळा मिळतो.

जर तुमची त्वचा ऑयली असेल तर ऐस्टिंजैंटचा वापर करा, ज्यांची त्वचा सामान्य अथवा रुक्ष असेल त्यांनी या ऋतूत चेहरा धुतल्यावर टोनरचा वापर करावा.

प्रायमर

जर तुमच्या चेहऱ्यावर डाग आणि हलके खड्डे किंवा पुरळ असेल तर प्रायमर लावा, कारण असे करणे या ऋतूत उपयुक्त असते. प्रायमर त्वचेच्या पृष्ठभागाला समान करते, ज्यामुळे मेकअप जास्त वेळ टिकून राहतो, पण ज्यांना ही समस्या नाही त्यांना प्रायमर लावायची आवश्यकता नाही.

मान्सूनमध्ये मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर जेली प्रायमरचा वापर करा. प्रायमर लावून २-३ मिनिटं तसेच राहू द्या. त्यानंतर पुढची स्टेप करा. यामुळे प्रायमर जास्त वेळ टिकते. पावसाळयात कंसिलर लावणे टाळा, कारण पावसाळयाचा धामधूम करणारा ऋतू चेहऱ्यावर कंसिलर टिकू देणार नाही. तरीही तुम्हाला कंसिलर लावायची अतिशय गरज भासली तर क्रेयॉन कंसिलरचा पर्याय निवडा.

आयशॅडो

मान्सूनदरम्यान आपल्या आयाब्रोज नेहमी सेट ठेवा आणि आयब्रो पेन्सिलचा वापर चुकूनही करू नका. अशा दिवसात पेन्सिल पुसली जायची शक्यता असते. शक्य असेल तर आयशॅडोचासुद्धा वापर करू नका, जर करावाच लागला तर आयशॅडोमध्ये क्रीमऐवजी पावडरचा वापर करा. जेणेकरून ते वितळून आपल्या चेहऱ्याला खराब करणार नाही. हे क्रीम आयशॅडोच्या तुलनेत जास्त वेळ टिकते, यातसुद्धा अनेकदा नॅचरल शेड्स जसे पिंक वा ब्राऊन वापरा. पापण्यांवर वॉटरप्रुफ मस्कारा लावा. हा जास्त वेळ टिकेल. मान्सूनमध्ये काळया मस्कऱ्याऐवजी रंगीत लाइनसहित पारदर्शक मस्कारा लावा.

लिपस्टिक

लिपस्टिक तुमच्या चेहऱ्यावरचा इलनेस दूर करते. मित्रांना भेटायचे असेल वा आऊटींगला जायचे असेल तर उत्तम ब्रॅड व आपल्या स्किन टोननुसार शेड लावा पण त्यावर लिप ग्लॉस लावू नका, कारण लिप ग्लॉस सहज नाहीसे होते. (पर्याय म्हणून तुम्ही जास्त वेळ टिकणारे शीअर ग्लॉस लावू शकता.)

जर लिपस्टिक लावत नसाल तर आपल्या पर्समध्ये चांगल्या ब्रॅण्डचा लीप बाम अवश्य ठेवा. हे या दिवसात २-३ वेळा लावा, कारण फाटलेले ओठ लुक खराब करतात. म्हणून लीप बाम लावून ओठ मुलायम बनवा. लिपस्टिक बराच काळ टिकावी यासाठी आधी आपल्या ओठांवर पावडरचा हलका थर द्या. मग कापसाने जास्तीची पावडर झटकून टाका. हे तुमच्या लिपस्टिकसाठी योग्य बेसचे काम करते.

जर तुमचे ओठ पातळ असतील तर लिप लाईनच्या बाहेच्या बाजूने लिप लायनरचा वापर करा. जर तुम्हाला तुमचे ओठ पातळ दिसावे असे वाटत असेल तर ओठांच्या आत लिप लायनर लावा. लिपस्टिक लावल्यावर परत एकदा ओठांवर पावडरचा एक थर द्या.

फाउंडेशन

दमट हवामानात मेकअप घामासोबत वाहून जायची शक्यता असते. क्रीम फाउंडेशनऐवजी ऑइलफ्री माइश्चरायझरचा एक थर लावा. टचअपसाठी हलकी कॉम्पॅक्ट पावडर लावा. फाउंडेशच्या जागी मॉइश्चरायझरचासुद्धा वापर करता येतो.

मान्सूनमध्ये नेहमी याकडे लक्ष द्यायला हवे की तुमचे ब्लश व नेहमी सौम्य पण तुमच्या वेशभूषेला जुळणारे असावे. या काळात शिमरी ब्लश वापरू नये, कारण यामुळे चिपचिपा लुक दिसतो, शिवाय पाण्याच्या संपर्कात आल्यास वाहूनसुद्धा जातो. पावडर ब्लशऐवजी तुम्ही क्रीम ब्लश वापरू शकता. जर तुम्हाला थोडे रंग व उठाव हवा असेल तर क्रीम ब्लशवर पावडर ब्लश लावा जेणेकरून ब्लश गालांवर जास्त वेळ टिकून राहील, जे तुमच्या चेहऱ्यावरील चमक आणि रंग वाढवण्यासोबत सौंदर्यसुद्धा वाढवते.

हेअर सिरम

मान्सूनमध्ये चेहऱ्यानंतर केसांनाही खूप त्रास होतो, कारण या ऋतूत जास्त भिजणे व दमटपणामुळे स्कॅल्पमध्ये ओलसरपणा राहतो. त्यामुळे केस जास्त प्रमाणात तुटतात व ओलसरपणामुळे आपली चमक गमावून निर्जीव वाटू लागतात. म्हणून केसांवर सिरमचा वापर करा आणि केसांना गुंतण्यापासून दूर ठेवण्याकरिता त्याची वेणी अथवा अंबाडा बांधा.

मिस्टी स्प्रे

आपला चेहरा चमकदार व ताजातवाना दिसावा यासाठी मिस्टी स्प्रेचा वापर कमीतकमी १० ते १२ इंच अंतरावरुन करा. स्प्रे केल्यावर  ६ ते ७ सेकंद ते सेट होऊ द्या.

घरगुती टीप्स

* पावसाळयात रात्री त्वचेला टोन अवश्य करा. यासाठी एका लहान चमचा दुधात ५ चमेलीच्या तेलाचे थेंब मिसळा आणि हे मिश्रण चेहरा व मानेवर लावा.

* चिपचिप्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी चंदन पावडरमध्ये गुलाबजल मिसळून चेहरा, मान व दंडांवर लावा.

* त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यासाठी मध आणि दही समान प्रमाणात मिसळून चेहरा व मानेवर  लावा. १५ मिनिटं ठेवल्यावर पाण्याने धुवा.

* जर त्वचा शुष्क असेल तर एक मोठा चमचा सायीत गुलाबजल चांगले एकत्र करून चेहरा व मानेवर लावा व  १५ मिनिट ठेवा आणि नंतर धुवून टाका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...