* विजय कुमार पांडे
सेक्समध्ये मोकळेपणा आवश्यक आहे. या भावना जितक्या तुम्ही मनात दाबून ठेवाल तितक्या त्या वर उसळून येतील. पण आता सेक्सही जपूनच करावे लागेल. सेक्ससाठी आधी स्वत:ला तयार करावे लागेल. सेक्सनंतरही तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे सेक्स आयसोलेशन. अनेकदा आपल्या देशात खाजगी अवयवांचा लोक विचारच करत नाहीत. आयसोलेशनचे महत्व ते समजून घेत नाहीत. त्यांचे याकडे लक्ष जात नाही, कारण लहानपणापासून हे शिकवलेलेच नसते पण आता काळ बदलतो आहे. अशावेळी तुम्ही सेक्शुअली आयसोलेट होणे फार गरजेचे आहे. संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. सोशल डिस्टंसिंगवर भर दिला जात आहे. अशावेळी सेक्स करताना सुरक्षित कसे राहावे याकडे लक्ष द्यायची गरज आहे. जर मी सेक्स केले तर मला कोरोना होईल की काय? अशी शंका तुमच्या मनात कितीतरी वेळा आली असेल. पण लाजेमुळे वा भीतिमुळे तुम्ही हे विचारू शकला नसाल.
तर मग या, आम्ही तुम्हाला सांगतो की सेक्स करताना कसे सुरक्षित राहाल कोरोनापासून :
संबंधांवर परिणाम
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि एखाद्या व्यक्तीसोबत राहात असाल, तर थोडे अंतर ठेवून रहा. जर तुम्हा दोघांपैकी एकाला जरी कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर स्वत:ला आयसोलेट करून घ्या. अशावेळी जोडीदाराने वाईट वाटून घेऊ नये. यामुळे दोघेही सुरक्षित राहतील. लक्षात ठेवा सेक्सचा आनंद तुम्ही तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल.
अंकुश ठेवणे गरजेचे
आता किस करताना तुम्ही विचार करायला हवा. आधी किस करणे प्रेमाची खूण मानली जात असे. पण आता हे एका भयानक आजाराचा मार्ग बनू शकतं. याचा अर्थ हा नाही की तुम्ही किस करूच नका. किस करा पण तो सांकेतिक असायला हवा. हो, जर तुमच्यात सर्दी खोकल्याची लक्षणं दिसत असतील आणि तुम्हाला माहीत असेल की नुकतेच तुम्ही कुणाला किस केले आहे, तर तुम्ही हे आपल्या जोडीदाराला सांगाया हवे. जर तुम्ही अशा कुणाला किस केले असेल ज्यात आता अशी लक्षणं दिसू लागली आहेत, तर तुम्ही स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवायला हवे. जर तुम्ही कुणाच्या खाजगी अवयवांना स्पर्श केला असेल तर शक्यता आहे तुम्ही त्याला किससुद्धा केले असेल. तुम्हाला माहीत आहे की हा व्हायरस लाळेद्वारे पसरतो. त्यामुळे किस करणे जोखमीचे आहे. अशात ज्या जोडीदारासोबत तुम्ही राहात नसाल त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवू नका.
चांगले सेक्स लाईफ जगा
या महामारीने लोकांना चांगले सेक्स लाईफ म्हणजे काय यावर विचार करायला भाग पाडले आहे. या आजारामुळेच लोक आज आयसोलेशनमध्ये आहेत आणि ते या संधी आणि दुराव्याचा फायदा उचलत आहेत. ते क्रिएटिव्ह झाले आहेत. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला एकाच घरात आयसोलेशनमध्ये राहावे लागत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ शकता. दूर रहा पण मनं जुळू द्या.
इंटरकोर्समध्ये दक्षता बाळगा
कोरोना कोणालाच ओळखत नाही. तो तर केवळ रस्ता शोधत असतो. इंटरकोर्समुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन संभवू नये यासाठी तुम्हालाच सतर्क राहावे लागणार आहे. स्वच्छतेच्या काही गोष्टींना आपल्या सवयींमध्ये सामील करून घ्या. सेक्सजीवनात सेक्शुअल हायजिन तेवढेच अवश्य आहे जेवढे आपल्या दैनंदिन जीवनात. एका आरोग्य संपन्न सहजीवनाकरिता लैंगिक संबंधांपूर्वी व नंतर स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. अनेकदा लोक सेक्शुअल हायजिनकडे कमीच लक्ष देतात, ज्यामुळे युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा धोका दोघांनाही संभवतो. म्हणून स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. सेक्सनंतर दोघांनाही कितीही झोप येत असली तरी तुम्ही जर हायजिनकडे दुर्लक्ष करत असाल तर इन्फेक्शन व्हायचा धोका आणखीनच वाढू शकतो. इथे तुम्हाला याकडेही लक्ष द्यावे लागेल की तुम्हाला अथवा तुमच्या जोडीदाराला सर्दी खोकला तर झाला नाही ना. अशा वेळी तुम्हाला स्वत:ला आयसोलेट करावे लागेल, कारण थोडया मजेसाठी सगळे आयुष्य तर धोक्यात टाकू शकत नाही ना.
सेक्शुअल वॉशिंग
सेक्सच्या आधी आणि नंतर चांगले हात धुणे अत्यंत आवश्यक आहे, कारण बॅक्टेरिया आणि किटाणू साधारणत: आपल्या हाताद्वारेच पसरतात. सेक्स करताना अनेकदा आपण आपला वा आपल्या जोडीदाराचा जेनेटल पार्ट पेनिट्रेट करण्याकरिता हाताचा वापर करतो. अशावेळी जर आपले हात अस्वच्छ असतील तर बॅक्टेरिया संक्रमित व्हायची भीती असते. म्हणून इंटरकोर्सआधी व नंतर हात चांगले २० सेकंद चोळून धुवायला हवे. लैंगिक संबंधानंतर आपले गुप्तांगसुद्धा स्वच्छ करणे आवश्यक आहे.
संक्रमित गुप्तांग
सेक्सनंतर गुप्तांगांची स्वच्छता आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया संक्रमित होण्यापासून रोखण्यासाठी इंटरकोर्सनंतर पाण्याने गुप्तांग साफ करणे अत्यावश्यक आहे. पाण्यासोबत माईल्ड साबणही वापरू शकता. पण जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला जळजळ होऊ शकते. गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी फॅन्सी लोशन वा परफ्युम वापरण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा. जोडीदारासोबत इंटरकोर्सनंतर जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये खजगी अवयवांची स्वच्छता करायला जाल तेव्हा टॉयलेटला जायला विसरू नका. याचा उद्देश हा आहे की तुमचे ब्लॅडर रिकामे राहावे, कारण सेक्सदरम्यान एखादा बॅक्टेरिया तुमच्या युरेथापर्यंत पोहोचला असेल तर टॉयलेटद्वारे तो शरीराच्या बाहेर निघून जाईल. सेक्सनंतर एक ग्लास पाणी पिऊन मन शांत करा.
कंडोम एक बचाव आहे
कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश लॉकडाऊनमध्ये आहेत. कंडोम बनवणाऱ्या अनेक कंपन्या यातुन सुटल्या नाही आहेत. त्यामुळे कंडोमचा पुरवठा कमी झाला आहे. जगात याचा तुटवडा भासू लागला आहे म्हणून हे बाजारात उपलब्ध नाहीए. जर तुम्हीसुद्धा या परिस्थितीतून जात असाल तर कामवासनेवर नियंत्रण ठेवा आपल्या जोडीदाराशी यावर मोकळेपणाने बोला. जर तुम्ही तुमच्या कामेच्छेवर नियंत्रण ठेऊ शकत नसाल तर अनेक मार्ग आहेत, जे तुम्हाला यावर नियंत्रण ठेवायला मदत करतील. एकदा का तुम्ही असे विचार करू लागलात तर कामेच्छा सातत्याने नियंत्रणात आणणे अशक्य होते. त्यामुळे असे विचार मनात येताच आपले मन दुसरीकडे वळवणे चांगले आहे. सेक्शुअल उर्जेला इतर कोणत्या क्रिएटिव्ह कामात लावा.
लठ्ठ पुरुष व महिलांनी दूरच राहावे
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की ज्या पुरुषाचे वजन जास्त असते , ते जास्त सेक्स करतात. एंगलिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी ब्रिटनमधील ५,००० सेक्शुअली कार्यरत असलेल्या पुरुषांचे विश्लेषण केले आणि ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की लठ्ठ पुरुष बारीक पुरुषांपेक्षा जास्त सेक्स करतात. केवळ पुरुषच नाहीत तर महिलांमध्येसुद्धा असे आढळून आले. संशोधकांना असे आढळले की कमी वजन असलेल्या महिलांच्या तुलनेत जाड महिलांनी १६ पट जास्त सेक्स केले. कोरोनाच्या प्रकोपापासून सुरक्षित राहायचे असेल तर लठ्ठ लोकांनी सध्या सेक्सचा विचारा टाळावा.