* प्रतिनिधी
- माझे पती नुकतेच त्यांच्या अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. मला दोन मुले आहेत, जी विवाहित जीवन जगतात आणि दुसऱ्या शहरात राहतात. माझे पती नोकरीतून सेवानिवृत्त झाले तेव्हा वाटले की आता उर्वरित आयुष्य शांततेत व्यतित करू. पण माझ्या पतिच्या बदललेल्या वागण्याने मला आश्चर्य वाटले. खरं तर पती महिन्यात २-४ दिवस दुसऱ्या शहरात जातात आणि तेथे कॉलगर्लसमवेत वेळ घालवतात. हे सर्व मला त्यांच्या मोबाइलवरून कळाले आहे. दुसरी मोठी समस्या म्हणजे घरात होणाऱ्या पार्ट्यांची, ज्यात खाण्या-पिण्याबरोबर भरपूर मद्यपान चालते आणि आसपास राहणाऱ्या नणंदासुद्धा पार्टीत सामील होण्यासाठी येतात. कधीकधी असे वाटते की मी माझ्या मुलांना ही सर्व माहिती द्यायला हवी, परंतु नंतर असा विचार करून देत नाही की आपल्या वडिलांचा हा घृणित चेहरा पाहिल्यानंतर वडील आणि मुलांमधील नातेसंबंध बिघडतील. मी माझ्या पतिला पुष्कळ वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्तर हेच मिळते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सर्वासाठी घालवले आहे, आता मी फक्त माझ्यासाठी जगेन. पतिला कशाप्रकारे योग्य मार्गावर आणता येईल यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही. कृपया मला सांगा, मी काय करू?
वाढत्या वयानुसार इच्छा किंवा शारीरिक आवश्यकता कमी होत नाहीत. हे चांगले आहे की आपली मुले आपल्या पायावर उभी आहेत आणि चांगले आयुष्य व्यतित करत आहेत, तेव्हा आपल्याकडेसुद्धा जुन्या आठवणींना मुक्तपणे ताजेतवाने करण्यास आणि आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यासदेखील वेळ असेल.
स्वत:ला वृद्ध न मानता काळाबरोबर चला. साजश्रृंगार करा, आपल्या पतीबरोबर चित्रपट पाहा, मॉलमध्ये जा, खरेदी करा, जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्या पतिची जवळीक आवडेल.
जर पतिमध्ये थोडा बदल झाला तर त्यांना प्रेमाने समजावू शकता. आपण आपल्या नणंदानाही असे सांगू शकता की जेव्हा त्या दारू इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहतील तेव्हाच त्यांचे घरी स्वागत होईल. आपणसुद्धा त्यांच्या पार्टीत सामील झालात तर बरे होईल, पण दारूची फेरी होणार नाही या अटीवर.
असे असूनही जर पती आणि नणंदा योग्य मार्गावर येताना दिसत नसतील तर आपण कठोरपणे वागू शकता. जर आपण गोष्टी बिघडत असल्याचे पाहिले तर आपण सर्व काही मुलांसोबत शेअर करू शकता.
तसही, या वयात विवाहित पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते, कारण या वयात येईपर्यंत मुलेही स्थायिक होतात आणि आपापले स्वत:चे कुटुंब आणि करिअर बनविण्यात व्यस्त होतात. जर आपण आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ राहिलात तर त्यांनादेखील आपले पाठबळ मिळेल आणि शक्य आहे की ते योग्य मार्गावर येतील.
- मी एक ३६ वर्षीय महिला आणि ९ वर्षाच्या मुलीची आई आहे. ५ वर्षांपूर्वी पतिचा एका अपघातात मृत्यू झाला. माहेर आणि सासरचे लोकसुद्धा दुसरे लग्न करण्यावर ठाम आहेत, पण नवऱ्याचा चेहरा माझ्या मनातून उतरत नाही. माझ्या माहेर आणि सासरच्यांना एक मुलगा आवडला आहे. मुलगा विनाअट लग्न करण्यासदेखील तयार आहे. मी काय करू?
आयुष्य एखाद्याच्या आठवणी आणि विश्वासाने चालत नाही किंवा थांबत नाही. तुमची मुलगी अजून लहान आहे. उद्या मुलीचे लग्न होईल आणि तीही आपल्या कुटुंबात आनंदी असेल.
आपल्याकडे आता वेळ आहे. म्हणूनच दुसरे लग्न करण्यात काहीही चूक नाही. आपल्या मुलीला योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्याची आणि तिचे लग्न करण्याची जबाबदारी आपण वेळेवर तेव्हाच पार पाडू शकता, जेव्हा आपल्या घर संसाराचा जम बसला असेल. आपली इच्छा असल्यास मुलीच्या पालन-पोषणासाठी आपण भावी पतिशी आधीच चर्चा करू शकता.
- मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. ऑफिसचे वातावरण ठीक आहे, पण मी माझ्या एका सहकाऱ्यावर नाराज आहे. खरंतर तो दिवस-रात्र व्हॉट्सअॅपवर मला मेसेज पाठवत राहतो. तो उत्तर देण्यासदेखील सांगतो, परंतु मला चिड येते. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा भार. वास्तविक, त्याचे संदेश मर्यादेच्या बाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामापासून विचलित होते. माझी अशी इच्छा नाही की त्या सहकाऱ्यामुळे माझ्या कार्यालयीन वागणूकीवर परिणाम व्हावा, परंतु त्याचबरोबर त्याने मला असा त्रास देऊ नये अशीही माझी इच्छा आहे. सांगा, मी काय करू?
आपल्याला त्या सहकाऱ्याचे व्हॉट्सअॅप करणे आवडत नसल्यास आपण त्यास थेट नकार देऊ शकता. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ठीक आहे अन्यथा व्यर्थचे व्हॉट्सअॅप मेसेज करू नका. आपण त्याला असे देखील सांगू शकता की ऑफिसच्या वेळेस व्हॉट्सअॅपवर टाईमपास करून आपली प्रतिमा बिगडेल आणि जेव्हा ही गोष्ट बॉसपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकेल.
तसेच त्याने पाठविलेल्या सततच्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि कुठलाही प्रतिसाद देऊ नका. त्यानंतर काही दिवसांनी तो स्वत:च व्हॉट्सअॅप करणे बंद करेल. अशाने सापदेखील मरेल आणि काठीही तुटणार नाही.