* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून
- माझ् ?या हाताच्या वरच्या भागावर लाल रंगाचे लहान लहान फोड आले आहेत. वास्तविक पहाता मला यामुळे खाज अथवा वेदना होत नाही. पण यामुळे मी बिनबाह्यांचे ड्रेस घालू शकत नाही. हे नाहीसे करायला एखादा उपाय सांगा?
त्वचेवर लाल रंगाचे लहान फोड म्हणजे बंप्स होण्याची समस्या ज्याला केराटोटिस पाइलेरिस म्हटले जाते. जवळपास ५० टक्के माणसं या व्याधीने पीडित असतात. बंप्स सामान्यत: लाल आणि पांढऱ्या रंगाचे मुरमांप्रमाणे दिसतात. प्रत्यक्षात हे इतर काही नसून, मृत त्वचा असते. ज्यात त्वचेवरील केस व्यत्यय आणू शकतात. हे केवळ तुमच्या हातावरच नाही तर पार्श्वभागावर आणि जांघांच्या मागेसुद्धा येऊ शकतात. यातून सुटका मिळवायला तुम्ही दिवसातून दोनदा उत्तम मॉइश्चराइजरचा वापर करा. तुम्ही सेलीसिलिक आणि अल्फा हायड्रॉक्सी निवडू शकता. ए जीवनसत्वयुक्त क्रीमने त्वचेच्या पेशींची स्थिती चांगली होते. एक्सफॉलिएशनमुळे मृत त्वचा पेशीत लक्षणीय घट होते. एक्सफॉलिएटिंग स्क्रबचासुद्धा वापर करू शकता. लक्षात ठेवा की कोणतेही क्रीम लावण्याआधी त्वचाविकार तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. उत्तम परिणाम दिसावे यासाठी या गोष्टींचा वापर नियमित करा.
- माझा चेहरा सतत धुवूनही चिपचिपा दिसतो. मी चेहऱ्याला कोणतेही क्रीम लावत नाही, पण बघताना असं वाटते की मी अनेक क्रीमचे थर चेहऱ्यावर थापते. कृपया एखादा उपाय सांगा?
तुमची त्वचा अतिशय तेलकट आहे आणि अशी त्वचा असणारे लोक आपल्या त्वचेमुळे वैतागलेले असतात. पण जांभूळ ऑयली त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. हे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यात सहाय्यक असते. म्हणून आपल्या त्वचेवर जांभळाचा फेसपॅक लावू शकता. ऑयली त्वचेसाठी जांभळाचा फेस पॅक बनवण्यासाठी याचा गर काढून एका बाउलमध्ये ठेवा. आता नंतर यात एक चमचा आवळयाचा रस आणि एक चमचा गुलाबजल मिसळा. यानंतर हे मिश्रण नीट एकत्र करा आणि घट्ट पेस्ट तयार झाली की हे आपल्या चेहऱ्यावर लावा. २०-३० मिनिटांनी चेहरा धुवा.
- माझे वय २० वर्ष आहे. माझे केस खूपच ऑयली आहेत. यामुळे जवळपास रोजच मला हे धुवावे लागतात. पण आता माझ्या केसात कोंडासुद्धा होऊ लागला आहे. मी काय करू जेणेकरून माझा त्रास दूर होईल?
तुम्ही झेंडूच्या फुलांचे हेअर टॉनिक वापरा. झेंडूच्या फुलात फायटोकॉन्स्टिट्यूंट्स असतात, जे कोंडा नाहीसा करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय हे केसांना चिकट होण्यापासून सुरक्षित ठेवते. ऑयली केस असणाऱ्या व्यक्तींसाठी झेंडूचे फुल हा फारच छान घरगुती उपाय आहे. हे वापरण्याकरिता झेंडूची सुकलेली फुलं कोमट पाण्यात उकळत ठेवा. हे पाणी गाळून घेत चोथ्यापासून वेगळे करा आणि शाम्पू केल्यावर एकदा या पाण्याने आपले केस धुवा. कोंडा निघून जाईल.
- माझी त्वचा ऑइली आहे. मला असे वाटते की ऑयली त्वचेला मॉइश्चराइजर केल्यास ती अजूनच चिपचीपी बनेल. ऑयली त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे का?
हो, ऑयली त्वचेलासुद्धा मॉइश्चराइज करावे लागते. तुम्ही संत्र्यांचा रस आणि कोरफडीचा गर यापासून बनवलेला हायडे्रटिंग फेस मास्क लावू शकता, जो ऑयली त्वचेतील अतिरिक्त सिबम शोषण्यासाठी सक्षम असतो आणि त्वचेला तजेलदार बनवतो. यासाठी सर्वात आधी १ मोठा चमचा संत्र्याचा रस आणि १ चमचा कोरफडीचा गर घ्या. दोन्ही एका वाटीत एकत्र मिसळा. हे चेहऱ्यावर लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ करा आणि स्वच्छ हाताने ही पेस्ट लावा. डोळयांपाशी लावू नका नाहीतर जळजळ होऊ शकते. साधारण २० मिनिट पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
- माझं वय ३० वर्ष आहे. माझ्या चेहऱ्यावरचे त्वचाछिद्र आत्तापासूनच मोठे दिसू लागेल आहेत. मी काय करू की माझ्या चेहऱ्यावरील त्वचाछिद्र बंद होतील. आणि माझी त्वचा पूर्वीसारखी होईल?
कोरफड चेहऱ्याला मॉइश्चराइज करते आणि मोठया त्वचाछिद्रांना संकुचित करते. कोरफडीच्या पानाच्या आत असलेला गर चेहऱ्याला उत्तम पोषण देतो आणि चेहऱ्यावर जमलेले तेल आणि मळ नाहीसे करतो, ज्यामुळे त्वचाछिद्रांवर आकुंचन पावतात. आपल्या चेहऱ्यावरील पोअर्सवर कोरफडीचा थोडा गर लावून थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर १० मिनिट तसेच ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवा.
- माझे वय २५ वर्ष आहे. माझ्या कपाळावर आत्तापासूनच सुरकुत्या आल्या आहेत, ज्या खूपच वाईट दिसतात. या नाहीशा करायला एखादा घरगुती उपाय आहे का?
वयाआगोदर जर तुमच्या कपाळावर सुरकुत्या आल्या असतील तर, जवसाचे तेल हा खूप चांगला आणि तात्पुरता आणि घरगुती उपाय आहे. यात तुम्हाला जवसाच्या तेलाने मालिश करायचे नाही, तर १ चमचा जवसाचे तेल दिवसातून ३-४ वेळा प्यायचे आहे. हे त्वचेच्या बाहेरील थरांना वर आणतात, ज्यामुळे कपाळाच्या सुरकुत्या आणि रेषा कमी होतात.