* अनुराधा गुप्ता

पार्टीवरून घरी परतल्यावर सोनम जेव्हा तिच्या बेडरूममध्ये घुसली, तेव्हा तिथलं दृश्य पाहून ती चकितच झाली. ड्रेसिंग टेबलवर कॉस्मेटिकचं सामान विखुरलेलं होतं आणि तिची १३ वर्षांची मुलगी आलिया नटूनथटून स्वत:ला आरशात न्याहाळत होती. संतापलेली सोनम आलियाच्या गालावर चापट मारत म्हणाली की या मुलांनी वापरायच्या गोष्टी नाहीत.

हे दृश्य होतं पूर्वीच्या काळातील आईंचं. परंतु अलीकडच्या आया मात्र अशा नाहीएत. त्या स्वत: तर मेकअप करतातच, वर आपल्या मुलीलादेखील कॉस्मेटिकचा वापर करण्यास रोखत नाहीत. खासकरून मुलगी टीनएजर असेल तर अजिबातच नाही. आपल्या आईला मेकअप करताना पाहून त्यांनादेखील या गोष्टी वापराव्या वाटतात.

याबाबत कॉस्मेटोलॉजिस्ट व माइंड थेरपिस्ट अवलीन खोकर सांगतात, ‘‘अलीकडे शाळांमध्ये अनेक अॅक्टिव्हिटीज होत असतात आणि यामध्ये मुलांना सजण्यास तसंच प्रेंझेटेबल दाखविण्यासाठी मेकअपचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त अलीकडे टीव्ही सीरियल्स आणि चित्रपटांमध्येदेखील कमी वयाच्या अभिनेत्री आणि मॉडेल्स दिसत असतात. १३ ते १६ दरम्यानचं वय असं असतं, जेव्हा मुली आपल्या लुकवर जरा अधिकच लक्ष देतात. हे वय सिनेतारका आणि मॉडेल्सना जरा अधिकच प्रभावित करतं.

‘‘सिनेमा वा सीरियलमध्ये कोणता नवीन लुक आलाय तो स्वीकारण्याबाबत आईदेखील आपल्या मुलीला रोखू शकत नाही; कारण ती स्वत:देखील तो लुक करून पाहाते. अशावेळी मुलीला वाटतं की जर आई करत असेल तर मीदेखील करू शकते. फक्त हीच बाब आईने आपल्या मुलींना समजावून सांगायला हवी की आई जे कोणतं प्रॉडक्ट वापरतेय ते तिची मुलगी वापरू शकतेच असं नाही; कारण तिची त्वचा अजून केमिकल्सचा हार्डनेस सहन करण्यालायक बनलेली नाही.’’

आईलादेखील माहीत असायला हवं की तिच्या मुलीच्या त्वचेवर कोणती उत्पादनं वापरता येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या त्वचेवर कोणतंही उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या इनग्रीडिएंजेट्वर लक्ष द्यायला हवं. उत्पादनं जर डर्मेटोलॉजिस्टद्वारे अप्रूव्ड असतील, सल्फेटिक अॅसिड आणि मिंट एजेंट असतील, तरच ती उत्पादनं तुमच्या मुलीच्या त्वचेवर वापरा. ज्या प्रॉडक्ट्समध्ये पॅराबीन, पॅथॉलेट्स ट्रिक्लोसन, पर्कोलेटसारखी तत्त्वं असतील, तर कधीच मुलांना वापरायला देऊ नका; कारण ही त्वचेला ड्राय करतात आणि अॅक्नेची समस्या वाढवितात.

फेअरनेस क्रीमविषयीचे गैरसमज

या वयातील मुलींमध्ये खासकरून सावळ्या मुलींमध्ये फेअरनेस क्रीमची खूपच क्रेझ असते. बाजारातदेखील फेअरनेस क्रीमचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की कोणा एकाची निवड करणं कठीण होऊन बसतं. अशावेळी डोळे झाकून आणि ब्रॅण्डच्या भरवशावर क्रीम खरेदी करणं आणि ते वापरण्याशिवाय कोणताही पर्याय राहात नाही. परंतु याबाबत अवलीनचं ऐकलं तर स्किन कलर मेलानिनने बनतो. हा नैसर्गिक असतो. यामुळे चेहरा उजळतो पण कोणतीही क्रीम डस्की स्किनला फेअर बनवू शकत नाही. हे फक्त कॉस्मेटिक सर्जरीनेच शक्य आहे, जे या वयातील मुलींनी अजिबात करता कामा नये. त्वचेचा रंग उजळविण्यासाठी मात्र आयांनी आपल्या मुलींना या टिप्स नक्कीच द्यायला हव्यात :

* उन्हात जाताना वा जात नसाल तर दिवसातून दररोज ३ वेळा चेहरा स्वच्छ करून सनस्क्रीन आवर्जून लावा. खरं म्हणजे, जेव्हा त्वचा सूर्याच्या संपर्कात येते, तेव्हा त्यामध्ये मेलानिन बनू लागतं, ज्यामुळे त्वचेचा रंग फिका पडू लागतो. सनस्क्रीन त्वचेसाठी सुरक्षाकवचाचं काम करतं. हे त्वचेत मेलानिन बनण्यापासून रोखतं, सकाळी शाळेत जाताना मुलीला आवर्जून सनस्क्रीन लावायला सांगा. लक्षात ठेवा की कॉस्मेटिक ब्रॅण्ड्सचं सनस्क्रीन घेण्याऐवजी मेडिटिड सनस्क्रीन मुलीसाठी निवडा. कॉस्मेस्यूटिकल सनस्क्रीन वापरू नका. जेव्हा मुलगी घरी येईल तेव्हादेखील तिला सनस्क्रीन लावायला सांगा; कारण ट्यूबलाइट आणि बल्बमध्येदेखील अल्ट्राव्हायलेट किरणं असतात, जी त्वचेत मेलानिन बनविते.

* अनेकदा आया मुलीचा रंग उजळविण्यासाठी वर्तमानपत्रं आणि टीव्हीवर येणाऱ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींना भुलून महागड्या क्रीम्स विकत घेतात, परंतु त्याचा परिणाम मुलीच्या त्वचेवर दिसत नाही. त्यामुळे वारंवार क्रीम्स बदलण्याऐवजी योग्य म्हणजे जी कोणतीही क्रीम विकत घ्याल त्यावरच्या पॅकवर लिहिलेले इनग्रीडिएंट्स वाचा. खरंतर, ब्लीच एजेंट, हायड्रोक्यानिक आणि कोजिक अॅसिड असणाऱ्या फेअरनेस क्रीम घेण्याऐवजी लायकोरिस, नियासिनेमाइड आणि एलोवेरोयुक्त फेअरनेस क्रीम्स विकत घ्या. या चेहऱ्याचा रंग फेअर करतात.

त्वचेचा टेक्स्चर ओळखा

या वयाच्या जवळजवळ सर्वच मुलींची मासिकपाळी सुरू झालेली असते. यामुळे त्यांच्यात हार्मोनल बदलदेखील होतात, ज्याचा परिणाम त्वचेवरदेखील होतो.

द स्किन सेंटरचे डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर वरुण कतियाल सांगतात, ‘‘त्वचेचा टेक्स्चर ४ प्रकारचा असतो-ऑयली, नॉर्मल, कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह. तुम्हाला जर तुमच्या मुलीचा स्किन टेक्स्चर ओळखायचा असेल तर सकाळी जेव्हा ती झोपून उठेल तेव्हा तिच्या चेहऱ्याचा टी झोन आणि यू झोनवर एक टिश्यू पेपर लावा आणि पाहा की कुठे अधिक तेल आहे. जर टी आणि यू दोन्ही झोनवर तेल असेल तर त्वचा तेलकट आहे. जर टीवर तेल आहे आणि यूवर नाही, तर त्वचेचं टेक्स्चर कॉम्बिनेशन आहे.

‘‘बाजारात प्रत्येक त्वचेनुसार प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. तरीदेखील प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे लिहिलेलं असतं की प्रॉडक्ट कॉमेडोजेनिक आहेत वा नॉन कॉमेडोजेनिक आहे. मुलीला कधीही कॉमेडोजेनिक प्रॉडक्टचा वापर करू देऊ नका; कारण यामुळे त्वचेची छिद्रं ब्लॉक होतात, त्यामुळे मुरुमं होण्याचा धोका निर्माण होतो.’’

सुगंधी उत्पादनं नुकसानकारक

या वयातील मुलं रंग आणि सुवासाकडे अधिक आकर्षित होतात; खासकरून मुली. त्यांचा असा समज असतो की रंग आणि सुगंधाच्या प्रभावामुळे त्यांची त्वचा सुंदर होईल. खरंतर हे नुकसानदायक आहे. एक आईच आपल्या मुलीला हे समजावू शकते की हे वय त्वचेला व्यवस्थित स्वच्छ करण्याचं आहे, आर्टिफिशियल लुक देण्याचं नाही.

याबाबत एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर अमित बांगिया सांगतात, ‘‘बाजारात अनेक उत्पादनं आहेत आणि त्यावर लिहिलेलं असतं की हे उत्पादन एलोव्हेरो, रोजमेरी, जस्मिन वा मग कोकोनटयुक्त आहे. सोबतच या उत्पादनातून तसाच सुगंधदेखील येत असतो. परंतु खरंतर सुवासिक उत्पादनांमध्ये फक्त इसेन्स आणि केमिकलबरोबरच काहीच नसतं. एवढंच नाही तर ही फ्रेगरन्सची उत्पादनं तुमच्या मुलीच्या एस्ट्रोजन हार्मोनलादेखील प्रभावित करतात ज्यामुळे ती चिडचिडी होऊ शकते आणि तिचं वजनदेखील वाढू शकतं. त्वचेवर जो परिणाम होईल तो वेगळाच. म्हणूनच बाजारातील उपलब्ध ऑर्गेनिक उत्पादनांचाच वापर तुमच्या मुलीच्या त्वचेवर करा.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...