डॉ. संदीप मेहता, बीएलके सुपरस्पेशालि हॉस्पिटल,नवीदिल्ली

प्रश्न : मी ४७ वर्षांची नोकरदार स्त्री आहे. मी वयाच्या ४२व्या वर्षीच रजोनिवृत्त झाले आहे. पण तेव्हापासून कूस बदलल्यावर मला स्तनांमध्ये वेदना जाणवते. मला कोणत्या प्रकारची तपासणी करायला हवीय?

उत्तर : याला मस्टाल्जिया म्हटलं जातं. स्तनांमध्ये वेदना स्तनरोगाचं कोणतंही लक्षण असू शकतं. तुम्ही एखाद्या तज्ज्ञ कॅन्सर सर्जनकडून तुमच्या स्तनांची तपासणी करून घ्यायला हवीय. जर तुमचे स्तन कडक झाले असून तुमच्या डॉक्टरांना तपासणीदरम्यान एखादी गाठ वगैरे दिसत असेल तर तुम्ही तुमच्या ब्रेस्टचा एमआरआय करणं जास्त योग्य ठरेल.

प्रश्न : मी ३७ वर्षांची गृहिणी आहे. गेल्या सहा वर्षांपासून मी गर्भनिरोधक गोळ्या खात आहे. पण मी असं ऐकलं आहे की अशा गोळ्यांचं सेवन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. हे सत्य आहे का?

उत्तर : पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. खरंतर अलीकडे गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये हार्मोन्सचं प्रमाण कमी ठेवलं जातं. त्यामुळे याचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण ज्या स्त्रियांच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास राहिला आहे तिने अशा गोळ्यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

प्रश्न : दोन वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचं ओव्हरियन कॅन्सरमुळे निधन झालं होतं. तिला २ मुली. एक १६ वर्षांची आणि एक १० वर्षांची आहे. डॉक्टर सांगतात की जर आईला कॅन्सर झाला आहे तर मुलांनाही कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणूनच जर भविष्यात अशा कुठच्या धोक्यापासून बचावयाचं असेल तर आम्ही काय करायला हवं?

उत्तर : मुलींना ओव्हरियन कॅन्सरची भीती (सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत ३ ते ६ पट) जास्त असते. दोन्ही मुलींसाठी सद्या एकच सल्ला आहे की त्यांनी दरवर्षी सीए १२५ची तपासणी करत राहावं आणि ओव्हरियन कॅन्सरची तपासणी करण्यासाठी ट्रांसवेजिनल अल्ट्रासाउंड करून घ्यावा. त्यांनी बीआरसीए १ आणि बीआरसीए २ सारखी अेनेटिक म्यूटेशन तपासणीही करून घ्यायला हवी. जर याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर अपत्य जन्माला न घालण्याचा निर्णय घेऊन त्यांना याचा धोका कमी करणाऱ्या साल्पिंगो उफोरेक्टोमिया (या सर्जिकल प्रक्रियेत स्त्रीची ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब्स काढून टाकल्या जातात) वरही विचार करायला हवाय. अशाप्रकारच्या तपासणीचा सल्ला सामान्यपणे ३०-३५ वर्षांच्या स्त्रीला दिला जातो. पण तुम्ही तुमच्या बहिणीच्या मुलींचा हा सर्जिकल उपचार त्यांची आई ओव्हरियन कॅन्सरने ग्रस्त झाल्याच्या वयापेक्षा १० वर्षं कमी वयातही करून घेऊ शकता. त्या कमी वयात हा धोका कमी करण्यासाठी आपली ओव्हरी काढू शकतात.

प्रश्न : लहानपणी भाजल्यानंतर कोणाला नंतर कॅन्सर होऊ शकतो का? जर होय, तर यापासून बचावण्याचं पहिलं पाऊल काय असायला हवंय?

उत्तर : भाजल्यामुळे अस्थायी डाग पडतात, ज्यामुळे अशी त्वचा आकसली किंवा ताणली जाते आणि त्याची हालचाल सीमित होऊन जाते. जसं की, टाचा किंवा गुडघ्यांच्या सांध्यामध्ये अनेक वर्षांनी कॅन्सरची जखम बनण्याची शक्यता निर्माण होते. भाजल्यामुळे त्वचेला झालेल्या अपायांवर उपचार करण्यासाठी बचावण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर स्किन ग्राफ्टिंग किंवा फ्लॅप करणं आहे.

प्रश्न : प्रत्येकाला एचपीव्ही लस टोचून घ्यायला हवीय का? ही लस टोचून घेतल्याचा काही धोकाही आहे का?

उत्तर : एचपीव्ही पुरुष आणि स्त्रियांमध्ये आनुवंशिक गाठीचं मुख्य कारण असतं. हे स्त्रियांच्या गर्भाशय, गुप्तांग आणि योनिमार्गाच्या कॅन्सरचंही कारण ठरतं. पुरुषांना लिंग कॅन्सर आणि स्त्री व पुरुष दोघांना यामुळे गुदद्वार आणि गळ्याचाही कॅन्सर होऊ शकतो. यापैकी अनेक रोगांपासून एचपीव्ही लस घेऊन बचावलं जाऊ शकतं.

एचपीव्ही लस ११-१२ वर्षांच्या मुलामुलींना घेण्याचा सल्ला दिला जातो. किशोरावस्थेच्या आधीचं वय लस घेण्यासाठी सर्वात योग्य असतं. कारण पहिल्यांदा यौन संपर्कात येणं आणि वायरसच्या पहिल्या संपर्कात येण्याच्या खूप आधी ही लस फारच प्रभावीपणे काम करते. किशोरावस्था ओलांडणारे आणि   तारुण्यावस्थेत पोहोचणाऱ्यांनाही एचपीव्ही लसीचा फायदा होऊ शकतो. मग ते सेक्सुअलरीत्या सक्रिय असले तरी ही लस त्यांना एचपीव्हीच्या सर्वात सामान्य टाइपपासूनही वाचवेल.

एचपीव्हीचे जवळजवळ ४० वेगवेगळे प्रकार आहेत. मुली वयाच्या सव्वीसाव्या वर्षांपर्यंत ही लस घेऊ शकतात तर मुलं वयाच्या एकविसाव्या वर्षांपर्यंत ही लस घेऊ शकतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...