* दीपिका
ही दिवसभरातील १५-१६ तास फोनवरच असता का? तसंच तुम्ही सकाळ होताच व्हाट्सऐप वा फेसबुक चेक करू लागता का? तुम्हाला सतत तुमच्या फोनची घंटी वाजतेय असं वाटत राहतं आणि जेव्हा तुम्ही फोन चेक करता तेव्हा फोन आलेला नसतो. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती लवकरात लवकर बदला, कारण तुम्ही जर असेच सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेळ घालवत असाल तर तुम्हाला गंभीर आजार होऊ लागतात. उदाहणार्थ, तुम्ही जर फेसबुक, ट्व्टिर वा व्हॉटसऐपवर दिवसभर वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला डिप्रेशन, पाठदुखी, डोळ्यांचे त्रास इत्यादी समस्यांशी सामना करावा लागेल.
चला तुम्हाला सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि नुकसान यांची ओळख करून देऊया :
प्रत्येक गोष्ट सहजसोपी
फेसबुक असो वा मग व्हॉटसऐप यामुळे लोक एकमेकांच्या खूपच जवळ आले आहेत. तुमचा एखादा मित्र वा नातेवाइक सातासमुद्रापलिकडे राहत असेल तर तुम्ही फेसबुक वा मग इतर नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधू शकता. चौकशी करू शकता. तुम्ही फ्रीमध्ये परदेशात राहणाऱ्यांशी गप्पा मारू शकता. जरा आठवा, जेव्हा परदेशात राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी बोलण्यासाठी ४० ते ५० रुपये प्रति मिनिट खर्च करावे लागत होते. परंतु आता सोशल नेटवर्किंगने प्रत्येक गोष्ट सहजसोपी झालीय.
नेटवर्किंग साइट्स बिझनेसचा अड्डा
अलीकडे हा ट्रेण्ड खूपच पहायला मिळतोय. बिझनेसमन आपल्या प्रोडक्ट्सची डिटेल्स फेसबुकवर टाकतात वा फेसबुकवर स्वत:चं पेज बनवतात. एखाद्याला जर प्रोडक्ट्स आवडले तर ते खरेदी करतात, ज्याचा फायदा बिझनेसमनला मिळतो. सोशल नेटवर्किंग साइट्सचा जर विचारपूर्वक विचार केला तर यापासून मोठा फायदादेखील होऊ शकतो. मोठमोठ्या कंपन्या अलीकडे फेसबुक वा मग ट्विटरवर जाहिरातींच्या माध्यमातून बराच पैसा कमावत आहेत.
माहिती देण्याचं सर्वोत्तम व्यासपीठ
जर एखादी माहिती वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवू इच्छित असाल तर सोशल नेटवर्किंग तुमच्यासाठी सर्वोत्तम मंच ठरू शकतो. अलीकडे लोकांना आपली समस्या वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकतात, ज्यामुळे गोष्ट वणव्यासारखी पसरते आणि त्यांना लोकांकडून त्वरित प्रतिक्रियादेखील मिळत राहतात.
केवळ फायदेशीर नाहीत या नेटवर्किंग साईट्स, यांचे काही तोटेदेखील आहेत. या, आता तुम्हाला सोशल नेटवर्किंग साइट्सने होणाऱ्या तोट्यांबद्दलही सांगतो.
प्रायव्हसी राहत नाही
अनेकदा लोक सकाळी उठताच फोनचा चेहरा पाहतात. दिवसभर फोनवर गप्पा मारूनदेखील रात्रीदेखील फोनवर असतात. कधी फेसबुक चेक करतात, तर कधी व्हॉट्सऐप. सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रायव्हसी अशी राहतच नाही. कोणीही, कधीही आपल्याबद्दल सर्च करू शकतो. जसं की आपण काय करतो? कुठे राहतो? कोण कोण आपल्याजवळ आहे? हे योग्य आहे का? स्वत: विचार करा आणि ठरवा. नेटवर्किंग साइट्सवर एवढी माहिती टाकणं योग्य आहे का?
आजारपणाला आमंत्रण
एका रिसर्चनुसार सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करणारे कमीत कमी १६-१७ तास त्यातच घालवतात. रात्रीच्यावेळी अंधारात फोनवर चॅट करतात. कायम ऑनलाइन राहतात. कमीत कमी दर १०-१५ मिनिचांनी आपला फोन वारंवार चेक करतात, ज्यामुळे डोळे खराब होऊ शकतात. काळोखात जेव्हा फोनचा वापर केला जातो, तेव्हा आपली पाहण्याची क्षमता कमी होते. दिवसभर सिस्टमवर फेसबुक खोलून बसून राहिल्याने वा स्काइपवर व्हिडिओ चॅट करत राहिल्याने पाठीच्या कण्यात फरक पडतो. सतत फोनचा वापर करून डिप्रेशनदेखील येऊ शकतं.
वेळेचा अपव्यय
अनेकदा आपण आपलं महत्त्वाचं काम सोडून फोनवर मॅसेज चेक करायला लागतो. मॅसेज चेक करता करता केव्हा दीर्घकाळ चॅट होतं, ते समजतच नाही. यामुळे वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे फोनचा वापर कमी करा.
मुलं बिघडत चाललीत
पूर्वी मुलं आजीआजोबांसोबत वेळ घालवत असत. आपल्या मित्रांसोबत संध्याकाळी खेळत असत. परंतु आता मुलं स्वत:मध्येच गुंतून असतात. त्यांच्याकडे कोणासाठी वेळच नाहीए. आईवडिल हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे. अगोदरच मुलांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात.
लॅपटॉप, महागडे फोन मिळाल्यामुळे मुलं दिवसभर त्यामध्येच अडकून राहतात. फोन वा लॅपटॉपवर पोर्न मूव्हिज पाहू लागतात, ज्याचे दुष्परिणाम लवकरच आईवडिलांसमोर येऊ लागतात
कसा कराल योग्य वापर
* फोनचा वापर कमीत कमी करा.
* सतत ऑनलाइन राहू नका.
* प्रथम महत्त्वाची कामे करा.
* काल्पनिक मित्रांसोबत गप्पा मारण्यात
वेळ घालविण्याऐवजी स्वत:ला वेळ द्या.
* प्रत्येक गोष्ट फेसबुकवर टाकू नका.
* वैयक्तिक गोष्टी सोशल नेटवर्किंग
साइट्वरून दूरच ठेवा.
* वारंवार फोन चेक करू नका.