* डॉय सिमरन सॅनी, फोर्टिस हॉस्पितल

अनेकदा म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचं भोजन आहे. कारण रात्रभराची झोप आणि १२ तास वा अधिक वेळ अन्नाविना राहिल्यामुळे जेव्हा आपल्या शरीराला पोषणाची गरज भासते आणि त्याची आपूर्ति सकाळचा नाश्ता पूर्ण करतो. याव्यतिरिक्त जागे झाल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये काम करण्यासाठी ग्लूकोजचा वापर होतो. सकाळचा नाश्ता ग्लूकोजचं प्रमाण बॅलेन्स करतो आणि तुमच्या पाचनशक्तीला पुन्हा क्रियाशील बनवतो.

याव्यतिरिक्त, सकाळचा नाश्ता करण्याचे इतर फायदेदेखील आहेत. हा तुमची स्मरणशक्ती वाढवतो आणि तुमचं वजन समतोल ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका

साकारतो. सकाळचा नाश्ता नियमित न करणाऱ्यांना दिवसभरात जेव्हा भूक लागते, तेव्हा ते अधिक खातात, त्यामुळे त्याचं वजन वाढतं. सकाळचा नाश्ता करण्याची चांगली सवय ही उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह पिडित लोकांसाठी सहाय्य ठरते.

पोषक तत्त्वांनी परिपूर्ण

न्यूट्रिशनिस्ट नेहमीच सांगतात की सकाळचा नाश्ता हा जागे झाल्यानंतर २ तासातच करायला हवा. परंतु तुम्ही काय खाता हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सकाळचं हे पहिलं खाणं कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन बीसारख्या आवश्यक पोषक मुल्यांनी परिपूर्ण असावं. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या देशात सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ले जाणारे पदार्थ हे अनारोग्यकारक असतात. त्यामध्ये वापरली जाणारी साखर, लोणी, तूप आणि तेल इत्यादी पदार्थांमुळे तो हानिकारक ठरतो.

तेलकट अन्नामध्ये चरबीचं प्रमाण अधिक असतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामध्ये कॅलरीज आणि चरबीदेखील अधिक असते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि

खराब कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. रक्त वाहिन्यांमध्ये मेद आणि प्लाक हळूहळू जमा होत राहिल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शेवटी हृदयरोग म्हणजेच स्ट्रोक होतो. उच्च रक्तदाबामुळे पित्ताचा असमोतल वाढण्याची शक्यता असते.

नवी दिल्लीच्या फोर्टिस इस्पितळाच्या कन्सल्टंट डॉ. सिमरन सॅमी यांनी सांगितलं की नाश्त्यामध्ये तूप आणि लोणी यांचा सढळ वापर होणं आरोग्यासाठी घातक असतं. पुरी, बटर लावलेले पराठे, मैद्याची रोटी आणि ब्रेड रोलसारखे तळलेले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. तेलकट, चरबीयुक्त व गोड पदार्थांमुळे पचनयंत्रणा बिघडते. त्यामुळे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्या आहारात तूप, लोणी आणि साखर यांचा नियमित वापर करण्याऐवजी आरोग्यदायक पदार्थांचा वापर करणं ही निरोगी जीवनशैलीची गरज आहे.

गोड कमी खा

उत्तम आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अतिरिक्त मिठ आणि शर्करायुक्त पदार्थांऐवजी उच्च फायबर आणि कमी मीठ असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याची अधिक गरज आहे. गोड पदार्थांची आवड असणाऱ्यांनी सुरक्षित पर्याय म्हणून साखरेला मीठाचे उपलब्ध पर्याय वापरावेत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आरोग्याशी संबंधित पिडित लोकांनादेखील मदत मिळू शकेल. स्टेल्विया, एस्पारटेम आणि सुक्रेलोस साखर याचे पर्याय आहेत, जे जगभरात लोकप्रिय आहेत आणि आपल्या देशातदेखील उपलब्ध आहेत. परंतु याचा वापर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा.

सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अशा पदार्थांचा वापर करा ज्यामध्ये फायबर प्रोटिन आणि कार्बोहायडे्रट अधिक प्रमाणात असतील तसंच मीठाचं प्रमाणदेखील कमी असेल. आपला आहार सतत बदलत राहा. एकच पदार्थ दररोज खाऊ नका. नाश्त्यामध्ये विविधता ठेवा आणि थोड्या थोड्या प्रमाणात पदार्थ खा.

सकाळच्या आरोग्यदायक नाश्त्यामध्ये रवा, पोहे, फळांचं सॅलड, पोळी, मल्ट्रीग्रेन डोसा, उपमा, सांबर, डाळ, सोया, मोडाची धान्य, भाज्यांचे सॅण्डविच, मका, फॅट नसलेलं दूध व दही, लस्सी, कॉटेज चीज, ताज्या फळांचा रस, ब्राउन राइस, केळ, टरबूज किंवा सफरचंदसारख्या फळांचा समावेश करा. साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ उदाहरणार्थ पेस्ट्री आणि डबाबंद फळं खाऊ नका. भरपूर तूप वा तेलयुक्त पराठे आणि ऑमलेट खाऊ नका. याशिवाय अधिक लोणी वा तूप, मैद्याचा रोटी, भात, फ्रेंच टोस्ट, चरबीयुक्त मटन, मलईयुक्त दही आणि अन्य पदार्थ खाऊ नका. लोणी आणि साखरेचे आरोग्यदायी पर्याय निवडा.

सकाळचा पोषक नाश्ता लहान मुलं आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी अधिक गरजेचा आहे. जे सकाळी पौष्टिक नाश्ता करतात, त्यांना शारीरिक व मानसिक कामे करण्यास अधिक उर्जा मिळते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि दररोजच्या दिनचर्येशी संबंधित आजारपण दूर पळविण्यास मदत होते.

अशी मुलं शाळांमध्येदेखील अधिकाधिक सक्रीय असतात. चिडचिडेपणा, बेचैनी, थकवा या मुलांमध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. यासाठीच प्रत्येकाने मग लहान असो वा मोठे सकाळचा नाश्ता अधिक गांभीर्याने घ्यायला हवा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...