* पारुल भटनागर
साधारणत: आपण फेस मेकअपवर लक्ष देतो आणि लिपस्टिककडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे चेहऱ्यावर ते तेज आणि चमक येऊ शकत नाही जी यायला हवी. जेव्हा की लिपस्टिकची मेकअपमध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका असते. साधे लिपस्टिकसुद्धा सगळया चेहऱ्याचा लुक बदलवून टाकते. मग अशावेळी गरज आहे मेकअपला लिपस्टिकने फायनल टच देण्याची.
मेकअपतज्ज्ञसुद्धा कबूल करतात की लिपस्टिक गेमचेंजर असते. भले ती आपण शेवटी लावतो. पण ही सगळयात महत्वाची आणि आवश्यक स्टेप असते, जी संपूर्ण चेहऱ्याचा लुक बदलवायचे काम करते.
अलीकडे बाजारात ढीगभर लिपस्टिकची व्हरायटी आली आहे, जी चेहऱ्यावर वेगवेगळा परिणाम दर्शवते. म्हणून हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि फिनिशिंगच्या हिशोबाने कोणती लिपस्टिक वापरू इच्छिता.
लिपस्टिकचे प्रकार
मॅट लिपस्टिक, टीकते खूप वेळ : मॅट लिपस्टिक क वेगळा प्रभाव टाकते. विशेषत: याचे मॅट फिनिश वेलवेट टेक्स्चर आणि उत्तम कलर्सचे आउटपुट महिलांना फार आवडते.
ही लिपस्टिक विशेषत: पिगमेंटेड लिप्सकरीता खूप चांगली आहे.
लिप क्रीम देतं एक्स्ट्रा मॉइश्चर : अनेकदा ऋतू बदलल्याने आपले ओठ रुक्ष होतात, ज्यासाठी गरज असते ओठांना मॉइश्चर देण्याची आणि यासाठी लिप क्रीमपेक्षा दुसरे काहीच चांगले नाही. कारण त्यात वॅक्स आणि भरपूर प्रमाणात तेल असल्याने ओठांना अतिरिक्त मॉइश्चर देण्याचे काम करते. हे तुम्ही रोज लावून छान फिल करू शकता.
लिप क्रेयॉनने मिळवा स्मूद टच : मेकअप प्रॉडक्ट्स कोणाला आवडत नाही. अशात लिप क्रेयॉन खूप चांगले असते, कारण एकतर स्मूद फिनिशसोबत याचे टेक्श्चर खूपच सॉफ्ट असते. तसेच तुम्ही हे लिप लायनरप्रमाणे अथवा लिप कलर करण्याकरिता वापरू शकता.
लिप ग्लॉसने मिळवा ग्लॉसी लिप्स : ग्लॉसी लिप्स जितके छान दिसतात, तितकाच त्याचा आऊटफिट्सची ग्रेस वाढवण्यात महत्त्वाचा वाटा असतो. अलिकडे लिपस्टिकमध्ये लिपग्लॉसची मागणी वाढली आहे, कारण यामुळे पातळ आणि लहान ओठ योग्य आकारात नजरेत भरतात आणि रुक्ष ओठांचा कोरडेपणासुद्धा नाहीसा होतो. कारण यात मॉइश्चर खूप जास्त असते. शिवाय याचे सेमी शीर फिनिश ग्लॉस लुक आणखीनच सुंदर करते.
लिक्विड लिपस्टिक टिकते खूप वेळ : ही आपल्या टेक्स्चरमध्ये ग्लॉसी असल्याने लावल्यावर तुम्हाला सेमीमॅट फिनिश देते आणि खूप काळ टिकून राहते.
लिप स्टेन : हे लिक्विड आणि जेल रूपात असते, जे लवकर वाळण्यासोबतच खूप काळ टिकून राहते.
लिप लायनरने द्या योग्य आकार : साधारणत: आपण लिपलायनर लिपस्टिक आणि ग्लॉसला योग्य आकार देण्यासाठी वापरतो. आजच्या काळातील मेकअपप्रेमी लिपलायनरला टु इन वन म्हणजे ओठांची आऊटलाईन करण्यासोबतच रंग भरण्यासाठीसुद्धा वापरतात.
लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत
अनेकदा आपण छान शेडची लिपस्टिक खरेदी करतो पण तरीही ती ओठांवर तेवढी सुंदर दिसत नाही, जेवढी दिसायला हवी. अशावेळी योग्य पद्धतीने लिपस्टिक लावायची गरज असते. यासाठी या गोष्टी आत्मसात करा.
* ज्याप्रमाणे चेहऱ्यासाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे, जेणेकरुन मृत त्वचापेशी नाहीशा होतील. अगदी त्याचप्रमाणे ओठांसाठीसुद्धा जेणेकरुन ओठ सॉफ्ट दिसतील.
* लिप प्रायमर ओठांना स्मुद करण्यासोबत तुमच्या शेडला खूप काळ टिकवून ठेवण्याचे काम करते आणि तुम्हालासुद्धा हेच हवे असते.
* प्रायमरनंतरसुद्धा जर तुमचे ओठ पिगमेंटेड वाटत असतील तर त्यावर कंसीलर लावा.
* परफेक्ट पाऊट देण्यासाठी तुमचा चेहरा नेहमी तयार असायला हवा यासाठी ओठांना आकार देणे खूप गरजेचे असते.
* शेवटी आपल्या ओठांना कलारबार वेल्वेटमेंट लिपस्टिक फ्युशियाने फायनल टच द्या.
आता तुम्हाला कळले असेल की लिपस्टिक योग्य पद्धतीने लावली तर किती अमेझिंग लुक मिळतो.
पण अनेक असे प्रश्न जे नेहमी लिपस्टिक लावताना आपल्यासमोर उभे ठाकतात आणि आपण ते समजू शकत नाही की अशा परिस्थितित हे कसे सोडवायचे. या जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित उत्तरं.
लिपस्टिक खूप काळ राहण्यासाठी काय करावे?
लिपस्टिक खूप काळ टिकवून ठेवण्यासारही तुम्ही सगळयात आधी लिपस्टिक लावा. त्यानंतर आपल्या ओठांमध्ये ब्लॉटिंग पेपर लावून दोन्ही ओठ दाबा. नंतर ते काढून परत लिपस्टिक लावा. तुम्ही पाऊटवर टिशू पावडर लावून लिपस्टिकचा दुसरा थर लावू शकता.
लिपग्लॉसला मॅट लुक कसा द्यायचा?
सगळयात आधी लिप ग्लॉस लावा. मग ओठांमध्ये ब्लॉटिंग पेपर ठेवून हलके दाबा. यानंतर स्पंज अॅप्लिकेटरने साधी पावडर लावा. ही क्रिया तोवर करत राहा, जोवर तुम्हाला हवा तसा लुक मिळत नाही.
मॅट लिपस्टिकने कसा मिळेल ग्लॉसी टच?
मॅट लिपस्टिकवर थोडासा क्लिअर लिप बाम व ग्लॉस लावल्याने तुम्हाला ग्लॉसी लुक मिळू शकतो.
लिपस्टिकसा इतर मेकअप प्रोडक्टच्या रूपात वापरू शकतो का?
अर्थातच, तुम्ही लिपस्टिक ब्लश अथवा आय शॅडो म्हणून वापरू शकता. तुम्ही न्यूड शेडचा फेस काँटूर आणि व्हायब्रण्ट शेड्सचा कलर करेक्टर म्हणून वापर करू शकता.