* डॉ. मुनीष पॉल
आईने जेव्हा समजावलं होतं की मनगटावर काढलेल्या टॅटूमुळे तुला मनस्ताप सोसावा लागेल तेव्हा तू दुर्लक्ष केलं होतंस. मात्र जेव्हा ४ वर्षांनंतर एका आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली तेव्हा मात्र हा टॅटू करिअरच्या आड तर येणार नाही ना याचीच चिंता सतावू लागलीय.
असो, अशी चिंता सतावणारे तुम्ही काही एकटेच नाही आहात. गेल्या काही वर्षांत टॅटू भारतीय युवा संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनलाय.
अनेक त्वचा तज्ज्ञ तर चेतावनी देतात की टॅटू पूर्णपणे काढणं शक्य नाहीए. कारण हा स्थायी असतो, त्याला काढून टाकणं खूपच कठीण आहे. परंतु काही सर्जन असेदेखील आहेत, जे टॅटू पूर्णपणे काढण्याची गारंटी देतात. टॅटू काढण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्या खरोखरंच परिणामकारक आहेत. यामध्ये सर्वप्रथम टॅटूचा आकार त्याची जागा, घाव भरून येण्याची व्यक्तिगत समस्या, टॅटू कसा बनविण्यात आला होता आणि टॅटू त्या जागी किती वर्षं काढला आहे याचा विचार केला जातो. उदाहरण द्यायचं तर जर टॅटू एखाद्या अनुभव आर्टिस्टकडून काढून घेतला असेल, तर तो काढून टाकणं अधिक सहजसोपं होतं. कारण त्याने वापरलेले रंग त्वचेच्या समान स्तरावर समान पद्धतीने भरले गेलेले असतात. जुन्या टॅटूपेक्षा नवीन टॅटू हटवणं अधिक कठीण होऊ शकतं.
टॅटू काढण्याच्या प्रक्रियेचा विकास
तुम्ही जर ५ वर्षांपूर्वी टॅटू काढण्याचा विचार केला असता तर त्यावेळची प्रक्रिया खूपच वेदनामय, अधिक महागडी आणि १०० टक्के परिणामकारक असेलच याची खात्री देणारी नव्हती. परंतु आता लेझर तंत्रज्ञान इतकं आधुनिक झालंय की हा उपाय खूपच सुरक्षित आणि आरामदायक बनलाय. याबरोबरच याच्या परिणामाबद्दल अगोदरच आपण अनुमानदेखील वर्तवू शकतो.
टॅटू हटविणे वा त्यापासून सुटका करण्यामागे बरीचशी कारणं असू शकतात. टॅटूसंबंधित काही गोष्टींचं ओझं वा लग्नासाठी वा नोकरीसाठी किंवा इतर कोणतंही कारण असो लेझर तंत्रज्ञानाने टॅटू मिटवणं अतिशय सुरक्षित आहे.
लेझर रिमूव्हल तंत्रज्ञान
टॅटू बनविण्यात वापरली जाणारी शाई, शिसं, तांबे आणि मॅग्निजसारख्या सघन धातूंनी तयार मिश्रित पदार्थांनी मिळून बनलीय. काही लाल शाईंमध्ये पारा म्हणजेच मर्क्युरीदेखील असतो. याच धातूंमुळे टॅटू स्थायी होतो. म्हणून टॅटू हटविण्याच्या वा तो बदलण्याच्या अनेक पद्धतींमध्ये टॅटूचं लेझर तंत्रज्ञान सर्वात योग्य पर्याय आहे. ही प्रक्रिया साधारणपणे टॅटूच्या रंगांना हटविण्याची एक गैरप्रक्रिया (क्यूस्विच लेद्ब्रारचा वापर करत) असते.
साधारणपणे बहुरंगीय टॅटूपेक्षा वा काळ्या वा इतर गडद रंगाचा टॅटू काढणं तसं सहजसोपं आहे.
या प्रक्रियेच्या दरम्यान लेझर किरणं त्वचेमध्ये जाऊन टॅटूची शाई शोषून घेतात. विविध रंगाच्या टॅटूसाठी वेगवेगळ्या लेझरची गरज लागते, ज्याची एक अवशोषण तरंग असते, जी या रंगाशी मिळतीजुळती असते. उदाहरण म्हणून काळ्या शाईला लक्ष्य करण्यासाठी आपल्याला १०६४ एनएमची एका ठराविक रेडिओ तरंगची गरज असते जी क्यूस्वच्ड एनडी वायएजी लेझर आहे आणि लाल रंगाच्या शाईसाठी आपल्याला ५३२ एनएम रेडिओ तरंग हवा असतो.
टॅटूचे कण लेझर किरणांना शोषून घेतात आणि गरम होतात आणि नंतर लहान कणांमध्ये विस्फोटित होतात. या छोट्या कणांना आपल्या शरीराचं संरक्षक तंत्र हळूहळू शोषून घेतं आणि यामुळे टॅटू निघून जातो.
अनेक रुग्णांना अनेक सेशनसाठी यावं लागतं, जे २ ते १० देखील असू शकतात. १ सत्र २ महिन्यांच्या अंतराचं असतं; कारण विभाजित टॅटू स्वच्छ व्हायचा असतो.
निष्कासनऐवजी फिकटपणाची निवड
अनेकांना असं वाटतं की लेझर टॅटू निष्कासन करण्याची प्रक्रिया सुरू करणं म्हणजे टॅटू पूर्णपणे काढून टाकणं आणि त्या प्रक्रियेतून जाणं. परंतु असं नाहीए खासकरून जेव्हा तुम्हाला टॅटू पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी त्यामध्ये काही बदल हवे असतील वा नव्या रंगाचा प्रयोग करायचा असेल तर साधारणपणे ३ ते ५ सत्रांमध्ये तुम्हाला त्वचेवर नवा टॅटू बनविता येईल इतपत रंग काढला जातो.
लेझर टॅटू निष्कासन हळूहळू रंग उतरविण्याची प्रक्रिया आहे आणि ही तात्कालिक नाहीए. म्हणूनच जर जुन्या टॅटूऐवजी नवीन टॅटू काढून घेणार असाल तर तुमच्या त्वचेच्या डर्मिस थरावरून पूर्वीचा रंग काढला जाईल म्हणजे नव्या टॅटूची शाई जुन्या रंगावर काढल्यासारखी दिसणार नाही. त्यानंतर तुम्ही नवीन टॅटू काढताच जुना टॅटू नक्कीच तुमच्या आठवणीत राहील.
परिणाम आणि फायदे
टॅटू पूर्णपणे काढून टाकताना अनेकदा टॅटू पूर्णपणे निघून जातो. मात्र, काही बाबतीत काही डिझाइन तसंच राहातं.
लेझर प्रक्रिया तशी अधिक वेदनामय नसते आणि काढून टाकताना सुन्न करणाऱ्या क्रीमच्या प्रभावाखाली केली जाते. यामध्ये रुग्णाला अगोदर भरती वगैरे होण्याची गरज नसते आणि ते दैनंदिन गोष्टी तात्काळ सुरू करू शकतात. मात्र, ज्या जागी उपचार केले आहेत तिथे थोडी सूज आणि लालसरपणा दिसतो, परंतु हे काही तासांतच बरं होतं.
लेझर प्रक्रियेची किंमत
टॅटू बनविण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की तो बनविण्यापेक्षा काढताना अधिक महागडा ठरतो. टॅटू हटविण्याची किंमत आकार आणि रंगावर अवलंबून असते. परंतु प्रत्येक सेशनची किंमत ३ ते १० हजाराच्या दरम्यान असू शकते.
नको असलेला टॅटू काढण्यास इच्छुक असलेल्यांनी एक गोष्ट निश्चित करायला हवी की त्यांनी एखाद्या त्वचा तज्ज्ञाकडूनच तो काढावा; कारण एखाद्या त्वचा तज्ज्ञाकडून न काढल्यास लेझरमुळे त्वचेवर डाग पडू शकतात.