– शैलेंद्र सिंह
केसांमुळे आपले सौंदर्य सर्वाधिक खुलून येते. काळानुसार आणि बदलत्या फॅशननुसार केसांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आणि हेच कारण आहे, ज्यामुळे त्यांची केअर घेणारी तमाम प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, पण गरज आहे की या उत्पादनांचा योग्य वापर केला गेला पाहिजे. डॅमेज केसांची काळजी घेणे अत्यावश्यक असते.
केसांना डॅमेज करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी म्हणजे केस गळणे, वेळे आधीच सफेद होणे, त्यात कोंडा म्हणजेच डँड्रफ होणे, द्विमुखी केस मुख्यत्वे सामील आहेत.
लखनौच्या नॅचरल्स सलोनच्या ब्युटी एक्स्पर्ट प्रीती शर्मा सांगतात, ‘‘केस डॅमेज होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार योग्य आणि पौष्टिक नसणे हे आहे. हल्ली लोक अशा प्रकारचा आहार कमीच घेतात, ज्यात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. बहुतांश लोक असा आहार घेतात, ज्यामुळे पोटसुद्धा खराब होते. याचा प्रभाव आपल्या केसांवर होतो तसेच अनेक आजार आपल्या पाठी लागतात. केसांची योग्य काळजी न घेतल्याने ते डॅमेज होऊ लागतात. झोप पूर्ण न झाल्यानेसुद्धा हा त्रास उद्भवतो. अशावेळी सर्वप्रथम केस डॅमेज होण्याचे कारण शोधून काढणे महत्वाचे आहे आणि त्यानंतर त्यांचा योग्य इलाज केला गेला पाहिजे.’’
डँड्रफ
डँड्रफ केसांच्या उद्भवणाऱ्या समस्यांपैकी खूप सामान्य समस्या आहे. डँड्रफ म्हणजे कोंडा रंगाने सफेद किंवा भुऱ्या रंगाचा असतो. या त्वचेच्या मृत पेशी असतात, ज्या त्वचेच्या बाह्य स्तरावर जमतात. कोंडा हा २ प्रकारचा असतो. पहिला हा तैलीय असतो आणि दुसरा कोरडा. तैलीय कोंडयात मृत पेशी त्वचेच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात. दिसायला त्वचेच्या रंगाशी साधर्म्य साधणाऱ्या असतात. कोरडा कोंडा हा त्वचेतील आर्द्रता कमी झाल्याने निर्माण होतो. जेव्हा आपण केसांवरून कंगवा फिरवतो, तेव्हा हा कोंडा कपडयांवरही पडू लागतो. हा सफेद रंगाचा असतो.
कोंडा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोट खराब असणे हे आहे. केसांना पर्मिंग, स्ट्रेटनिंग आणि कलर केल्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत असतो, ज्यामुळे त्वचा मृत होते आणि कोंडा उत्पन्न होतो. केसांना योग्य प्रकारे शॅम्पू न केल्यामुळेही कोंडा होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळेही कोंडा होतो.
कोंडा दूर करण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. कोंडा झालेल्या व्यक्तिचा कंगवा आणि टॉवेल कधीही वापरू नका. आपला आहार पौष्टिक असेल याची काळजी घ्या. जेवणात मोड आलेली कडधान्ये, दूध, सॅलड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा.
कोंडा दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी केल्या जातात. टोमॅटो थेरपीनेही कोंडयाचा इलाज केला जातो. यासाठी टोमॅटोचा गर एका प्लास्टिकच्या भांडयात काढून घ्या. मग त्याची चांगली पेस्ट बनवून घ्या. यात लिंबाचा रस मिसळा. आणि हे मिश्रण संपूर्ण स्कॅल्पला लावा. हे सुकल्यावर केस धुवून टाका. कोंडा दूर करण्यासाठी अॅप्पल थेरपीचाही वापर केला जातो. यात २ अॅपल्सना किसून पेस्ट करून स्कॅल्पवर लावले जाते. ४० ते ४५ मिनिटे ठेवून मग धुतले जाते. असे आठवडयातून दोनदा अवश्य करावे.
वेळेआधी केस पिकणे
केसांची दुसरी मोठी समस्या म्हणजे अकाली केस पांढरे होणे. काळया, दाट केसांची प्रत्येकालाच आठवण येते. काळानुसार केस पांढरे होणे हा काही आजार नाही. पण हल्ली वेळेआधीच केस पांढरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. कधी कधी तर ऐन तारुण्यातच केस पिकताना दिसत आहेत.
कमी वयात मधुमेह म्हणजेच डायबिटीज केसांना वेळेआधी सफेद करतो. जर कुणाला सतत सर्दी होत असेल तरीही केस लवकर पांढरे होतात. केसांवर सतत केलेल्या केमिकल प्रॉडक्ट्सच्या माऱ्यानेही केस लवकर पिकतात. सायनस असेल तरीही केस पिकतात. पोषणा अभावीही केस कमी वयातच सफेद होऊ लागतात. याच बरोबर वातावरणातील धूळ, ऊन, प्रदूषण यामुळेही केस पांढरे होऊ लागतात.
केस वेळेआधी पिकणे रोखण्यासाठी नियमित कडिपत्त्याचे सेवन करा. यामुळे केस पांढरे होणे थांबवता येते. आवळा आणि शिकेकाई पावडर लोखंडाच्या कढईत भिजवून ठेवा. रात्रभर ठेवून सकाळी मेंदीमध्ये मिसळून केसांना लावा, असे आठवडयातून २ वेळा केल्याने केस सफेद होणे रोखता येते. योग्य डाएट घेऊनही केस हेल्दी करता येतात.
द्विमुखी केस
खराब शॅम्पू आणि साबण यांच्या वापराने केस द्विमुखी होतात. कधी कधी ब्लो ड्रायरच्या अतिवापरानेही ही समस्या उद्भवते.
केसांना या आजारापासून वाचवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन केस ट्रिम करून घ्या. आठवडयातून दोन वेळा केसांना चांगला तेलाने मसाज करा. ते धुण्याआधी केसांना अर्धा तास दही लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पू करा. १-१ चमचा मध, ऑलिव्ह ऑइल आणि बदाम तेल हे अंडयात किंवा दह्यात मिसळून पूर्ण डोक्यावर व्यवस्थित लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. गरम पाण्यात टॉवेल बुडवून केसांना स्टीम द्या.
केस गळणे
केस गळणे हीसुद्धा खूप कॉमन समस्या आहे. प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये ही समस्या पाहायला मिळते. केस गळल्यामुळे सौंदर्यात बाधा येते. वेळेआधीच वृद्धत्व येते. चिंता, तणाव, हार्ट किंवा लिव्हरची समस्या, जास्त पोहोणे, केमिकलचा अति वापर आणि आहारातील पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळेही केस गळू लागतात. कधी कधी दीर्घ आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांच्या दुष्परिणांमुळेही केस गळू लागतात. पोट खराब असेल किंवा कोंडा झाला असेल तरीही केस गळू लागतात.
साधारणपणे केस गळणे थांबवण्याचा काही असा हमखास उपाय नाही. काही घरगुती उपाय करून त्यांना गळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पहिला उपाय आहे, एक ग्लास रम एखाद्या बाटलीत ओतून घ्या. यात कांद्याचे ४ तुकडे करून घाला. बाटलीचे झाकण बंद करा. बाटली उन्हात ठेवा. ४८ तास ही बाटली उन्हात राहू द्या. त्यानंतर कांद्याचे तुकडे काढून फेकून द्या. उरलेले मिश्रण डोक्याला लावा आणि काही वेळाने केस धुवून टाका.
केस गळण्यापासून रोखण्याचा दुसरा घरगुती उपाय म्हणजे २ चमचे मेथीदाणे, ३ चमचे दह्यात घालून भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी संपूर्ण केसांना लावून २० मिनिटे ठेवून द्या. मग कोमट पाण्याने केस धुवू