* चंद्रकला

अलीकडच्या वर्षांत आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक विकास आणि उत्तमजीवन स्तरासोबतच सेक्सुअल रिलेशिपमध्येही स्वातंत्र्य आलं आहे. त्यामुळे लग्नापूर्वी प्रेग्नंसीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका सर्व्हेनुसार, १५ टक्के पुरुष आणि ४ टक्के महिलांनी लग्नापूर्वी संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे.

भारतासारख्या कंजर्वेटिव्ह देशात जिथे आपल्या सामाजिक आणि पारंपरिक पार्श्वभूमीमुळे कुठल्याही सामाजिक बदलाला मुळापासून नाकारले जाते, त्यात लग्नापूर्वी शारीरिक संबंध व प्रेग्नंसीला स्विकारलं जात नाही. विशेषत: मुलींसाठी, सेक्सुअली अॅवक्टिव्ह झाल्यामुळे मुली लग्नापूर्वी प्रेग्नंट होत आहेत. त्यामुळे त्या समाज आणि माता-पित्याच्या भीतीने इंस्टंट प्रेग्नंसी रोखण्यासाठी औषधांचे सेवन करत आहेत, जी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत.

कुठल्याही मेडिकल माहितीशिवाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुली या गोळ्यांचे सेवन करून आपले आरोग्य बिघडवत आहेत.

आरोग्यविशेषज्ञांनुसार, अॅबॉर्शन किंवा गर्भपात केवळ शारीरिकरीत्याच नव्हे, तर भावनात्मकरीत्याही खचून टाकतो. गर्भपात करणारी औषधे सहजपणे मेडिकलमध्ये उपलब्ध असतात आणि बहुतेक मुली कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांचे सेवन करतात, जे नंतर त्यांना धोकादायक ठरतं. त्याचा प्रभाव त्यांच्या आरोग्यापासून ते भविष्यात होणाऱ्या प्रेग्नन्सीवर पडतो.

कोणती आहेत औषधं

स्त्रीरोग तज्ज्ञांनुसार, प्रेग्नन्सीला टर्मिनेट किंवा गर्भपात करण्यासाठी ज्या अॅबॉर्शन पिल्सचा वापर केला जातो, त्यांना एमटीपी किट म्हणून ओळखले जाते. एमटीपी किट दोन औषधांचे मिश्रण आहे. मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टोल औषधांच्या मिश्रणाने हे बनतं. हे औषध अॅबॉर्शनच्या शॉर्टकटच्या रूपात वापरले जात आहे. प्रेग्नंट महिला हे याबाबतचे साइड इफेक्टन जाणून न घेताच, सहजपणे घेत आहेत. त्याचे सेवन केल्यानंतर शरीर वेगवेगळ्या प्रतिक्रिया करते.

ही औषधे महिलांच्या शरीराला खूप नुकसान पोहोचवतात. जर महिला एखाद्या आरोग्य विषयक समस्येशी आधीच झगडत असतील, तर त्यांच्यासाठी हे अजूनच समस्या निर्माण करू शकतात. उदा.जर त्यांना अॅनिमिया असेल, म्हणजेच त्या रक्ताच्या कमतरतेशी झगडत असतील, तर त्यांना डॉक्टर ऑबॉर्शन घडविणाऱ्या पिल्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्या अॅनिमियाच्या रुग्णांसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतात.

समाधान नाही, तर समस्याही आहेत पिल्स

एमटीपी किटने नजरेवर परिणाम होऊ शकतो. ज्या रुग्णांना किडनीशी संबंधित काही आजार असेल, त्यांनी या गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे.

या गोळ्या घेतल्याच्या काही काळानंतर भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो. गर्भपात घडविणाऱ्या पिल्स मुली आणि महिलांच्या शरीरात निर्माण होणारा प्रेग्नन्सी हार्मोन प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन बंद करतात. त्यामुळे भ्रुण गर्भाशयापासून वेगळा होऊन बाहेर येऊ लागतो. गर्भाशयाचं संकुचन रक्त स्राव वाढवतो. हा रक्त स्राव अनेकदा अतिप्रमाणात होतो, जो डॉक्टरांशिवाय रोखणे कठीण होतं. हा काही दिवस, आठवड्यांपासून १ महिन्यापर्यंत होऊ शकतो.

या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे पोटदुखी आणि जखडल्यासारखे वाटते. वेदना मासिकपाळीत होणाऱ्या वेदनांप्रमाणे किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात वेदना होतात. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त आणि इतर स्राव सतत बाहेर पडत राहतात. त्यामुळे पोट, पाय आणि शरीराच्या अनेक भागांत जखडल्यासारखे वाटते.

मळमळणे, जुलाब, डोकेदुखी आणि चक्कर येण्यासारख्या समस्या सामान्य आहेत, परंतु हेल्थ कंडिशननुसार, ही लक्षणं कमी किंवा जास्तही असू शकतात. काही वेळा तापही येऊ शकतो.

काही प्रकरणांमध्ये असं होतं की, गोळीच्या प्रभावाने भ्रुणपूर्णपणे बाहेर येत नाही, अशावेळी सर्जरीही करावी लागू शकते.

काहीवेळा त्रास प्रमाणापेक्षा वाढतो. डॉक्टरांनुसार, प्रेग्नन्सीच्या काही प्रकरणांत असं होतं की, भ्रुण महिलेच्या फिलोपाइनट्युबमध्ये अडकून राहतो, त्याला इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. फिलोमाइन ट्युब महिलेच्या शरीरात अंडाशय आणि गर्भाशयाला एकमेकांशी जोडते. अशा स्थितीत पिल्स घेतल्या गेल्याने ब्लीडिंगचे टिश्यू बाहेर पडतात. त्यामुळे फिलोपाइन ट्युबच्या भिंतीला नुकसान पोहोचते आणि अनेकदा ट्युट फाटण्यापर्यंतचा धोका निर्माण होतो. अशा स्थितीत खूप वेदना आणि रक्तस्राव होऊ लागतो.

जर लगेचंच सर्जरी केली गेली नाही, तर जीवालाही धोका होऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी इक्टोपिक प्रेग्नन्सीबाबत आधीच माहीत असणे आवश्यक आहे. जे अल्ट्रासाउंडने जाणून घेऊ शकता. कारण डॉक्टर इक्टोपिक प्रेग्नन्सीची लक्षणे दिसल्यानंतर अॅबॉर्शनपिल्स घ्यायला मनाई करतात.

काय आहेत कारणे

भारतासारख्या देशातही समस्या गंभीर आहे, जिथे मुलींवर घराच्या इज्जतीची जबाबदारी जबरदस्तीने सोपवली जाते. अशावेळी गर्भवती झाल्यानंतर मुली लाज आणि भीतीमुळे कोणाला काहीही न सांगता अशा प्रकारच्या पिल्सचे सेवन करतात. स्थितीची गंभीरता यावरूनच समजू शकता, लग्नापूर्वी गर्भवती होण्याऐवजी त्यांना मरण्याचा सल्ला दिला जातो. घरात त्या हिंसेच्या शिकार होतात आणि अनेकदा डिप्रेशनमुळे आत्महत्याही करतात. अशावेळी मुली जर गर्भवती झाल्या, तर त्या काहीही विचार न करता आपला जीव धोक्यात घालण्यास तयार राहतात.

डॉक्टरांकडे जाणे तर दूरच, त्यांना कोणाला सांगायचीही इच्छा नसते. अशावेळी त्या अॅबॉर्शनच्या अनेक सेफ पद्धती आजमावतात. आकड्यांनुसार, भारतात रोज जवळपास १३ महिला अनसेफ ऑबॉर्शनमुळे मृत्यूच्या शिकार होतात. दरवर्षी जवळपास ६.४ मिलियन गर्भपात होतात. अनसेफ अॅ्बॉर्शन भारतात माता मृत्यूचं सर्वात मोठं तिसरं मुख्य कारण आहे. जे प्रमाण वर्षाला होणाऱ्या मृत्यूत ८ टक्के आहे.

अनेकदा अॅबॉर्शन करणे ही महिलांसाठी मुश्कील होऊन जातं. कारण ८० टक्के महिलांना हे माहीत नाही की, भारतात अॅबॉर्शन लीगल आहे आणि त्यांना कोणी यासाठी रोखू शकत नाही व नाही हॉस्पिटल आणि अॅबॉर्शनची सेवा देणाऱ्या संस्था यासाठी मनाई करू शकत. मात्र, अज्ञानामुळे त्या हॉस्पिटलमध्ये जात नाहीत.

सुविधांचा अभावही अनसेफ अॅबॉर्शनच्या पद्धती स्विकारण्याचे कारण राहिले आहे. जवळपास ७० टक्के पब्लिक किंवा सार्वजनिक म्हटली जाणारी क्षेत्रे सुरक्षित गर्भपाताच्या सुविधा उपलब्ध करून देतात आणि तरुण मुली ज्यांचे लग्न झालेले नाही, त्या या केंद्रात जाण्यासाठी घाबरतात, कारण स्वास्थ्य केंद्रात डॉक्टर मुलींना पेरेंट्सना घेऊन येण्यास सांगतात. त्यापासून वाचण्यासाठी मुली अॅबॉर्शन पिल्सचा वापर करतात.

याउलट मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट १९७१ कुठल्याही महिलेला माइनर नसलेल्या, म्हणजेच सज्ञान असलेल्या महिलेला अॅबॉर्शनचा अधिकार देतात. त्यात तिला कुठल्याही परमिशनची गरज नाही. केवळ गर्भ २४ आठवड्यांपेक्षा कमी असावा. तेव्हा कुठले ही स्वास्थ्य केंद्र तिला यासाठी मनाई करू शकत नाही.

२०२२ मध्ये एका केसच्या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, अनुच्छेद २१ नुसार प्रजननाची स्वायत्तता प्रतिष्ठा आणि गोपनीयतेचा अधिकार एका अविवाहित महिलेला हा अधिकार देतो की, तिने विवाहित महिलेप्रमाणे मुलाला जन्म द्यावा की नाही, परंतु त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये अविवाहित महिलांना कशा प्रकारे ट्रीट केलं जातं, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

समाजाची हिस्सेदारी

समाजाचं दुटप्पी वागणं इथेही दिसून येतं. जिथे समाज एका बाजूला पुरुषांना महिलांशी शारीरिक संबंध बनवण्यासाठी मोकळे सोडतो, तिथेच तो एखाद्या महिलेला त्या पुरुषामुळे गर्भवती झाल्यास स्विकारण्यास नकार देतो. त्यामुळे जन्माला आलेल्या अपत्याला अनौरस बोलून त्यागतो. त्या महिलेला वाईट चालीची, चरित्र्यहीन आणि न जाणो काय काय नावं ठेवतो. मात्र, असं काही नाव त्या पुरुषाला दिलेलं आढळून येत नाही.

हद्दतर तेव्हा होते, जेव्हा तो पुरुष जो महिलेसोबत लैंगिक संबंध बनवण्यास तर तयार आहे, पण गर्भवती झाल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तिला साथ द्यायला नकार देतो आणि अनेकदा पुरुषाला माता-पिता व समाजाच्या दबावाखाली येऊन असं करावं लागतं.

समाजाच्या ठेकेदारांच्या तोंडून मुलं आहेत, चूक होते, यांसारख्या गोष्टी तर पुरुषांसाठी सहजपणे ऐकायला मिळतात, पण मुलींसाठी हे भाव त्यांच्या मनातून कुठे गायब होतात, कळत नाही. शेवटी त्यांना या स्थितीत पोहोचायला कारणीभूत तर पुरुषच असतात. हा समाज लग्नापूर्वी मुलीसोबत लैंगिक संबंधावर हरकत घेतो, पण लग्नानंतर होणाऱ्या रेपवर मूग गिळून गप्प बसतो. एवढंच काय, कायदाही याला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवत नाही. जगातील १८५ देशांतील ७७ देश स्पष्टपणे वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवतात.   याउलट केवळ ३४ देश असे आहेत, जे स्पष्ट रूपाने वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या श्रेणी बाहेर मानतात. भारत त्या ३४ देशांपैकी एक आहे.

विवाहाशिवाय आई बनण्यास समाज मुळापासून नाकारतो. तिला घरपरिवाराला लागलेल्या एखाद्या कलंकाप्रमाणे पाहिलं जातं. हे एका टेबूप्रमाणे घेतलं जातं. स्थिती अशाप्रकारे गंभीर होतं की, तिला कुटुंब आणि समुदायाद्वारे आउटकास्ट केलं जातं. शाळा, तसेच नोकरीच्या ठिकाणीही तिच्याशी भेदभाव केला जातो.

२०००मध्ये आलेला चित्रपट ‘क्या कहना’मध्ये या गोष्टीला चांगल्या प्रकारे दाखविण्यात आलं आहे. त्यात राहुल पियाला प्रेग्नन्ट झाल्यानंतर सोडून देतो.  त्यानंतर पिया आणि तिच्या कुटुंबाला समाजाचं वागणं कशा प्रकारे बोलावं लागतं, हे या चित्रपटात योग्य पद्धतीने दाखविण्यात आलं आहे.

२३ वर्षे उलटली आहेत, पण भारतीय समाजात काही परिवर्तन झालंय, असं म्हणता येणार नाही. अनसेफ अॅबॉर्शनमुळे होणारे मृत्यू या गोष्टीची पुष्टी करतात. हे चित्र कधी बदलणार, बदलणार आहे की नाही, काही सांगता येत नाही.

आपल्याला एक समाज म्हणून या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज नाही? आपल्याला आपल्या मुलींसाठी थोडं संवेदनशील आणि सहनशील होण्याची गरज नाही, जसे आपण मुलांसाठी असतो, जेणेकरून या मृत्यूंचा आकडा कमी केला जाऊ शकतो?

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...