* प्रतिनिधी

मी २६ वर्षांची आहे. पिरिड्सदरम्यान माझ्या ब्रेस्टचा आकार हेवी होतो. ब्रेस्ट थोडी कडकसुद्धा होते. पिरिड्सनंतर काही दिवस ही समस्या कायम राहते. यामुळे सेक्सच्यावेळी मला बरोबर वाटत नाही. सांगा मी काय करू?

पिरिड्सदरम्यान ब्रेस्ट हेवी होणे ही काही गंभीर समस्या नाहीए. हे साधारणत: सॉल्ट रिटेंशनमुळे होते. तुम्ही फॅमिली डॉक्टरना भेटून आपली समस्या सांगणं उत्तम. व्यवस्थित खाणेपिणे व उपचार यामुळे ना केवळ ही समस्या संपेल तर तुमचे सॉल्ट रिटेंशन आणि कंजेशनसुद्धा कमी होईल.

मी २१ वर्षीय तरूणी आहे आणि हॉस्टेलमध्ये राहते. माझी रूममेट माझी चांगली मैत्रीण बनली आहे. आम्ही कधीकधी मोबाइलवर एकत्र पॉर्न मुव्हीसुद्धा पाहतो. अलीकडेच काही दिवसांपूर्वीच माझी मैत्रीण सेक्स टॉईज घेऊन आली. तिने मलासुद्धा हे वापरायला सांगितले. सुरुवातीला मला असे करायला संकोच वाटला, पण आता मला याची चटक लागली आहे. कृपया मला सांगा सेक्स टॉईज कितपत सुरक्षित आहेत? मी काही चूक तर करत नाही ना?

जर हायजिनकडे लक्ष दिले तर सेक्स टॉईज वापरण्यात काही गंभीर धोका नाही. पण बाजारात लपून छपून मिळणाऱ्या सेक्स टॉईजच्या अनेक रेंज भारतासहित अनेक देशात प्रतिबंधित आहेत.

योग्य हेच राहील की तुम्ही आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईलवर पॉर्न मुव्ही बघण्याची सवय सुटू शकते. याउलट सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्या आणि चांगली मासिकं, साहित्य वाचा. शक्य असेल तर आपल्या रूममेटपासून दूर राहण्यासाठी रूम बदलून घ्या.

मी ३२ वर्षीय विवाहित पुरुष आहे. माझे सहजीवन समाधानी आहे. पण काही दिवसांपासून मी चिंतेत आहे. माझी पत्नी पॉर्न मुव्ही पाहून सेक्सदरम्यान तशा स्टेप्स करायला सांगते. सुरुवातीला मलाही मजा वाटली पण अनेक स्टेप्स इतक्या विचित्र असतात की मला कळत नाहीत. सांगा मी काय करू?

विवाहानंतर सेक्स संबंधात एकमेकांचा विचार करणे आणि लैंगिक सक प्राप्त होणे वैवाहिक जीवनाचा पाया आहे. त्यात सेक्स तर निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे.

जर पत्नीची इच्छा सेक्सदरम्यान वेगवेगळी आसनं करून ते आणखी आनंददायक बनवण्याची असेल तर यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल.

तुम्ही यासाठी ‘कामसूत्र’ साहित्याची मदत घेऊ शकता. यात रतिक्रीडेच्या आसनांबाबत विस्ताराने सांगितले आहे. सेक्स संबंधांच्यावेळी आपल्या पत्नीशी मोकळेपणाने बोला आणि एकमेकांना सहयोग करा. रात्री अंथरुणात जाण्याआधी हलका पण पौष्टीक आहार घ्या. यामुळे सेक्स प्रक्रियेत ऊर्जा टिकून राहील.

मी ३४ वर्षांचा आहे आणि ५ वर्षाच्या मुलीचा पिता आहे. लग्नानंतर काही वर्ष वैवाहिक आयुष्य छान चालले होते. पण अलीकडे पत्नी थोडी बदलल्यासारखी वाटते. सेक्स संबंध करून महिनोंमहिने उलटतात. माझी इच्छा असली तरी ती काहीतरी कारण सांगून टाळते. तिच्या या बदललेल्या वागणूकीमुळे मी पडताळणी केली तेव्हा कळले की तिचे तिच्या कार्यालयातील एका सहकाऱ्याशी संबंध आहेत. मी माझ्या पत्नीला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झालो. आता मला वाटते की हे संबंध संपवावे आणि तिला घटस्फोट द्यावा. कृपया सल्ला द्या?

वैवाहिक जीवनात पती अथवा पत्नीचे सेक्सप्रति उदासीनता दर्शवणे, सेक्स संबंध निर्माण करण्यास नकार देणे घटस्फोटासाठी कारणीभूत ठरते. तुम्ही तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण पत्नीला पटले नाही. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. पण हे तुमचे व्यक्तिगत मत असू शकते. जो काही निर्णय घ्याल तो सारासार विचार करून घ्या, कारण तुमची ५ वर्षांची मुलगी तुम्हा दोघांची जवाबदारी आहे. तिच्यावर घटस्फोटाचा वाईट परिणाम होऊ शकतो.

घटस्फोट घेणे सोपे नाही आणि तुम्हाला त्रिशंकू अवस्थता लटकवू शकतो. जो हक्क तुम्ही मिळवू इच्छिता, शक्यता आहे, तो तुम्हाला मिळणारच नाही.

मी ३२ वर्षीय महिला आहे. २ मुलांची आई आहे. लग्न होऊन ११ वर्षं झाली आहेत. सुरुवातीला सगळे नीट सुरु नव्हते. सासू छळत असे. नवराही भांडणात अंगावर हात उचलत असे. यात वेगळे म्हणजे माझी एका फेसबुक फ्रेंडशी चांगली मैत्री झाली. आम्ही दोघे वेगवेगळया शहरात राहतो, तरीही आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग आणि गप्पा मारत असतो. त्याची आणि माझी एकदाही भेट झाली नाही आहे पण आम्ही आपापसात बोलल्याशिवाय राहू शकत नाही. त्याला अनेकदा मी ब्लॉक केले पण परत तशीच स्थिती होते. कधीकधी मनाला जाणवते की मी माझ्या नवऱ्याला चिट का करते आहे? सांगा मी काय करू?

तुम्ही या अपराधी भावनेत अजिबात राहू नका. तुम्ही काही चुकीचे करत नाही आहात. जर तुम्हाला मानसिक सुख घरात मिळत नसेल तर तुम्ही शांती मिळावी म्हणून फेसबुक फ्रेंडचा आधार घेत आहात. तो पुरुष असो वा स्त्री, हे चुकीचे नाही आहे. नैतिकतेच्या घोळात न फसता आपली मन:शांती घालवू नका. हो, एकमेकांना भेटायचे असेल तर आधी २-३ वेळा विचार करा की जोखीम घ्यावी की नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...