* डॉक्टर शुभम गर्ग, सीनियर सर्जन फोर्टीस हॉस्पितल, नोएडा
प्रश्न : माझं वय २६ वर्षं आहे. अल्ट्रासाउंड केल्यावर समजलं की माझ्या अंडाशयात गाठ आहे. ही धोकादायक आहे का?
उत्तर : अंडाशय हार्मोन्सशी सरळ संबंधित असतात. प्रत्येक महिन्यात आता मासिकपाळीच्यावेळी याच्या आकारात बदल होतो, तर कधी यांचा आकार मोठा होतो कधी छोटा. जर सतत वेदना वाढत असतील, पोट साफ होत नसेल, फुगत असेल तर हे ओवेरियन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. डॉक्टर तुम्हाला एक ब्लड टेस्ट ट्यूमर मार्कर करण्याचा सल्ला देतील. जर हा वाढला असेल तर कॅन्सर कन्फर्म करण्यासाठी सीटी स्कॅन केलं जाईल.
प्रश्न : शारीरिक संबंध केल्यानंतर मला ब्लिडींग होतं. मला जाणून घ्यायचंय की याचं कारण काय आहे?
उत्तर : शारीरिक संबंध केल्यानंतर होणारं ब्लिडींग (पोस्टकोइटल ब्लिडींग ) सामान्य आहे. परंतु जर ब्लिडींग अधिक होत असेल, नियमित होत असेल आणि मासिक पाळीच्यामध्ये देखील होत असेल तर हे सर्वाइकल कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. हे आपल्या देशात स्तन कॅन्सरनंतर महिलांमध्ये होणारा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. हा ३० ते ६५ वर्षांच्या वयोगटातील महिलांमध्ये अधिक आढळतो. तुम्ही तुमची तपासणी केल्यावरच सर्वीक्स वा गर्भाशयाच्या तोंडावर विकसित होणारी एखादी वाढ वा पॉलिपबद्दल समजेल.
प्रश्न : माझ्या वहिनीला स्तन कॅन्सर आहे. मला हा कॅन्सर होण्याचा किती धोका आहे?
उत्तर : आनुवांशिक स्तन कॅन्सर होण्याचा धोका ५ ते १० टक्के पर्यंत वाढतो. जर तुमची आई, आजी, मावशी वा बहिणीला स्तन कॅन्सर असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. अशावेळी यापैकी कोणा एकाला स्तन कॅन्सर असेल तर इतर सर्वांनी त्वरित तपासणी करायला हवी. परंतु तुमच्या वहिनीला स्तन कॅन्सर झाल्यामुळे तुम्हाला त्यापासून धोका नाहीए; कारण तुमचा त्यांच्याशी सरळ रक्ताचा संबंध नाहीए.
प्रश्न : गेल्या काही दिवसापासून माझ्या पोटात खूप दुखतंय. तपासणी केल्यावर गर्भाशयात गाठ असल्याचं समजलं. हे गर्भाशयाच्या कॅन्सरचं लक्षण तर नाही ना?
उत्तर : तुम्ही हे नाही सांगितलं की तुमची मासिकपाळी नियमित आहे की नाही, मासिकपाळीच्यामध्ये ब्लिडींग तर होत नाही ना वा मासिकपाळी बंद तर नाही आलीए. तुम्ही त्वरित एखाद्या स्त्री रोग तज्ज्ञना दाखवा. सर्व प्रथम तुमच्या गर्भाशयात जी गाठ आहे त्याची बायोप्सी केली जाईल. जर त्यांना एन्ड्रोमिट्रीयल कॅन्सरचा संशय वाटला तर ते पेल्वीसचा एमआरआय करायला सांगतील. त्यानंतर स्थिती स्पष्ट होईल.
प्रश्न : माझं वय ६० वर्षं आहे. माझी मासिकपाळी बंद होऊन १० वर्ष झालीत. काही दिवसांपासून माझं पांढरं पाणी जातंय. हे कॅन्सरचं लक्षण तर नाही ना?
उत्तर : मॅनोपोज म्हणजेच मासिकपाळी बंद झाल्यानंतर पांढरं पाणी येऊ शकतं. योनीतून पांढरं पाणी निघणं नेहमीच कॅन्सरचं कारण नसतं. हे सामान्य संक्रमणदेखील असू शकतं, परंतु जर बऱ्याच काळापासून पांढरं पाणी जात असेल आणि अधूनमधून ब्लीडिंगदेखील होत असेल तर हे कॅन्सरचं कारण असू शकतं. तुम्ही त्वरित एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवा. अल्ट्रासाउंड केल्यानंतर समजेल की गर्भपिशवीमध्ये एखादी गाठ आहे की नाही ते समजेल.
प्रश्न : माझ्या कुटुंबात गेल्या काही दिवसात दोन लोकांची किमोथेरपी झाली आहे. एकाचे केस पूर्ण गळून गेले आहेत. तर दुसऱ्याचे अजिबात गळले नाही आहेत असं का?
उत्तर : किमोथेरपीनंतर केस जाणं स्वाभाविक आहे. ज्यांचे केस गळले आहेत त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण हे कायमचं नाही आहे. ६०टक्के रुग्णांमध्ये असं होतं. हे औषधं आणि तुमच्या शरीराशी संबंधित असतं. यानंतर जे केस येतात ते पहिल्यापेक्षा छान घनदाट आणि गडद असतात. केमिओथेरपी नंतर काही लोकांचे केस गळत नाहीत. परंतु घाबरू नका. त्याचा असा अर्थ अजिबात नाहीए की केमोथेरपी परिणाम करत नाहीए.
प्रश्न : मला डॉक्टरांनी रेडिएशन थेरेपी करायला सांगितली आहे. परंतु मला भीती वाटत आहे?
उत्तर : रेडिएशन थेरेपी कॅन्सरच्या उपचाराची एक खूपच सुरक्षित प्रक्रिया आहे. रेडिएशन हाय एनर्जी रेंज असते. त्यामध्ये कोणताही करंट नसतो. तुम्ही घाबरू नका कारण यामध्ये जळजळ वा गरमी लागत नाही. सिटीस्कॅनप्रमाणे ५ मिनिटांसाठी मशीनमध्ये जातात आणि नंतर बाहेर येतात.
प्रश्न : माझी आजी आणि वहिनी दोघींचा लंग्स कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. मला जाणून घ्यायचं आहे की त्या धूम्रपान करत नव्हत्या तरीदेखील त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर कसा झाला?
उत्तर : हे खरं आहे की ज्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर असतो त्यापैकी ९० टक्के लोकं धूम्रपान करतात. परंतु केवळ धुम्रपान हेच याचं एकमेव कारण नाहीए. चुलीवर जेवण बनवणं, वायू प्रदूषण, सिमेंट उद्योगमध्ये काम करण्यामुळे लंग्सचा कॅन्सर होऊ शकतो.