* गरिमा पंकज
भलेही सासू सुनेच्या नात्याला ३६चा आकडा म्हटलं जातं असलं तरी सत्य हे देखील आहे की एका आनंदी कुटुंबाचा आधार सासूसुनेमधील आपापसातील ताळमेळ आणि एकमेकांना समजण्याच्या कलेवर अवलंबून असतं.
एक मुलगी जेव्हा लग्न करून कोणाच्या घरची सून बनते तेव्हा सर्वप्रथम तिच्या सासूच्या हुकुमतीचा सामना करावा लागतो. सासू अनेक वर्षांपासून जे घर चालवत असेल ते एकदम सुनेच्या हवाली करू शकत नाही. सुनेने तिला मान द्यावा, तिच्यानुसार चालावं असं तिला वाटत असतं.
अशामध्ये सून जर नोकरदार असेल तर तिच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की तिने तिची कमाई स्वत:जवळ ठेवावी का सासूच्या हातामध्ये? ही गोष्ट केवळ सासूचा मानण्याची नसते तर सुनेचा मानदेखील महत्त्वाचा असतो. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.
सुनेने स्वत:ची कमाई सासूच्या हाती केव्हा द्यावी
सासूबाई असतील विवश : जर सासू एकटी असेल आणि सासरे जिवंत नसतील तर अशावेळी एका सुनेने आपली कमाई सासूला सोपवली, तर सासूला तिच्याबद्दल आपलेपणा वाटू लागतो. पती नसल्यामुळे सासूला काही खर्चात हात आखडता घ्यावा लागतो, जे गरजेचे असूनदेखील पैशाच्या तंगीमुळे ती करू शकत नाही. मुलगा भलेही पैसा खर्चासाठी देत असेल परंतु काही खर्च असे असू शकतात ज्याच्यासाठी सुनेच्या कमाईचीदेखील गरज पडते. अशामध्ये सासूला पैसे देऊन सून कुटुंबाची शांती कायम राखू शकते.
सासू वा घरामध्ये कोणी आजारी होण्याच्या स्थितीत : जर सासूची तब्येत खराब रहात असेल आणि उपचारासाठी अनेक पैसे लागत असतील तर सुनेचं कर्तव्य आहे की तिने तिची कमाई सासूबाईंच्या हाती ठेवून त्यांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध करण्यात मदत करावी.
स्वत:ची पहिली कमाई : जसं एक मुलगी आपली पहिली कमाई आपल्या आई वडिलांच्या हातावरती ठेवून आनंदीत होते तसंच जर तुम्ही सून असाल तर तुमची पहिली कमाई सासूबाईच्या हातावर ठेवून त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी चुकवू नका.
जर तुमच्या यशाचं कारण सासूबाई असेल : सासूच्या प्रोत्साहनामुळे तुम्ही शिक्षण व एखादी कला शिकून नोकरी मिळवली असेल तर म्हणजेच तुमच्या यशामध्ये तुमच्या सासूबाईचं प्रोत्साहन आणि प्रयत्न असतील तर तुम्ही तुमची कमाई त्यांना देऊन कृतज्ञता प्रकट करा. सासूच्या पाणवलेल्या डोळयांमध्ये लपलेल्या प्रेमाची जाणीव होऊन तुम्ही नव्या जोशात पुन्हा कामावरती लागू शकाल.
जर सासूबाई जबरदस्तीने पैसे मागत असेल तर : पहिल्यांदा हे बघा की अशी कोणती गोष्ट आहे की सासूबाई जबरदस्तीने पैसे मागत आहेत. आतापर्यंत घराचा खर्च कसा चालत होता? या प्रकरणात योग्य म्हणजे तुम्ही तुमच्या पतींशी बोलून घ्या. त्यानंतर पती-पत्नी मिळून या विषयावर घरातील दुसऱ्या सदस्यांशी बोलून घ्या. सासुबाईंना समजवा. त्यांना पुढे मोकळेपणाने सांगा की तुम्ही किती रुपये देऊ शकता. मग ते घराचे काही खास खर्च जसं की रेशन, बिल, भाडं इत्यादीची जबाबदारी तुमच्यावर घ्या. यामुळे सासूबाईंनादेखील समाधान वाटेल आणि तुमच्यावर अधिक भार पडणार नाही.
जर सासू सर्व खर्च एका जागी करत असेल तर : अनेक कुटुंबांमध्ये घराचा खर्च एकाच जागी केला जातो. जर तुमच्या घरामध्येदेखील जाऊ, मोठे दिर, छोटे दिर, नणंद इत्यादी एकत्र राहत असतील तर पूर्ण खर्च एकाच जागी होत असेल तर घराच्या प्रत्येक कमावू सदस्याने आपली जबाबदारी उचलायला हवी.
जर घर सासू-सासऱ्यांचं आहे : ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहात जर ते सासू-सासऱ्यांचं आहे आणि सासू मुलगा सुनेकडून पैसे मागत असेल तर तुम्ही ते त्यांना द्यायला हवे आणि अगदीच नाही तर घर आणि इतर सुख सुविधांच्या भाडयाच्या रूपात पैसे नक्की द्या.
जर सासूने लग्नात केला असेल बराचसा खर्च : तुमच्या लग्नाचं सासू-सासऱ्यांनी खूप चांगल आयोजन केलं असेल आणि खूप पैसे खर्च केले असतील. घेणंदेणं, पाहुणचार तसंच भेटवस्तू इत्यादीमध्ये कोणतीही कसर सोडली नसेल, सून आणि तिच्या घरातल्यांना खूप दागिनेदेखील दिले असतील तर अशावेळी सुनेचं कर्तव्य आहे की तिने तिची कमाई सासूबाईंच्या हाती ठेवून त्यांना आपलेपणाची जाणीव करून द्यावी.
नणंदेच्या लग्नासाठी : जर घरामध्ये तरुण नणंद आहे आणि तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले जात असेल तर मुलासूनेचं कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या कमाईचा मोठा भाग देऊन आपल्या आई-वडिलांना मदत करावी.
जर पती दारुडा असेल : अनेकदा पती दारुडा व काहीच काम करत नसेल आणि पत्नीच्या रुपयांवर मजा करण्याची संधी शोधत असेल, पत्नीकडून पैसे घेऊन दारू वा वाईट संगतीत खर्च करत असेल अशा स्थितीमध्ये तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी गरजेचं आहे तुम्ही पैसे आणून सासूबाईंच्या हाती द्यावे.
केव्हापर्यंत तुमची कमाई सासूच्या हातांमध्ये ठेवू नये
जर तुमची इच्छा नसेल आणि तुमच्या इच्छेच्या विरुद्ध तुमची कमाई सासूच्या हातामध्ये ठेवत असाल तर घरात नक्कीच अशांती निर्माण होते. सून नाखुष असते आणि इकडे सासू-सासऱ्यांच्या वागणुकीला नोटीस करून ती दु:खी राहील. अशा परिस्थितीत सासूला पैसे देऊ नका.
सासरे जिवंत असतील आणि घरात पैशाची उणीव नसेल : जर सासरे जिवंत आहेत आणि कमावत आहेत व सासू आणि सासरे यांना पेन्शन मिळत असेल तरीदेखील तुम्ही तुमची कमाई स्वत:जवळ ठेवण्याचा पूर्ण हक्क आहे. कुटुंबात दिर, मोठे दिर आहेत आणि ते कमवत असतील तर तेव्हादेखील तुम्हाला तुमची कमाई देण्याची गरज नाही.
जर सासू त्रास देत असेल : जर तुम्ही तुमची पूर्ण कमाई सासूच्या हातात देत असाल आणि तरीदेखील सासू तुम्हाला वाईट बोलत असेल आणि कार्यालयाबरोबरच घरीदेखील सर्व कामे तुम्ही करत असाल, तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर पैसे देत नसेल तर अशा स्थितीमध्ये सासूच्या पुढे आपल्या हक्कासाठी लढायला हवं. अशा सासूच्या हातात पैसे ठेवून तुम्हाला स्वत:चा अपमान करून घेण्याची गरज नाही. उलट स्वत:च्या मर्जीने स्वत:वर पैसे खर्च करण्याचा आनंद घ्या आणि तुमचं डोकं टेन्शन फ्री ठेवा.
जर सासू खर्चिक असेल : जर तुमची सासू खूप खर्चिक असेल आणि जेव्हा तुम्ही तुमची कमाई त्यांच्या हाती देत असाल तेव्हा ते रुपए २-४ दिवसातच त्या खर्च करत असतील व सर्व रुपये पाहुण्यांसाठी व आपल्या मुलीं आणि बहिणींवर खर्च करत असेल तर तुम्ही सांभाळायला हवं. सासूच्या आनंदासाठी तुमच्या मेहनतीची कमाई अशीच बरबाद होण्याऐवजी ते तुमच्याजवळ ठेवा आणि योग्य जागी गुंतवणूक करा.
भेटवस्तू देणं योग्य आहे
यासंदर्भात सोशल वर्कर अनुजा कपूर सांगतात की तुम्ही तुमची पूर्ण कमाई सासूला देणं गरजेचं नाही. तुम्ही भेटवस्तू आणून सासूवर रुपये खर्च करू शकता. यामुळे त्यांचं मनदेखील आनंदित होईल आणि तुमच्याजवळ काही रुपये वाचतील. सासूबाईंचा वाढदिवस असेल तर त्यांना भेटवस्तू द्या. त्यांना बाहेर घेऊन जा. खाणं खायला द्या. शॉपिंग करा. त्यांना जेदेखील खरेदी करायचे ते त्यांना खरेदी करून द्या. सणावारी घराची सजावट आणि सर्वांच्या कपडयांवर खर्च करा.
पैशाच्या देणे घेण्यामुळे घरात ताण-तणाव निर्माण होतात. परंतु भेटवस्तूने प्रेम वाढतं. नाती सांभाळली जातात आणि सासूसुनेमध्ये बॉण्डिंग मजबूत होतं. लक्षात ठेवा पैशाने सासूमध्ये अरेरावीची भावना वाढू शकते. तर सुनेच्या मनातदेखील असमाधानाची भावना उत्पन्न होऊ लागते. सुनेला वाटतं की मी कमाई का करते जर सर्व रुपये सासूलाच द्यायचे आहेत. म्हणून गरजेच्यावेळी सासू व कुटुंबीयांवर पैसे आवर्जून खर्च करा. दर महिन्याला पूर्ण रक्कम सासूच्या हातात देऊ नका.