* शैलेंद्र सिंह
नोएडामध्ये ८१ वर्षांचा पेंटर मॉरिस रायडर एका मुलीसोबत बोटाने सेक्स करत होता. मुलीने तिच्या पालकांना हे सांगितलं आणि तेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी या प्रकरणाची डिजिटल रेपच्या कलमाखाली नोंद केली. त्यानंतर हा डिजिटल रेप शब्द प्रचलनात आला. यापूर्वी दिल्ली आणि मुंबईमध्ये दोन प्रकरणं अगोदर देखील समोर आली होती, परंतु यावर एवढी चर्चा झाली नव्हती.
मुलींच्या लैंगिक शरीराशी खेळण्याची कुत्सित मानसिकता ठेवणारे हा विचार करतात की रेप म्हणजेच बलात्कार तेव्हाच मान्य केला जाईल जेव्हा पुरुषाचे लिंग मुली वा स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करेल. कुत्सित मानसिकता असणाऱ्या छोटया मुलींच्या योनीमध्ये बोट टाकून सेक्सची अनुभूती घेतात. कमी वयातील मुलींना हे कळत नाही, यामुळे त्यांचा गुन्हा लपला जात असे.
पूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्याला रेप मानलं जात नसे. त्यामुळे अशावेळी गुन्हेगार शिक्षेतून सुटायचा. आता कायद्यात बदल झाल्यानंतर अशा गुन्ह्यांनादेखील डिजिटल रेप मानलं जात आहे. रेपच्या परिभाषेतील बदलामुळे मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये आता शिक्षा मिळणार आहे.
काय आहे डिजिटल रेप
जेव्हा डिजिटल रेपबद्दल बोललं जातं, तेव्हा साधारणपणे लोकं हे समजतात की सोशल मीडियावर नेकेड फोटो, व्हिडिओ वा अश्लील मेसेज करून जेव्हा मुलीला त्रास दिला जातो तेव्हा त्याला ‘डिजिटल रेप’ म्हणतात. यामुळेचं डिजिटल शब्द समोर येताच सोशल मीडियावर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांचं चित्र डोळयासमोर येतं. डिजिटल रेपचा अर्थ रीप्रॉडक्टिव्ह ऑर्गन व्यतिरिक्त एखादा भाग वा ऑब्जेक्टमध्ये जसं बोट, अंगठा व एखाद्या वस्तूचा वापर करून जबरदस्तीने सेक्स करणं. इंग्लिशमध्ये डिजिटचा अर्थ अंक आहे. सोबतच बोट, अंगठा, पायाची बोटं सारख्या शरीराच्या अवयवांनादेखील डिजिटने संबोधलं जातं.
रेप आणि डिजिटल रेपमध्ये रिप्रोडक्टिव ऑर्गनच्या वापराचा फरक आहे. ही गोष्ट वेगळी आहे की कायद्याच्या नजरेत रेप आणि डिजिटल रेपमध्ये कोणताही फरक नाहीए. २०१२ पूर्वी डिजिटल रेप छेडछाडीच्या कक्षेत येत होता. दिल्लीच्या निर्भया कांडानंतर स्त्रियांच्या विरोधात गुन्हा करणाऱ्या कायद्यांना नव्या पद्धतीने पाहण्यात आलं. यानंतर रेपच्या कॅटेगरीमध्ये एक कलम आणि आणखीन जोडण्यात आलं, ज्याला डिजिटल रेप म्हटलं जातं.
डिसेंबर, २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया केस नंतर लैंगिक हिंसाचाराशी संबंधित कायद्यांची समीक्षा करण्यात आली होती. भारताचे माजी चीफ जस्टीस वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यामध्ये अनेक बदल सुचविले. यामध्ये अनेक बदल स्वीकारत अनेक दशकांच्या जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्यात आला.
डिजिटल रेपची प्रकरणं
डिजिटल रेपचं पहिलं प्रकरण मुंबईमध्ये झालं, जिथे दोन वर्षाच्या मुलीसोबत अशाप्रकारचा गुन्हा करण्यात आला. मुंबईत रक्ताने माखलेल्या दोन वर्षाच्या मुलीला इस्पितळात आणण्यात आलं. तपासणीनंतर डॉक्टरांना तिच्या योनीमध्ये बोटांचे ठसे मिळाले. खरंतर या दरम्यान लैंगिक त्रास वा रेप संबंधात कोणताही संकेत मिळाला नव्हता. नंतर समजलं की तिचे वडीलच मुलीसोबत अशी गोष्ट करत होते. यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली, परंतु त्याला आयपीसीचं कलम ३७६ नुसार शिक्षा वा आरोपीत करण्यात आलं नाही जे रेपशी संबंधित आहे.
कलम ३७६ मध्ये बदल
मुंबई आणि दिल्लीमध्ये झालेल्या दोन डिजिटल रेपच्या घटनांमध्ये आयपीसीचं कलम ३७६ मध्ये मधील काही त्रुटीना पाहण्यात आणि समजण्यात आलं. डिजिटल रेप नुसार झालेल्या गुन्ह्यामध्ये मुलत: बोटं वा एखादी बाहेरची वस्तू वा मानवी शरीराच्या एखाद्या दुसऱ्या भागाचा वापर करून स्त्रीत्वाला काळिमा फासण्यात आलं होतं. परंतु याला कोणत्याही कलमानुसार गुन्हेगार मानण्यात आलं नाही.
याचा प्रभाव नोएडामध्ये झालेल्या डिजिटल रेपमध्ये पाहायला मिळाला. नोएडा पोलिसांनी ८१ वर्षांच्या स्केच आर्टिस्टला १७ वर्षाच्या युवतीसोबत डिजिटल रेपच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की पीडित युवती सुरुवातीलाच तक्रार करायला घाबरत होती. परंतु नंतर तिने आरोपीच्या लैंगिक संबंधांना रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि मोठया प्रमाणात पुरावे एकत्रित केले. यानंतर तिने याची माहिती तिच्या पालकांना दिली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डिजिटल रेपचं प्रकरण दाखल केलं