* प्रतिनिधी

तुम्ही फक्त रू. ५ हजारात मोठया पार्टीसाठी स्वत:ला तयार करू शकता का? जर तुमचं उत्तर होय असेल तर तुम्ही क्रिएटिव्ह आहात. लक्षात घ्या, फॅशनचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा पेहराव किती महागडा तयार केला आहे. खरं सांगायचं तर डिझाईनचा अर्थच असा आहे की तुमच्या क्रिएटिव्हिटीने कमी पैशांमध्ये किती आकर्षक ड्रेस तयार केला आहे.

म्हणूनच बुटीक व्यवसायात येण्यापूर्वी स्वत:वरती ही चाचणी करून पहा. जसं की तुमच्या जुन्या साडीचा डिजाइनर सूट बनवा. अनेकदा स्त्रिया आपला महागडा ब्रायडल ड्रेस आयुष्यभर तसाच पडून ठेवतात. खरंतर तुमच्या क्रिएटिव्हिटीने त्याचा आकर्षक ड्रेस बनविला जाऊ शकतो. यासोबतच व्यवसाय करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणं गरजेच आहे :

मूलभूत गरजा : बुटीक सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गरजा पूर्ण करणे गरजेचे असतं. यापैकी एक आहे बुटीक खोलण्याची जागा. सुरुवातीला हे छोटयाशा जागेतदेखील सुरू करू शकता.

बुटीकमध्ये टेलर मास्टरची निवड योग्य प्रकारे करायला हवी. शिलाई मास्टर असो वा मग कटिंगवाला सुनिश्चित करून घ्या की त्याला खाके बनवता यायला हवेत.

बुटीकमध्ये चांगल्या कंपनीची शिलाई व ओव्हरलॉक मशीन ठेवा. जर टेलर मास्टरकडे योग्य शिलाई मशीन घेण्यासाठी पैसे नसतील तर स्वत: खरेदी करू शकता. अशा प्रकारे चांगली टेप, सिजर्स, ट्रेसिंग व्हील, सुया, पॅटर्न मेकिंग टूल्स, कटिंग पॅड, कटिंग टेबल, प्रॉपर लाइटिंगची व्यवस्था करा म्हणजे टेलर मास्टरला व्यवस्थित काम करता येईल.

सुरुवातीचा काळ : व्यवसायाच्या सुरुवातीला स्वस्त कपडे बाजारातून आणा. याव्यतिरिक्त तुमचं बुटीक लोकप्रिय करण्यासाठी स्वस्त व उपयोगी उपायांचा वापर करा, जसं तुमच्या बॅग्सवरती नाव छापा, तुमच्या बुटीकचा लोगो बनवा, यावर स्वत: डिझाईन करा, व्हिजिटिंग कार्ड छापा, लोकल वर्तमानपत्रात जाहिरात द्या बुटीकच्या नावाचे पॅम्प्लेट्स व बॅनर बनवा, ग्राहक व जागेनुसारच शिलाई निर्धारित करा. फेसबुक व्हाट्सअपवर तुमच्या कपडयांच्या डिझाईनचे फोटो पोस्ट करा.

क्षेत्राची माहिती : बुटीकची सुरुवात करण्यापूर्वी बेसिक कोर्स करायला हवा. इतर सर्व माहिती अनुभवाने मिळतेच. जसजसं काम करत जाल तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये निपुण होत जाल. नवनवीन ठिकाणाच्या वेशभूषा जाणून घ्या आणि स्वत: कागदावर ड्रेस डिझाईन करा. इंटरनेटने फक्त डिझाईनचा अंदाज लावता येतो, परंतु तुमच्या कौशल्याला वास्तवात कागदावरती उतरवा आणि त्याला बनवा तेव्हाच तुम्ही चांगल्या डिझायनर बनू शकाल.

गुणवत्तेशी तडजोड नाही : बुटीक नवीन असो वा मग जुनं असो गुणवत्ता कायम राखायला हवी. चांगल्या दर्जाचं कापड वापरा. चांगली शिलाई करा. कामाबाबत प्रामाणिक रहा तेव्हाच तुमचं नाव होईल. बाजारात तुमच्या बुटीकचं एक स्टँडर्ड मेंटन करा म्हणजे तुम्हाला फारसा त्रास होणार नाही.

तुमची वागणूक : ग्राहकांशी तुम्ही कसं वागता यावर बुटीकचा फायदा अवलंबून असतो. त्यांच्यावर तुमची आवड लादू नका व आपल्या ग्राहकांच शारीरिक व्यंग लपविणारे डिझाइन व त्यांच्या बजेटनुसार त्यांना सल्ला द्या.

तुमचं काम : तुमच्या कामाशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. घाईघाईत ग्राहकांना काहीदेखील शिवून देण्याच वचन देऊ नका. जे काम तुम्ही करू शकता त्याच तारखेला द्या. जर कोणाला वेळ दिली असेल तर उशिरापर्यंत तुम्हाला काम करावं लागलं तरी चालेल, पण काम पूर्ण करा.

कसा मिळवाल उत्तम फायदा : तुमच्या बुटीकमध्ये स्कूल युनिफॉर्मदेखील शिवू शकता. यामुळे फायदादेखील मिळेल. यासोबतच दुकानदारांना तुमचे कपडे सप्लाय करा आणि एखाद्या ब्रँडशी जोडण्यासाठी कपडे बनवून अधिक फायदा मिळवू शकता.

ग्राहकांशी संबंध : तुम्हाला कोणत्याही पूर्ण बॉडीचा अंदाज यायला हवा. तुमच्या कपडयांना धार्मिक रूप देऊ नका, कारण यामुळे तुमचे ग्राहक दूर होतील. असे ड्रेसेस तयार करा की प्रत्येक वर्गातील स्त्रिया तुमच्याजवळ मोकळेपणे खरेदीला येतील.

लक्षात ठेवा : या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी घरात फॅशन व दुसरी मासिकं ठेवा म्हणजे जो देखील तुमच्याजवळ येईल आणि तुम्ही कामात असाल तर थोडा वेळ बिझी राहू शकतील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...