* पूजा यादव

वर्जीनिटी वा कौमार्य ना आज कोणती अद्भूत बाब आहे ना पूर्वी होती. पाश्चिमात्य देशांमध्ये नववधूला आपलं कौमार्य सिद्ध करण्यासाठी पहिल्या रात्री रक्ताने माखलेली चादर दाखवावी लागत होती. त्याचा अर्थ असा नाही की अनेक मुली लग्नापर्यंत वर्जिन राहत नव्हत्या. असा कोणताही नियम मुलांवरती लागू नव्हता. पूर्वी मुलीचं भविष्य चांगल्या पतीवर टिकून असायचं. आज मुलगा असो वा मुलगी घराबाहेर पडून शिक्षण वा नोकरी करतच असतात.

आज मुलं एक वा दोनच असतात आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. इयत्ता दहावी नंतर मुश्किलीने ते घरात रहातात. अधिकाधिक चांगल्या गोष्टीच्या शोधात मोठया शहरांकडे वा जिथे मनासारखा कोर्स मिळेल तिथे जातात आणि लग्न करण्याची कोणालाही घाई नसते.

तरुण पिढी लग्नाच्या बंधनापासून स्वत:ला वाचवत असते, परंतु शरीराची कोणतीही गरज पूर्ण करण्यासाठी ती घाबरत नाही. गरजा वयासोबतच जाग्या होतात. मोकळया वातावरणात तसंही कोणी नियंत्रित करणारं नसतं. मुलांना तर याबाबत नेहमीच सूट दिली जाते. त्यांच्यावर कोणीही लवकर वा सहजपणे नावं ठेवू शकत नाही. परंतु आता मुलीदेखील आत्मनिर्भर झाल्यामुळे त्यांच्यावर लवकर लग्न करण्याचा दबाव राहिलेला नाही.

बदलली आहे जीवनशैली

मुलंमुलींनी एकत्रित राहणं एक सामान्य गोष्ट नाही तर ती आता गरजदेखील बनली आहे. अनेकदा तीन-चार खोल्यांच्या सेटमध्ये दोन-तीन मुली आणि दोन-तीन मुलं एकत्र राहण्यात काहीही वाईट नाही. काही वर्षे एकत्रित राहून आपल्या सुविधेनुसार योग्यवेळी लग्न करण्याबाबत विचार करणं एक चांगलीच गोष्ट आहे. परंतु समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा काही काळ सोबत राहिल्यानंतर दोघांचे विचार मिळत नाही आणि ते वेगळे होतात.

कमी ना तर मुलांना मुलींची आहे आणि ना ही मुलींना मुलांची. कोणी दुसरा साथीदार मिळतो आणि पुन्हा ते सुरू होतं. आता शहरातील नोकरदार आणि यशस्वी तरुणांचं हेच राहणीमान बनलं आहे.

आता तर २७-२८ वय होताच घरातल्यान वाटू लागतं की आता मुलाचं लग्न व्हायला हवं आणि पुन्हा सुरू होते एक साधी, घरगुती, कमी वयाच्या अशा मुलीचा शोध जिला हवेनेदेखील टच केलेला नसेल नसेल म्हणजेच एकदम वर्जीन.

बदलावी लागणार विचारसरणी

एका मुलाने वयाच्या २९-३० व्या वर्षापर्यंत न जाणो कितीतरी मुलींसोबत सेक्स केलेला असतो. त्यानंतर मात्र लग्नासाठी कोणीही हात न लावलेली मुलगी त्याला हवी असती. ह्या झाल्या हवेतील गोष्टी. परंतु आता असा काळ आहे जेव्हा मुलांनादेखील आपली विचारसरणी बदलावी लागणार. कारण जेवढा अधिकार मुलांना आहे तेवढाच अधिकार मुलींनादेखील आहे, आपलं आयुष्य स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालविण्याचे.

आता जीवनशैलीमध्ये बदल घडलाच आहे, तर याला वर्जीन आणि प्युअरच्या कक्षेत बाहेर पडून मोकळया मनाने स्वीकारण्याचं धाडसदेखील दाखवलं जातंय. परंतु तरीदेखील वर्जिनिटीचं भूत अनेकांच्या मानगुटीवर बसलेलंच असतं.

लग्नपूर्वी कोणाच्या आयुष्यात काय झालं आहे हे महत्त्वाचं नसतं. उलट लग्नानंतर एकमेकांबाबत प्रेम, विश्वास, सहकार्य आणि समर्पण लग्नाला यशापर्यंत घेऊन जातं. म्हणून जिथे आयुष्यामध्ये एवढे बदल झाले आहेत, तिथे मुलांना स्वत:ची मानसिकतादेखील बदलावी लागणार की वर्जिनसारखा कोणताही शब्द ना आज आहे ना कधी नव्हता. म्हणूनच या गोष्टीला जेवढा लवकर जाणून घेऊ तेवढेच लवकर सहज सोपं होईल.

दोषी कोण

समाज आणि धर्माने आपली सर्व मेहनत मुलींवरच झोकून दिली आहे, त्यांना संस्कार देण्यात, गाय बनविण्यात. आज मुली स्पर्धेच्या प्रत्येक क्षेत्रात मुलांपासून चार पावलं पुढेच आहेत. परंतु काही मुलं आजदेखील मुलं जुन्या मानसिकतेने ग्रस्त आहेत. आजदेखील त्याच पत्नीची स्वप्न पाहतात जी दुधाच्या ग्लासासोबत त्यांचं स्वागत करेल, घरासोबतच बाहेरदेखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल.

हा त्या धार्मिक कथांचा परिणाम आहे ज्यामध्ये सेक्स संबंधांमध्ये एका बाजूला नियंत्रणाचे गुण गायले जातात. हिंदू पौराणिक कथा असो वा नाटक वा पुन्हा दुसऱ्या धर्माच्या, अशा नियमांनी भरलेला आहे ज्यामध्ये लग्नाच्या पूर्वी संबंध बनतील. यामध्ये अनेकदा मुलींनाच दोषी ठरवलं जातं आणि दोषी पुरुषाला सोडून दिलं जातं.

गरज नाही वर्जिन असणं

याचे अवशेष आजदेखील आपल्या मनावर राज्य करत आहेत. अनेक घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मुलगे लग्नापूर्वीच्या संबंधांचा विचार करून बसतात, तर आधुनिक कायदा अधिक उदार आहे आणि प्रावधान आहे की जोपर्यंत कोणती मुलगी कोणा दुसऱ्याशी संबंध ठेवत नाही तिचा पती घटस्फोटाचा हक्क ठेवू शकत नाही. लग्नाच्या अटींमध्ये आजदेखील कायद्यामध्ये वर्जिन असणं गरजेचं नाहीये. आता वर्जिनिटी मनातून काढून टाका. हे जास्त करून चोचले उच्चवर्णीयांचे आहेत, जे आपल्या शुद्धतेचा ढोल बडविण्यासाठी समाजातील मागासवर्गीयावर ज्याप्रमाणे अत्याचार केले तेच स्त्रियांवर करतात.

काळाबरोबरच वर्जिन मुली मुलांच्या कल्पनेमध्ये राहतील, कारण सत्य हे आहे की आज नाही तर उद्या हा शब्द शब्दकोशातून गायब होणारच आहे, म्हणूनचं स्वत: या सत्याला सामोर जाणं आणि काळानुसार स्वत:मध्ये बदल घडवणं हाच सरळ आयुष्याचा गुरु मंत्र आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...