* प्रतिनिधी
तरुण पती-पत्नीला पतीच्या आई-वडिलांनी वेगळं राहण्यासाठी घर घेऊन दिलं आणि संसाराचा इतर खर्च तरुण पती-पत्नीने आपल्या दोघांच्या कमाईतून उचलला. नंतर पतीची आई अधूनमधून दोघांच्या संसारात नाक खुपसू लागली की हा सोपा बाजूला ठेवा, पडद्यांचा रंग बदला, मोलकर्णीला घरातून काढा कारण तिने घंटी वाजवताच दरवाजा उघडायला उशीर केला तसंच दुधाच्या चहा ऐवजी ग्रीन टी दिला. यावर नवऱ्याच्या आईला काय म्हणणार?
हेच ना की ती मुलासुनेचं घर जोडत आहे जोडत नाहीए तर तोडत आहे. असंच काम आपल्या केंद्र सरकारचे नियक्त राज्यपाल अशा राज्यांमध्ये करत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही आहे.
दिल्लीमध्ये तर भयंकर रूपांत एका मागोमाग एक राज्यपाल करत आहेत. भाजपाने ७च्या ७ जागा जिंकल्यात, पहिल्या दोनवेळा ते विधानसभेत आणि यावेळी दिल्ली नगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालच्या आम आदमी पक्षाकडून हरले. आता ते अशा सासूप्रमाणे वागत आहेत जिच्या मुलाने आपल्या मर्जीने लग्न केलं आणि आईने शोधलेल्या मुलीला रिजेक्ट केलं होतं.
असा त्रास देण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीच्या डीएनएमध्येच आहे. कारण पुराणांमध्ये वारंवार उल्लेख आहे की ऋषीमुनी राजाच्या दरबारात घुसून जबरदस्तीने राजाकडून काम करून घेत असत.
नृसिंह अवतार बनून विष्णूने हिरण्यकश्यपचा अकारण वध केला. कृष्णाने विनाकारण कौरव आणि पांडवांमध्ये मतभेद उभे केले आणि या कुरुवंशाला समाप्त केलं. विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला जबरदस्तीने राक्षसांना मारण्यासाठी घेऊन गेले आणि पूर्ण रामायणात त्यांच्यासारखे ऋषीमुनी अयोध्येच्या कामकाजात विघ्न आणत राहिले.
जी कथा या ऋषीमुनींनी रचली त्यांच्यामध्ये राजाचं काम अशाच प्रकारच्या ऋषींच्या अकारण गोष्टी थोपवणं होतं जसं की केंद्र सरकारचे राज्यपाल पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, छत्तीसगड, झारखंडमध्ये करत आहेत.
पौराणिक ऋषींच्या दखल अंदाजामुळे पौराणिकथाचे राजा प्रत्येकवेळी ऋषीमुनींच्या आदेशावरून लढण्यास तयार असत आणि हेच ऋषीमुनी आज घरामध्ये तरुण पती-पत्नींना त्रास देत आहेत. साधारणपणे सासवा कोणत्या ना कोणत्या स्वामी महाराज, गुरुच्या भक्त असतात आणि रात्रंदिवस त्यांच्या सेवेमध्ये असतात. तेच सासवाना उकसावत राहतात की सुनेला कायम ताब्यात ठेवा.
जे विचार करतात की सरकार आपल्या कामाने फक्त संसार चालविणाऱ्यांच्या वा संसाराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात लागली आहे, ते चुकीचं आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा निर्णय आज त्याचप्रकारच्या पौराणिक विचारसरणीच्या लोकांच्या हातात आली आहे. राज्यपालांची ढवळाढवळ, सरकारची धमकी, बुल्डोझरचं कारस्थान, हिंदू मुस्लिम विवाद सर्वांची काळी सावली आज प्रत्येक घरावर पडत आहे, समोरून वा मागून.
दु:खाची बाब ही आहे की स्त्रिया बरोबरीच्या मतदाता असूनदेखील जुन्या काळाच्या विचारसरणीला पाठिंबा देऊ लागल्या आहेत की आम्हाला काय करायचे जे पती सांगतील तेच करणार.
राज्यपालांचं काम करण्याची पद्धत अशी आहे की एक तर आमचा ऐका अन्यथा आम्ही तुम्हाला त्रास देत राहणार, हाच विचार पंतप्रधान कार्यालयातून सुरू होतो आणि तोच प्रत्येक घरामध्ये पोहोचतो. विद्रोह करण्याचा, विरोध करण्याचा, स्वत:चा आत्मसन्मान व आत्मविश्वास ठेवण्याचा हक्क प्रत्येक सुनेला आहे की नाही? लोकशाहीमध्ये विरोधकांना सरकार चालविण्याचा हक्क आहे की नाही?