* सोमा घोष
वर्षानुवर्षे केसांना तेल लावण्याची परंपरा आहे. तेल लावल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. डोकं शांत रहातं. रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे केसगळती आणि केस पांढरे होणं कमी होतं. सामान्य कामे करणाऱ्या मुलींना श्रीमंत घरातील मुलींप्रमाणे तेल न लावता अभिनेत्रींनी वापरलेली उत्पादनं लावायला हवीत ही विचारसरणी चुकीची आहे.
आजच्या धावपळीच्या जगतात केसगळती आणि केस पांढरे होणं सामान्य आहे. अशावेळी नियमित तेल लावल्यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकरित्या निरोगी होऊ शकता.
ऑइलिंग केव्हा आणि कसं कराल, याबाबत माहिती असणं गरजेचं आहे – जर मसाज डोकं, कानाच्या मागे आणि सर्व प्रेशर पॉईंट लक्षात घेऊन केल्यास याचा फायदा त्वरित मिळतो. मसाजमुळे केस चमकदार होण्याबरोबरच चेहऱ्यावर चमकदेखील येते.
असे करा मजबूत केस
केसांना आठवडयातून दोनदा ऑइलिंग गरजेचा आहे. यामुळे केस मुलायम आणि चमकदार राहतात. डॅमेज केसांना सतत रिपेरिंग होत राहते सोबतच प्रदूषणानेदेखील केस डॅमेज होत नाहीत कारण तेल केसांच्या प्रोटीन बनवतात ज्यामुळे केस हेल्दी आणि स्ट्राँग राहतात. प्रत्येक मोसमात ऑइलिंग उत्तम होतं.
तसंही केसांमध्ये तेल प्रत्येक जण आपापल्या सुविधेनुसार लावतं, तर सादर आहेत काही अशा पद्धतीच्या प्रभावी होण्यासोबतच केस गळती देखील रोखतात :
* तेल लावण्यापूर्वी थोडं गरम करा.
* केस विभागून घ्या आणि प्रत्येक भांगात व्यवस्थित तेल लावा.
* एकसाथ अधिक तेल लावू नका, प्रत्येक भांगात थोडं तेल घेऊन पेरांनी मालिश करा.
* मालिश १० ते १५ मिनिटं करा म्हणजे तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ताजंतवानं वाटेल.
* मसाज केल्यानंतर त्वरित केस धुवू नका. कमीत कमी तासाभरानंतर धुवा. तसंही रात्रभर तेल लागलेलं असल्यामुळे फायदा अधिक होतो.
* नेहमी तुमचं पिलो कव्हर स्वच्छ ठेवा, नियमित धुवा कारण तेल लागलेलं असल्यामुळे रोगजंतू त्वरित वाढतात.
* नेहमी उत्तम शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. केसांना नैसर्गिक वातावरणात सुकू द्या. ब्लोअर वा ड्रायरचा वापर कमी करा कारण याच्या अती वापरामुळे केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात.