* अनुराधा
आधुनिकतेच्या या युगात सर्वच गोष्टींना नाविन्याचा नवा साज चढला आहे. हेच नावीन्य तरुणींच्या विचारातही आले आहे. आता मुली जास्त वय वाढेपर्यंत एकटे राहाणे पसंत करतात आणि स्वत:च्या मर्जीनुसार जीवनाची गाडी पुढे नेतात, पण ३०व्या वर्षाच्या टप्प्यात आल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होतात, विशेषत: ज्या मुली अविवाहित असतात, त्यांच्यात काही बदल विवाहित मुलींपेक्षा वेगळे असतात.
या संदर्भात वंध्यत्व आणि दंत आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, महिला विवाहित असो किंवा अविवाहित, त्यांनी वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होऊ लागतात आणि वयाच्या ४० व्या वर्षी या बदलाची प्रक्रिया वेगवान होते. अविवाहित मुलींना काही आजार होण्याची शक्यता असते, कारण त्या लैंगिकदृष्टया सक्रिय नसतात.
शरीर सुदृढ ठेवण्यासाठी विवाहित मुलींमध्ये जे बदल होतात, ते सर्व बदल अविवाहित मुलींच्या शरीरात होत नाहीत, पण या वयात सर्व मुलींच्या आरोग्याशी संबंधित समस्या जवळपाससारख्याच असतात आणि स्वत:ला सुदृढ ठेवण्याच्या पद्धतींमध्ये फारसा फरक नसतो.
कुटुंबाच्या आरोग्य इतिहासाकडे लक्ष द्या
या वयात स्वत:ला सुदृढ ठेवण्यासाठी अनेक मार्ग असतात, विशेषत: व्यायाम, नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आणि पौष्टिक आहार इत्यादींचा या वयातील विशेष गरजांमध्ये समावेश असतो. तरुणींनी या तिघांमध्ये योग्य समतोल राखणे अत्यंत आवश्यक असते. पोषणतज्ज्ञ सांगतात की, वैद्यकीय कमतरतेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास या वयातील महिला पुरुषांपेक्षा किंचित कमकुवत होतात.
हे असे वय असते जेव्हा महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. वाढते वजन हे यामागचे कारण असते. या वयात जर त्यांचा बॉडी मास्क इंडेक्स ३०पेक्षा जास्त असेल तर कॅन्सरसारख्या घातक आजाराची शक्यता अधिक वाढते. आता स्तनाच्या कर्करोगावर यशस्वी उपचार होऊ शकतात. म्हणूनच महिलांनी वयाची पस्तिशी सुरू होताच त्यांचा कौटुंबिक आरोग्य इतिहास तपासणे आवश्यक असते. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर दर २ वर्षांनी निश्चितपणे मॅमोग्राम करावा आणि जर असा कोणताही इतिहास नसेल तर दर ३ वर्षांनी एकदा मॅमोग्राम नक्कीच करून घ्यावा.
कॅल्शियमची पातळी कमी होऊ देऊ नका
या वयात केवळ कर्करोगाचीच शक्यता नसते तर कॅल्शियमची पातळीही खाली जाते, ज्यामध्ये ऑस्टियोपेनिया आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांशी संबंधित आजारांची भीती असते. ही स्थिती गंभीर असते, कारण दोन्हीमध्ये हाडे लचकण्याचा आणि तुटण्याचा धोका असतो. या दोन्ही समस्यांमुळे मुली स्वत:हून सहजपणे उठू किंवा बसू शकत नाहीत. दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. कॅल्शियमची पातळी कमी होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता असणे.
केवळ ड जीवनसत्त्वाने परिपूर्ण असलेला आहार घेऊन ही कमतरता भरून काढता येत नाही तर त्या सोबतच यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत आवश्यक असतो, जो आधुनिक महिलांना त्रासदायक वाटतो. त्यांना त्यांचे सौंदर्य बिघडण्याची भीती वाटते. त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत म्हणून महिला उन्हातून बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण शरीर झाकून ठेवतात. प्रत्यक्षात अतिनील किरण त्वचेत जाणे आवश्यक असते, कारण ते ड जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे.
जीवनसत्त्व ब १२ ने युक्त आहार गरजेचा
३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींच्या शरीरात ब १२ या जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येते, ज्यामुळे त्यांना केस गळणे, अशक्तपणा, चिंता, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. यासोबतच त्वचेशी संबंधित आजारही होतात. त्वचारोग तज्ज्ञ सांगतात की, ९० टक्के महिलांमध्ये वयाच्या ३५ ते ४० व्या वर्षी जीवनसत्त्व ब १२ ची कमतरता निर्माण होते. खरंतर हे असे वय असते जेव्हा आहार थोडा कमी होतो आणि आहारात इष्टतम प्रथिने किंवा जीवनसत्त्व ब १२ चा समावेश नसल्यास त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
ही समस्या बहुतांश करून त्यांना होते ज्या शाकाहारी असतात, कारण ब १२ हे जीवनसत्त्व फक्त अंडी, मांस आणि मासे यामध्ये आढळते. दुग्धजन्य पदार्थांमध्येही जीवनसत्त्व ब १२ असते. यासोबतच बाजरी, नाचणी, ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्यांमधूनही जीवनसत्त्व ब १२ ची कमतरता काही प्रमाणात भरून निघते.
व्यायामही करा
प्रत्येक वयात व्यायाम आवश्यक असला तरी वयाच्या ३० व्या वर्षी व्यायाम ही शारीरिक स्वास्थ्यासाठीची गरज बनतो. या वयातील महिलांची चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढू लागते, पण या वयात वजन नियंत्रित ठेवणेही खूप गरजेचे असते, अन्यथा थायरॉईड, हृदय तसेच श्वसनाचे आजार होण्याची भीती असते.
वास्तविक, एक काळ असा होता की, महिला हाताने सर्व कामे करायच्या, त्यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये द्रव राहत असे. सध्या नोकरदार महिलाही भरपूर शारीरिक हालचाली करतात आणि त्यातून त्यांच्या शरीराला फायदाही होतो, पण आता घरातील कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जातात आणि यात शारीरिक श्रम कमी लागतात.
वयाच्या ३०-४० व्या वर्षी शरीर सक्रिय ठेवण्यासाठी महिलांनी ४५ मिनिटे ते १ तास मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळी फेरफटका मारणे आणि कार्डिओ व्यायाम करणे खूप महत्त्वाचे असते. यामुळे चयापचय क्रिया योग्य राहाते, जॉगिंग म्हणजेच धावणे हाही या वयातील महिलांसाठी चांगला व्यायाम आहे, पण हे सर्व व्यायाम सकाळीच करावेत, कारण त्यावेळी शरीर अधिक गतिमान असते.
एकाकीपणाशी लढण्याचे अनेक मार्ग
३०-४० या वयात अविवाहित राहणाऱ्या बहुतांश मुलींना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. हा एकटेपणा त्यांना नैराश्यासारख्या गंभीर आजाराकडे घेऊन जातो. हे असे वय असते जेव्हा त्यांच्या वयाचे जवळपास सर्व मित्र आपापल्या कुटुंबात व्यस्त झालेले असतात आणि भावंडांचाही संसार सुरू झालेला असतो.
आई-वडिलांकडे बोलायला फारसे काही नसते
अशा परिस्थितीत अविवाहित मुलीला जोडीदाराची उणीव भासते. एकटेपणा केवळ एखादी व्यक्ती वाटून घेऊ शकत नाही. याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी असतात ज्या एकटेपणा दूर करतात. यात पुस्तकांचा मोठा वाटा आहे.
आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही आणि जीवनशैलीत काही बदल स्वीकारले तर महिला वयाच्या ३०-४० व्या वर्षीही एकटेपणाचा आनंद घेऊ शकतात आणि हो, जर मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणीही एखादा तात्पुरता जोडीदार मिळाला तर त्याला सोडू नका. जसे प्रत्येक पती-पत्नी एकमेकांना पाहिल्यानंतर स्वत:ला बदलतात त्याप्रमाणे त्याच्यासोबत कशाप्रकारचे जीवन जगायचे, हे ठरवा.
एकटया महिलेनेही जोडीदारानुसार स्वत:ला बदलण्याची सवय लावली पाहिजे. सेम सेक्स किंवा हॅट्री सेक्स या दोन्ही गोष्टी निषिद्ध मानू नका आणि द्वेष वाटल्यास सांगायला संकोच करू नका, परंतु यात खूप सावधगिरी बाळगावी लागेल.