* भारती तनेजा, संचालक, एल्पस ब्युटी क्लिनिक आणि अॅकेडमी

मेकअपमधील फाउंडेशन सुंदर आणि नैसर्गिक लुक देण्यासाठी सर्वात जास्त मदत करते, पण फाउंडेशनशी संबंधित प्राथमिक गोष्टींबाबत तुम्हाला माहिती आहे का? या गरजेच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे तुम्हाला सुंदर चेहरा मिळेल सोबतच तुमचा मेकअप दीर्घकाळ खराब होणार नाही. फाउंडेशनची निवड करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे? चला जाणून घेऊया :

* जेव्हा तुम्ही फाउंडेशन खरेदी कराल तेव्हा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. ते खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्याची टेस्टरने नक्की टेस्ट घ्या.

* शेड चेक करण्यासाठी ते थोडेसे गालांच्या उंचवट्यांवर लावून बघा.

* मेकअप केल्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत बदलतो. त्यामुळे फाउंडेशन खरेदी करतेवेळी मेकअप करून जाऊ नका, कारण जर तुम्ही मेकअप करून फाउंडेशन गालांवर लावले तर तुम्हाला योग्य शेड समजू शकणार नाही.

* गोऱ्या, सावळया, काळया त्वचेपैकी तुमची त्वचा कशी आहे, हे फाउंडेशन खरेदी करण्यापूर्वी व्यवस्थित समजून घ्या.

* स्वत:च्या त्वचेच्या रंगापेक्षा नेहमी एक कलर लाईट शेडचे फाउंडेशन निवडा.

* असा शेड निवडा जो तुमच्या त्वचेच्या रंगाच्या अगदी जवळचा असेल आणि तो लावल्यावर असे वाटणार नाही की त्वचेवर वेगळे काहीतरी लावले आहे.

* फाउंडेशन तुमच्या त्वचेशी चांगल्या प्रकारे एकरूप होणे अत्यंत गरजेचे असते.

* फाउंडेशन टेस्ट करताना तुम्ही स्वत:चा फोटो काढून तुमच्या चेहऱ्याचा रंग आणि फाउंडेशनचा रंग यातील साम्य तपासू शकता.

* तुम्ही ऋतुमानानुसारही फाउंडेशनची निवड करू शकता. उन्हाळयात तेलकट नसलेले फाउंडेशन निवडा तर हिवाळयात थोडेसे मॉइश्चर असलेले फाउंडेशन उपयुक्त ठरते.

* दिवस आणि रात्रीनुसार वेगवेगळे फाउंडेशन निवडा. दिवसा लाईट फॉर्म्युला असलेले फाउंडेशन आणि रात्री जाडसर थर असलेले फाउंडेशन उत्तम ठरते. ते शिमरसह आणि तुम्हाला ग्लॉसी लुक देणारे हवे.

* फाउंडेशन रात्री खरेदी करण्याची चूक करू नका. ते खरेदी करताना कितीही उजेड असला तरी योग्य शेड समजत नाही. फाउंडेशन हे नेहमी नैसर्गिक उजेडातच खरेदी करा.

* तुम्हाला नेमके कोणते फाउंडेशन हवे आहे हे फाउंडेशन खरेदी करण्यापूर्वीच ठरवा. शीर कव्हरेजचे फाउंडेशन लाईट कव्हरेजसाठी असते आणि ते त्वचेचा पोत एकसमान करून नैसर्गिक लुक मिळवून देते. मीडियम कव्हरेजचे फाउंडेशन खूपच जाडसर असते. ते चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी मदत करते. फूल कव्हरेज पुळयांमुळे पडलेले डाग लपवते. ते जास्त करून फोटोशूट किंवा लग्नावेळी वापरले जाते.

* चेहऱ्याच्या त्वचेनुसारच फाउंडेशनची निवड करा.

* सामान्य चेहरा असल्यास तुम्ही तुमच्या शेडनुसार मिनरल पावडर आणि टिंटेड मॉइश्चरायझर वापरू शकता.

* त्वचा कोरडी असल्यास तुम्ही क्रीम असलेले फाउंडेशन वापरू शकता. वाटल्यास तुम्ही त्यात थोडे मॉइश्चरायझरही मिसळू शकता. शक्यतो मॅट टाळा, कारण यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसू लागेल.

* त्वचा तेलकट असेल तर ऑइल फ्री लिक्विड फाउंडेशन किंवा मॉइश्चरायझरचा वापर करा. तुमच्यासाठी मॅट फिनिशही चांगले ठरेल.

* तुमची कॉम्बिनेशन फेस स्किन असेल म्हणजे गालाची त्वचा सर्वसाधारणपणे कोरडी असेल आणि नाकाकडील भाग तेलकट असेल तर नॉर्मल लिक्विड ड्राय टाळा.

* तुमच्या चेहऱ्यावर पुळया असतील तर अशा त्वचेसाठी सॅलिसिलिक अॅसिड असलेले फाउंडेशन निवडा. लक्षात ठेवा की, हे पावडर किंवा लिक्विड बेस असलेले हवे.

* एजिंग स्किनची समस्या जसे की, पुळया, सुरकुत्या, सैलसर त्वचा यासाठी फाउंडेशनचे मीडियम कव्हरेज ठेवा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळेल.

* काही शेड्स तुमच्या निवडा. या शेड्स तुम्ही तुमच्या डोळयांच्या रंगानुसारही निवडू शकता.

* जर तुमची अंडरटोन उबदार असेल तर तुम्ही गोल्ड किंवा पिवळसर फाउंडेशन निवडू शकता. याशिवाय तुम्ही कॅरमल, गोल्डन चेस्टनट आणि बेज कलरचीही निवड करू शकता.

* न्यूट्रल अंडरटोनसाठी तुम्ही बफ, न्यूड आयवरी आणि पॅरालाईनची निवड करू शकता.

स्वत:ची अंडरटोन कशी निवडाल?

सर्वसाधारणपणे ३ प्रकारच्या अंडरटोन असतात, ज्या तुम्ही तुमच्या मनगटाच्या नसांचा रंग पाहून त्यानुसार ओळखू शकता :

कूल अंडरटोन : जर तुमच्या मगगटाच्या नसा जांभळट रंगाच्या असतील तर तुमची अंडरटोन थंड आहे.

उबदार अंडरटोन : तुमच्या मनगटाच्या नसा हिरवट किंवा ऑलिव्ह रंगाच्या असतील तर तुमची अंडरटोन उबदार आहे.

न्यूट्रल अंडरटोन : तुमच्या मनगटाच्या नसा जांभळट आणि हिरवट अशा दोन्ही रंगांच्या असतील तर तुमची अंडरटोन न्यूट्रल आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...