* गरिमा पंकज

अलीकडेच मुंबईच्या दादरसारख्या उच्चभ्रू भागात एका ४० वर्षीय स्त्रीने पोलिसात तक्रार दाखल केली की तिच्या पतीने तिच्या तिला मुलगा जन्माला घालण्याच्या दबावाखाली ८ वेळा गर्भपात करण्यास विवश केलं. यासोबतच तिला १,५०० पेक्षा अधिक हार्मोनल आणि स्टेरॉइडचे इंजेक्शन देण्यात आले. भारतात गर्भपात बेकायदेशीर आहे, म्हणून तिचा गर्भपात आणि उपचार तिच्या सहमतीशिवाय परदेशात करण्यात आले. मुलगा होण्याच्या इच्छेने केल्या जाणाऱ्या या मनमानी विरुद्ध आवाज उठवल्यावर तिला मारझोड करण्यात आली.

पीडितेने तिचा हा वेदनादायी प्रवास सांगितला की लग्नानंतर काही काळातच पतीने वारसाच्या रूपात एक  मुलगा व्हावा म्हणून जोर दिला आणि जेव्हा असं झालं नाही तेव्हा तिला मारझोड करायला सुरुवात केली. त्यामुळे परदेशात तिचा ८ वेळा गर्भपात करण्यात आला. महिलेचे वडील सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न एका उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात केलं होतं. पीडितेचे पती आणि सासू दोघेही पेशाने वकील आहेत आणि ननंद डॉक्टर आहे.

२००९ साली पीडितेने एका मुलीला जन्म दिला. दोन वर्षानंतर २०११ मध्ये जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहीली तेव्हा तिचे पती तिला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि गर्भात पुन्हा मुलगी असल्याचं कळताच त्यांनी तिला गर्भपात करण्यासाठी विवश केलं.

आरोपी पती आपल्या पत्नीला भ्रुण प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन गेला आणि यापूर्वी आनुवंशिक रोग निदानासाठी बँकॉकमध्येदेखील घेऊन गेला. गर्भधान पूर्वी भ्रुणाची लिंग तपासणी करून त्यावर उपचार आणि सर्जरी केली जात होती. त्यानंतर पीडितेला १,५०० पेक्षा अधिक हार्मोनल आणि स्टेरॉइडचे इंजेक्शन देण्यात आले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पतीच्या विरोधात छळ, मारझोड, धमकी आणि जेंडर सिलेक्शनची केस दाखल करण्यात आली.

हे सर्व पाहता, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर श्रीमंत आणि उच्चशिक्षित लोक असं करत असतील तर हुंडा देण्यात असमर्थ व अशिक्षित लोकांबद्दल काही बोलूच नका. अलीकडच्या काळात जेव्हा मुली उच्च हुद्दयावर पोहोचून सहजपणे स्वत:ची भूमिका निभावत आहेत, तेव्हा अशा प्रकारची विचारसरणी ठेवणाऱ्या श्रीमंत कुटुंबीयांच्या अशा संकुचित मानसिकतेवर खेद व्यक्त करण्या व्यतिरिक्त अजून काय बोलू शकणार?

स्त्रियांसोबत अमानुषता

परंतु इथे गोष्ट केवळ संकुचित विचारसरणी व वंशाच्या दिव्यासाठी हव्यास याची नाहीए. अशा प्रकारच्या केसेस खरंतर अमानुषतेची सीमा पार करतात. एका स्त्रीसाठी आई होण्याचा प्रवास सहज सोपा नसतो. गर्भधारणेनंतर पूर्ण नऊ महिने तिला कितीतरी शारीरिक त्रासातून जावं लागतं. हे केवळ एक स्त्री समजू शकते, परंतु अनेकदा पुरुष स्त्रियांना माणूस नाही तर मुलं जन्माला घालणारी मशीन समजतात.

त्यांना हेदेखील समजत नाही की एका आईची नाळ आपल्या बाळाशी जेव्हा ते तिच्या पोटात असतं तेव्हापासून जोडलेली असते. बाळ तिच्या शरीराचा एक भाग असतो. अशावेळी फक्त मुलगी झाल्यामुळे तिचा गर्भपात करणं, त्या जन्मास न आलेल्या मुलीसोबतचं आईच्या ममतेचादेखील खून केला जातो. असुरक्षित गर्भपात हे गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूचं तिसरं सर्वात मोठं कारण आहे.

एवढंच नाही तर गर्भपात आणि उपचाराच्या नावाखाली तिच्या शरीरात हार्मोनल आणि स्टेरॉइडचे इंजेक्शन देणं वा सर्जरी करणं कोणत्याही प्रकारे मान्य नाहीए. पती होण्याचा अर्थ असा नाही की पुरुष स्त्रीच्या शरीराचा मालक आहे आणि तिच्यासोबत काहीही करण्याचा हक्क त्याला मिळाला आहे. अशा प्रकारची लोक रेपिस्टपेक्षादेखील अधिक अमानुष असतात. रेपिस्ट एखाद्या अनोळखी महिलेसोबत जबरदस्ती करतो, परंतु पती ७ वचनं निभावून वचन देऊनदेखील स्त्रीसोबत अतिशय वाईट वागतो.

स्त्री केवळ मूल जन्माला घालण्यासाठी नाहीए

अलीकडेच अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या सरकारमध्ये स्त्रियांचा समावेश करणार असल्याच्या सर्व शक्यता धुडकावून लावत समूहाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की स्त्रियांनी फक्त मुलं जन्माला घालावीत. स्त्रीने कॅबिनेटमध्ये असणे गरजेचे नाही. त्यानंतर अफगाणिस्तानच्या शेकडो स्त्रियां स्वत:चा जीव धोक्यात घालून या विरोधात रस्त्यावर उतरल्या. तालिबानद्वारे विरोध केल्यावर कारवाईत महिला मोर्चेकऱ्यांच्या विरोधात लाठीकाठयांचा वापर करण्यात आला. एवढेच नाही तर तालिबानने अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या खेळांवरदेखील बंदी आणली.

अशा प्रकारचे विचार पुरुषांच्या छोटया विचारसरणीचा परिणाम आहे. आज स्त्रिया जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली हुशारी सिद्ध करत आहेत. तरीदेखील स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जात आहे. गोष्ट तालिबानची असो वा भारताची, स्त्रियांसोबत अमानुषता कुठेही केली जाते आणि याचं कारण स्त्रियांबद्दलची समाजाची संकुचित विचारसरणी आहे. समाजाची ही वागणूक कुठे ना कुठे धार्मिक अंधश्रद्धा आणि धर्मगुरूंची देण आहे.

मी मूल जन्माला घालणारी मशीन नाहीए

स्त्री अभिनेत्री असो वा साधारण घरातील मुलगी अनेकदा भारतीय समाजात लग्नानंतर अनेक मुलींना हा प्रश्न आवर्जून विचारला जातो की ती आनंदाची पेढे केव्हा देणार आहे म्हणजेच आई केव्हा होणार आहे. असं वाटतं की जणू स्त्रीचं सर्वप्रथम आणि गरजेचं काम म्हणजे मुलं जन्माला घालणं आहे.

खरंतर गृह प्रवेश झाल्यानंतर स्त्रियांना एक उत्तम पत्नी आणि सुनेवर घराला वारस देण्याची जबाबदारीदेखील टाकली जाते. तिला मुलाची आई होण्याचा आशीर्वाद दिला जातो. आई होण्यास उशीर झाल्यावर टोमणे मारले जातात. केवळ कुटुंबियच नाही तर नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांचा दृष्टिकोणदेखील हाच असतो. अनेकदा घरातील मोठया मुलींना समजावलं जातं की लग्नानंतर करियर विसरून अगोदर घर आणि घराची जबाबदारी सांभाळायला हवी. मुलींना कधीही स्वत:च्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्क मिळत नाही. अनेकदा सासू-सासरे मुलीकडे मागणी करतात की त्यांना नातू हवाय.

अशाप्रकारे कधी नातवाची इच्छा सासू-सासरे सुने वरती लादतात, तर कधी लग्नानंतर त्वरित बाळ होण्यासाठी ते उतावीळ होतात. असं वाटतं की जणू सून मूल जन्माला घालण्याची मशीन आहे. जेव्हा हवं तेव्हा नातवाला जन्म द्यावा आणि जर गर्भात मुलगी असेल तर तिची हत्या करा. जणू काही मुलीला स्वत:ची कोणतीही संवेदनाच नाहीए. तिचं कोणतही अस्तित्व नाहीए. रूढीवादी परंपरेनुसार मुलीशी असंच वागलं जातं.

बदलतं मुलीचं आयुष्य

लग्न तसही दोन लोकांमध्ये होतं. परंतु अपेक्षा फक्त सुनेकडूनच ठेवल्या जातात. तसंही नव्या वातावरणात अॅडजेस्ट होणं आणि घर सांभाळणं तिच्या आयुष्याचं एक आव्हान असतं. तिच्या आयुष्यात असे अनेक बदल येतात, याचा सामना फक्त आणि फक्त मुलीलाच करावा लागतो. एवढंच नाही तर नव्या रुढी-परंपरांपासून सर्व त्यांच्या मनासारखं वागण्याचं ओझंदेखील घरातील नवीन सुनेवर टाकलं  जातं.

ज्या मुलींसाठी आयुष्यात करिअर महत्त्वाचं असतं त्यांनादेखील आपल्या प्राथमिकता बदलाव्या लागतात. एक उत्तम सून, पत्नी बनण्याच्या नादात करीयर खूपच मागे फेकलं जातं. उरलेली कसर ती आई बनल्यानंतर घरच्या घरात राहून बाळ सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण करतात.

सोसायटीमध्ये दिखावा

समाजात दिखावा करण्याची प्रथा खूपच जुनी आहे. सून घरी आल्यानंतर लग्नात मिळालेल्या सामानापासून तिचं सौंदर्य आणि कुकिंग स्किल्सपासून सासरची लोकं नातेवाईकांसमोर स्तुती करून थकत नाहीत. असं करून ते समाजात स्वत:चा मान वाढवत असतात. सोसायटीत चांगल्या आणि वाईट सुनेचे काही मानदंड ठरलेले असतात. ज्यांच्या आधारे एका स्त्रीला जज केलं जातं. सून घरात किती काम करते, किती लवकर नातवाचं तोंड दाखवणार आहे वा किती मोठया घरातून आली आहे अशा गोष्टी तिचं चांगलं आणि वाईट बनण्याचा निर्णय करतो.

समाजाला नको असते आत्मनिर्भर मुलगी

समाजात एका आत्मनिर्भर सुनेला पचवणं आजदेखील कठीण आहे. जर सून स्वत:च्या कपडयांबाबत, करियर आणि मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या गोष्टी स्वत: ठरवत असेल तर सासरी तिचं टिकणं कठीण होतं. तिचे पती आणि सासु-सासऱ्यांना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. जर एखादी सून कामावरून घरी उशीरा परतत असेल तर तिला जज केलं जातं. तिची पुरुष मित्राशी मैत्री असेल तर तिच्या  चारित्र्यावर प्रश्न केले जातात आणि लग्नानंतर आई न होण्याचा निर्णय तिने घेतला असेल तर तिच्यातील अनेक उणीवा शोधल्या जातात.

यासाठी गरजेचं आहे की स्त्रियांनी स्वत: स्वत:चं महत्त्व समजायला हवं आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली स्वत:चं आयुष्य वाया घालवू नये. पुरुषांनीदेखील अशा प्रकारची विचारसरणी स्विकारता कामा नये, मुलगा असो वा मुलगी कोणताही भेदभाव न करता बाळाला स्वत:चं प्रेम देण्याची गरज आहे.

 

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...