* श्रावणी

नववधू बनण्याची तयारी १-२ दिवसाचं काम नाही आहे तर लग्न ठरताच स्वत:चं शरीर तसंच सौंदर्याची काळजी घ्यायला सुरुवात करायला हवी.

१. नववधूच्या सौंदर्यात केवळ चेहराच नाही तर डोक्यापासून पाय तसंच हाताचंदेखील महत्त्व असतं. म्हणूनच संपूर्ण शरीराची योग्य प्रकारे काळजी घ्यायला सुरुवात करायला हवी.

२. लग्नाच्या खूप अगोदरपासूनच हात आणि पायाची योग्य निगा तसंच आहाराकडे लक्ष देण्याबरोबरच चेहऱ्याच्या त्वचेवर उपचार तसंच योग्य काळजीदेखील घ्यायला हवी.

३. नववधूचा मेकअप पार्लरमध्येच करायला हवा. ही इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे. कारण मेकअप आता एक नवीन आर्ट बनलं आहे.

४. बराच अगोदर त्वचेनुसार उठणं, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, मेहंदी, मसाज इत्यादी केलं जातं. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होतो आणि त्यावर चमकदेखील येते.

५. मेकअप करण्यापूर्वी ब्युटी ट्रीटमेंट घेणंदेखील गरजेचं आहे. जसं की त्वचेवर डाग असतील तर ४-५ आठवडयापूर्वीच त्यावर उपाय करायला हवे म्हणजे त्वचेतील मोकळी रंध्रे बंद होतील आणि त्वचेवर डागदेखील कमी होतील.

६. तुमच्या त्वचेचा पोत तुम्हाला माहित असायला हवा.

७. त्वचा खूप कोरडी असेल तर मेकअप केल्यावरती सुरकुत्या दिसू लागल्यावर चेहरा खूपच वाईट दिसतो आणि यामुळे मेकअपचा गेटअपदेखील जातो म्हणून लग्नाच्या काही आठवडे अगोदर त्वचेवर उपचार करा, फेशियल करा, त्वचेला टोन अप करा यामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचादेखील चमकू लागेल.

८. वाढत्या प्रदूषणामुळे चेहऱ्यावरती बरीच मृत त्वचा एकत्रित होते. ती काढावी.

९. मृत त्वचेमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते आणि चेहऱ्यावर चमक येत नाही. यासाठी मृत त्वचा काढण्यासाठी उपचार केल्याने ती अधिक ताजी तवानी दिसते.

१०. नववधूचा शृंगार सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची त्वचा कशीही असो तेलकट, कोरडी वा सामान्य. त्वचेनुसारच नववधूचा शृंगार करायला हवा. निष्काळजीपणा आणि चुकीच्या मेकअपने वाईट परिणाम दिसू शकतात.

खास तयारी

११. मेकअप आणि पेहेरावाचा रंग यांचा ताळमेळ साधणं गरजेचं आहे. जसं गव्हाळ रंगाच्या नववधूवर पीच रंग, गव्हाळ रंगावर मरून वा सोनेरी रंग छान दिसतो तर गोऱ्या रंगावरती प्रत्येक रंगाचा पेहराव खुलून दिसतो.

१२. ब्रायडल बुकिंग चार ते आठ आठवडयापूर्वी करा म्हणजे सौंदर्यतज्ज्ञ तुमच्या त्वचेनुसार संबंधित माहिती देतील.

१३. मेकअपन सौंदर्य उजळण्यासाठी करा. तुमची वास्तविकता लपविण्यासाठी नाही.

१४. मेकअप करतेवेळी शरीराच्या प्रत्येक भागाकडे लक्ष द्या. मलीन हातपाय तुमचं सौंदर्य खराब करू शकतं.

१५. मेकअप चेहऱ्याची ठेवण आणि रंग लक्षात घेऊन करा.

१६. मेकअप आणि दागिन्यांचा ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे.

लग्नाच्या दिवशीचा मेकअप

१७. मेकअपपूर्वी त्वचेचं ग्रुमींग होणं गरजेचं आहे. यामुळे नववधूचा सर्व थकवा दूर होतो. म्हणून लग्नाच्या दिवशी मेकअप सुरू करण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास अगोदर त्वचेला ग्रुमींग केलं जातं.

१८. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावरती कोणतेही डाग नाहीत ना हे पाहणं गरजेचं आहे.

१९. भुवयांचा आकार योग्य असावा. एक केस जरी दिसला तरी त्याच वेळी तो काढून टाका. त्यानंतर कोल्ड कम्प्रेसर देऊन पॅक लावून मेकअप सुरू करा.

२०. सर्वप्रथम त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता बेस लावा. जर त्वचा खूपच कोरडी असेल तर एक दोन थेंब मॉइश्चरायजर वा टोनर लावा.

२१. यानंतर डोळयांना आकार आणि पेहरावशी मॅच करणार आयशाडो आणि टफर लावा. त्यानंतर लाइनर व मस्कारा लावा. नंतर आयब्रोजला हलक्या पेन्सिलने योग्य आकार द्या.

२२. चेहऱ्याची ठेवण आणि त्वचेच्या रंगानुसार लिप पेन्सिलने ओठांना योग्य आकार देत त्यावर पेहेरावाच्या रंगाच्या एक व दोन नंबर गडद रंगाची लिपस्टिक लावा.

२३. शेवटी डोळयाजवळ कपाळावरच्या भागात डिझायनर बिंदी लावा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...