* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर
डॉ. भारती तनेजा द्वारा
माझं वय ५० वर्षे आहे. माझे केस गळत आहेत. मी माझ्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी एखादा उपाय सांगा?
केसांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित मसाज करणं गरजेचं आहे. मसाजसाठी हेअर टॉनिक व हेअर ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. तेल केसांना नरिष करण्याबरोबरच मजबूत आणि शायनीदेखील बनवतं. केस प्रोटीनने बनलेले असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे. अंद्मद्दरित डाळी, दूध, अंडी, मासे, सोयाबीन, चिकन इत्यादी प्रोटिन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यांचा तुमच्या खाण्यात समावेश करा. आठवडयातून एकदा घरगुती पॅकचा वापर करणे योग्य आहे. यासाठी रिठा, आवळा, शिकेकाई व मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते उकळवा. जेव्हा पाणी सुकून जाईल तेव्हा ते वाटून घ्या आणि त्यामध्ये एलोवेरा जेल व अंड एकत्रित करा. नंतर ते पॅकप्रमाणे लावा.
माझं वय २५ वर्षे आहे. माझ्या डोळयाखाली खूपच काळी वर्तुळे आहेत. ती कमी करण्याचा एखादा सोपा उपाय सांगा?
काळी वर्तुळे घालविण्यासाठी संत्र व बटाटयाच्या रसामध्ये कॉटन बुडवून नंतर डोळे बंद करून पापण्यांवर थोडा वेळ ठेवा. असं नियमित केल्यामुळे डोळयांना आरामदेखील मिळेल. या व्यतिरिक्त आराम व पुरेशी झोप घ्या. अंधारात टीव्ही पाहू नका वा फोनवर अधिक काम करू नका. शक्य असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन यलो लेझर घ्या. यामुळे काळी वर्तुळं लवकरच निघून जातील. दररोज बदामाच्या तेलामध्ये काही थेंब ऑरेंज ऑइल एकत्रित करून करंगळीने हलकसं डोळयांभोवती मसाज करा.
काजळशिवाय माझे डोळे खूपच सुने दिसतात. लाइनर शिवाय बाहेर जायला छान वाटत नाही. काजळ लावल्यामुळे स्मज होतात. एखादा उपाय सांगा ज्यामुळे मी सुंदर दिसेन?
काजळ विकत घेतेवेळी नेहमी लक्षात ठेवा की ते लाँग लास्टिंग आणि स्मज प्रुफ असावं. तुम्हाला हवं असल्यास पर्मनंट काजळ लावू शकता. जे १५ तास टिकतं. कधी पसरत नाही. लक्षात ठेवा जिथून लाइनर काजळ लावत असाल तिथे हायजिनची खास काळजी घ्या.
माझी नखे खूपच लवकर तुटतात आणि हात सुंदर दिसत नाहीत. नखं मजबूत करण्यासाठी काय करू?
नखे प्रोटीनने बनलेली असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असायला हवं. नखांना मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात विटामिन, फायबर व प्रोटीन अधिक प्रमाणात असायला हवं. दररोज हिरव्या भाज्या आवर्जून खा. फळं आणि डाळीदेखील नखांना चांगलं करण्यासाठी मदत करतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळेदेखील नखे तुटू लागतात. म्हणून कॅल्शियमयुक्त खाणं जसे की दूध, दही, अंड्याचा वापर करा. नखांना शेपमध्ये ठेवा म्हणजे ती तुटणार नाहीत. दररोज काही वेळासाठी कोमट ऑलिव ऑइलमध्ये थोडावेळ त्यांना भिजवून ठेवा आणि हलका हलका मसाज करा. यामुळे नखे मजबूत होतात आणि नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळेदेखील नखे लवकर तुटत नाहीत.
कपाळावर सतत टिकली लावल्यामुळे त्याजागी डाग पडू लागले आहेत. ते काढण्यासाठी व कमी करण्यासाठी काय करू?
तुमचा टिकलीचा ग्लू उत्तम क्वालिटीचा नसेल तर डाग पडण्याचे चान्सेस राहतात. त्यामुळे नेहमी उत्तम क्वालिटीच्या टिकली विकत घ्या. रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवा आणि चेहरा स्वच्छ करून घ्या. डाग पडले आहे ते कमी करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये काही लिंबाचे थेंब टाकून डागाच्या जागी दररोज अर्धा मिनिट मसाज करा आणि नंतर खोबरेल तेल लावून थोडा वेळ सोडून द्या. असं केल्यामुळे फरक पडण्याचे चान्सेस असतात. तुम्ही हवं असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन लेझर ट्रीटमेंट व यंग स्किन मास्क लावू शकता. यामुळे डाग खूपच कमी होतील. केमिकल पिलदेखील करू शकता. ज्यामुळे त्वचेचा एक लेयर निघून जाईल आणि डागदेखील कमी होतील.
मला आयब्रोज करतेवेळी थ्रेडिंग केल्यामुळे खूप त्रास होतो. कधी कधी हा त्रास सहन करण्यापलीकडचा असतो. अश्रूदेखील येतात. प्लीज सांगा मी काय करू?
आयब्रोज करणं खूपच गरजेचे आहे. कारण योग्य आकाराच्या आयब्रोज आपल्या चेहऱ्याला योग्य शेप देतात. वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी आयब्रोज करण्यापूर्वी आयब्रोजवर बर्फाने मसाज करा. ज्यामुळे आयब्रोज मुलायम होतील आणि वेदनादेखील कमी होतील. थ्रेडिंगच्या वेदनेपासून वाचण्यासाठी त्यावेळी चुइंगम खा. वेदना कमी होतील.
जी मुलगी तुमच्या आयेब्रोज करणार आहे तिला थ्रेडला वेट करुन घ्यायला सांगा. यामुळे तुम्हाला कमी वेदना होतील. थ्रेडिंग करतेवेळी व्यवस्थित स्ट्रेच करा यामुळेदेखील वेदना कमी होतील. थ्रेडिंगनंतर मॉइस्चरायझरने व्यवस्थित मसाज करा. आयब्रोजवर एलोवेरा जेल लावा, यामुळे वेदना व जळजळ शांत होईल आणि रेडनेसदेखील कमी होतो.