मान्सून स्पेशल : मादकता प्रदान करणाऱ्या शॉर्ट्स

* प्रतिनिधी

पावसाळा असो की उन्हाळा, शॉर्ट्स नेहमीच हॉट व मादक लुक प्रदान करतात. मात्र, परफेक्ट लुक मिळविण्यासाठी आवश्यक आहे, योग्य शॉर्ट्सची निवड. आपली शारीरिक ठेवण लक्षात घेऊन, योग्य शॉर्ट्सची निवड कशी करावी ते आपण इथे जाणून घेऊ, फॅशन डिझायनर नेहा चोप्रा यांच्याकडून :

स्ट्रेट बॉडी शेप

स्ट्रेट बॉडी शेपमध्ये कमनीयता कमी असल्याने, अशा तरुणींनी शरीराच्या खालील भागाला हेवी लुक मिळेल, अशी शॉर्ट्स परिधान केली पाहिजे. उदा. बलून शेप शॉर्ट्स यांच्यासाठी उत्तम ठरतील. त्यामुळे लोअर बॉडीला हेवी लुक मिळेल.

* फ्रंट पॉकेट, प्लीट्स, नॉट किंवा बेल्टवाल्या शॉर्ट्सही यांच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.

* वेगळी प्रिंट किंवा टेक्स्चर असलेल्या शॉर्ट्सही वापरून पाहू शकता.

* अशा प्रकारच्या शॉर्ट्ससोबत ऑफ शोल्डर, बोटनेक, व्हाइट व्ही किंवा यू नेक असलेले टॉप खुलून दिसतील.

* कमरेजवळ बेल्ट, नॉट, चेन यासारख्या एक्सेसरीजचा वापर करा, जेणेकरून शरीराच्या खालील भागाला हेवी लुक मिळेल.

पेअर बॉडी शेप

अशा महिलांच्या शरीराचा खालील भाग वरील भागापेक्षा जास्त हेवी असतो. त्यामुळे त्यांच्या मांडया आणि कटीभाग जाड दिसू लागतो. म्हणून अशा तरुणींनी :

* हाय वेस्ट किंवा स्लीम फिटेड शॉर्ट्स परिधान केल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचे पाय उंच दिसतील.

* ए लाइन शॉर्ट्सही वापरू शकता, ती हेवी मांडयांना लपवू शकते.

* जर मांडया जास्त जाड दिसत असतील, तर शक्यतो शॉर्ट्स वापरणं टाळलेलंच बरं. त्याऐवजी मिड लेंथ शॉर्ट्सचा वापर करा.

* नॉट्सवाल्या शॉर्ट्स टाळा.

* शरीराला बॅलन्स लुक देण्यासाठी शॉर्ट्ससोबत लाँग टॉप्स परिधान करा.

आर ग्लास बॉडी शेप

जर तुमचा बॉडी शेप आर ग्लास असेल, तर आपली बस्ट लाइन व हिप्सचा भाग दोन्ही हेवी असल्याने, बॉडीला बॅलन्स लुक मिळतो.

* या तरुणी हर प्रकारच्या शॉर्ट्स वापरू शकतात. मिड वेस्ट, हाय वेस्ट, लो वेस्ट इ.

* जर तुमचं पोट सडपातळ असेल, तर शॉर्ट्ससोबत क्रॉप टॉप खुलून दिसेल, तसेच त्यामुळे तुम्हाला हॉट लुक मिळेल. जर मांडया जास्त हेवी असतील तर मात्र मिड किंवा गुडघ्यापर्यंत शॉर्ट्स वापरा.

* शॉर्ट्ससोबत हेवी किंवा प्रिंटेड टॉप वापरण्याऐवजी, हलके टीशर्ट वापरा.

* जर शॉर्ट्ससोबत बेल्ट वापरण्याची इच्छा असेल, तर स्किनी बेल्टची निवड करा.

* मादक लुक मिळविण्यासाठी शॉर्ट्ससोबत स्लिव्हलेस किंवा स्पॅगेटी टॉपचा वापर करा.

ओव्हल बॉडी शेप

यामध्ये बस्ट लाइनपासून थाइजपर्यंतचा भाग हेवी असतो. म्हणून अशा तरुणींनी यांच्या हेवी शरीराला सडपातळ दर्शविणाऱ्या शॉर्ट्स खरेदी केल्या पाहिजेत.

* त्या शॉर्ट, मीडियम, लाँग कोणत्याही लेंथच्या शॉर्ट्स वापरू शकतात.

* प्रिंटेड, रंगीबेरंगी शॉर्ट्सऐवजी एकाच रंगाची प्लेन शॉर्ट्स वापरावी. त्यामुळे शरीराच्या खालील भागाला सडपातळ लुक मिळेल.

* पॉकेट, प्लीट्स, नॉट असलेली शॉर्ट्स वापरण्याची चूक कधीही करू नका. त्यामुळे लोअर बॉडी पार्ट हेवी दिसू लागेल.

* शॉर्ट्ससोबत व्ही नेक लाइन असलेला टॉप सुंदर दिसेल.

अॅप्पल बॉडी शेप

अॅप्पल बॉडी शेप असलेल्या महिलांचा शरीराचा वरील भाग, पोटाचा भाग लोअर बॉडी पार्टपेक्षा जास्त हेवी असतो. अशा वेळी शॉर्ट्स खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घ्या :

* हाय वेस्टच्या शॉर्ट (कमी लांबीच्या) शॉर्ट्स यांच्यासाठी उत्तम ठरू शकतात.

* शॉर्ट्ससोबत मफिन टॉप्स वापरा. त्यामुळे पोट सहजपणे लपविता येईल.

* बॅक पॉकेट शॉर्ट्ससुद्धा यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. मात्र, फिटेड शॉर्ट्स किंवा बेल्ट असलेल्या शॉर्ट्स वापरण्याची चूक करू नका.

* शॉर्ट्ससोबत सैल टॉप मुळीच वापरू नका.

कमी उंचीच्या तरुणींसाठी शॉर्ट्स

तसे पाहिलं तर कमी उंचीच्या म्हणजेच बुटक्या तरुणी शॉर्ट्स वापरणं टाळतात. त्यांना वाटतं की, शॉर्ट्स घातल्यास त्या आणखी बुटक्या दिसतील. मात्र लक्षात घ्या, काही गोष्टींची काळजी घेतली, तर कमी उंचीच्या तरुणीही शॉर्ट्स वापरू शकता. या तरुणींनी कमी लेंथ असलेल्या शॉर्ट्स वापरल्यास, त्यांचे पाय उंच दिसतील. अशा प्रकारे त्या आपली शॉर्ट्स वापरण्याची इच्छा पूर्ण करू शकतात.

११ आउटफिट्स प्रेगनंट वूमनसाठी

* पूनम

प्रेगनंट असण्याचा अर्थ हा नव्हे की आपण फॅशन ट्रेंड्स फॉलो करणं सोडावं. मॅटरनिटी आउटफिटबरोबरच बाजारात असे आणखी अनेक आउटफिट्स आहेत, जे आपल्याला प्रेगनन्सीच्या काळातही सुपर स्टायलिश लुक देऊ शकतात. अशा आउटफिट्सची निवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, हे सांगितले आहे फॅशन डिझायनर शिल्पी सक्सेनाने :

शिफ्ट ड्रेस

ऑफिशिअल मिटिंगमध्ये शिफ्ट ड्रेस क्लासी लुक देतो. त्यामुळे आपल्या वॉर्डरोबमध्ये शिफ्ट ड्रेसचाही जरूर समावेश करा. स्टाईलसोबत कंफर्टही हवे असेल, तर ए लाइनवाला शिफ्ट ड्रेस खरेदी करा. हॉट लुकसाठी स्पॅगेटी स्ट्रेप्स किंवा स्कूप नेकवाला शिफ्ट ड्रेस घाला.

जंपसूट

क्यूट लुकसाठी प्रेगनन्सीच्या काळात आपण जंपसूट ट्राय करू शकता. यासोबत कधी टीशर्ट तर कधी शर्ट घालून एकाच जंपसूटने आपण २ डिफरंट लुक मिळवू शकता. स्लिम लुकसाठी ब्लॅक जंपसूटची निवड करा.

मॅक्सी ड्रेस

शॉर्ट ट्रिप किंवा बीचवर जायचा प्लान असेल, तर मॅक्सी ड्रेसला आपले स्टाईल स्टेटमेंट बनवा. प्रवासासाठी यापेक्षा उत्तम आणि आरामदायक आउटफिट दुसरा कुठला नाहीए. स्टायलिश लुकसाठी मॅक्सी ड्रेसवर बेल्ट लावा.

रॅप ड्रेस

एलिगंट लुकसाठी रॅप ड्रेसही ट्राय करू शकता. अर्थात, हा अॅडजस्टेबल असतो. त्यामुळे हा संपूर्ण ९ महिनेच नव्हे, तर प्रेगनन्सीनंतरही घालू शकता. वाटल्यास आपण रॅप ड्रेसऐवजी रॅप टॉपही घालू शकता.

स्टोल

आपल्या प्लेन आउटफिटला स्मार्ट लुक देण्यासाठी वॉर्डरोबमध्ये कलरफुल स्टोलचे कलेक्शन जरूर ठेवा. स्टोल बेबी बंपला कव्हर करण्याच्याही कामी येतो. जर आपण टीशर्ट घालत असाल, तर स्टोलऐवजी स्कार्फ वापरा.

वनपीस ड्रेस

प्रेगनन्ट असण्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही पार्टी अटेंड करायचे सोडून द्याल. इव्हिनिंग पार्टी उदा. खास प्रसंगी वनपीस ड्रेस घालून आपण ग्लॅमरस दिसू शकता. पार्टीचे आकर्षण बनण्याची इच्छा असेल, तर ऑफशोल्डर फ्लोर स्विपिंग वनपीस ड्रेस घाला.

ट्युनिक

जर आपण ऑफिस गोइंग वुमन असाल, तर आपल्या वॉर्डरोबमध्ये २-४ ट्युनिक्सना जरूर जागा द्या. ऑफिसमध्ये फॉर्मल लुकसाठी ट्युनिक बेस्ट आहेत. हे आपण लेगिंग आणि जीन्स दोन्हीसोबत घालू शकता. थाइज लेंथ, ब्रेसलेट स्लीव्ज आणि व्हीनेक ट्युनिक प्युअर फॉर्मल लुकसाठी बेस्ट आहेत.

मॅटरनिटी जीन्स

प्रेगनन्सीच्या काळात आपण आपली स्किनी जीन्स घालू शकत नसलात, तरी मॅटरनिटी जीन्स जरूर घालू शकता. स्ट्रेची मटेरियलने बनलेली जीन्स खूप कंफर्टेबल असते. जीन्ससोबत फ्लेयर टॉप घालून आपण बेबी बंप कव्हर करू शकता.

स्कर्ट

कॅज्युअल लुकसाठी स्कर्टपेक्षा जास्त चांगले ऑप्शन दुसरे कोणतेही नाहीत. आपल्याला जर स्टाइलसोबत कंफर्टही हवे असेल, तर हाय वेस्ट स्कर्ट खरेदी करा, जो आपल्या वाढत्या बेबी बंपसह सहज अॅडजेस्ट होऊ शकेल. सेमी कॅज्युअल लुकसाठी स्कर्टसोबत टॉप घाला आणि वरून श्रग किंवा डेनिमचे स्लिव्हलेस जॅकेट घाला.

लेगिंग

आपल्या मॅटर्निटी वॉर्डरोबमध्ये डिफरंट शेड्सच्या ३-४ लेगिंग जरूर ठेवा. लेगिंग खूप कंफर्टेबल असतात. स्टे्रचेबल असल्यामुळे हे घालून आपण सहजपणे उठू-बसू शकता. स्मार्ट लुकसाठी लेगिंगसोबत लाँग टॉप, ट्युनिक किंवा कुर्ता घाला.

जॉगर प्रेगनन्सीच्या काळात आपल्या स्वॅटपँट्सचे कलेक्शन जॉगरसोबत रिप्लेस करा. स्वॅटपँट्सच्या तुलनेत याचा लुक अधिक आकर्षक वाटतो. हे जॉगिंग दरम्यानच नव्हे, तर ऑफिसमध्येही घालू शकता.

कार्डिगन

फॅशनेबल लुकसाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये कार्डिगन ठेवायला विसरू नका. हा कधी आउट ऑफ फॅशन होत नाही. हे आपण टीशर्ट किंवा टॉपसह घालू शकता. स्टायलिश लुकसाठी कार्डिगन ओपन ठेवा. याला बेल्ट किंवा बटनाने कव्हर करू नका.

समर-स्पेशल : जेव्हा निवडाल समर इनरविअर्स

* अनुराधा गुप्ता

उन्हाळ्याच्या दिवसात अंगातून निथळणारा घाम त्रासून सोडतो. जर स्त्रियांबद्दल म्हणाल तर त्यांना या समस्येला सर्वाधिक तोंड द्यावं लागतं. यामागचं कारण म्हणजे त्यांची अंतर्वस्त्र. शरीर व्यवस्थित व सुडौल दिसण्यासाठी अंतर्वस्त्राची गरज असते, त्याचप्रमाणे फॅशननुसार अंतर्वस्त्र असणं जरूरी असतं.

पण उष्णतेच्या दिवसात अंतर्वस्त्रांच्या घट्टपणामुळे त्वचेसंबंधी आजार जसे घामोळे, चट्टे इत्यादींचा त्रास निर्माण होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी या ऋतुमध्ये योग्य अंतर्वस्त्रांची निवड करणे गरजेचे असते. या ऋतुमध्ये कशाप्रकारची अंतर्वस्त्रे वापरावीत ते जाणून घेऊ :

योग्य कापडाची निवड : उन्हाळ्याच्या दिवसात योग्य अंतर्वस्त्रांची निवड अत्यंत गरजेची असते. अनेक महिला जी अंतर्वस्त्र थंडीच्या मोसमात वापरतात, तिच उन्हाळ्याच्या ऋतुतही वापरतात. पण दोन्ही ऋतुंमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकची अंतर्वस्त्र वापरली पाहिजेत. थंडीच्या मोसमात वापरली जाणारी नायलॉन किंवा सिंथेटिक फॅब्रिकचे इनरवेअर्स जर उन्हाळ्यात घातली तर शरीरातून खूप घाम येत असतो, ज्यामुळे घामोळे होण्याची शक्यता असते. या मोसमात कॉटन, लायक्रा किंवा नेटचे अंडरगारमेंट्स वापरल्याने त्वचेला ऑक्सीजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.

पॅडेड इनरवेअर वापरणे टाळा : अलीकडे महिलांमध्ये पॅडेड इनरवेअर वापरण्याची खूप क्रेझ आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेच्या आरोग्यासाठी हे अजिबात योग्य नाहीत आणि पॅडेड अंतर्वस्त्र वापरली तरी फक्त कॉटनचीच असतील याकडे लक्ष द्या.

एकावर एक अंतर्वस्त्र घालणे टाळा : अनेकदा गरज नसतानाही अनेक स्त्रिया एकावर एक अंतर्वस्त्र घालतात. उदाहरणार्थ अनेक महिला ब्रा घातल्यानंतर त्यावर स्पॅगेटी घालतात तर काही महिला पॅण्टीवर शेपवेअर घालतात, ज्या वास्तविक काहीच गरज नसते. यामुळे दोन समस्या उद्भवतात. एकतर उन्हाळ्याच्या दिवसात अशाने शरीर अजून गरम होते आणि दुसरे म्हणजे याच्या घट्टपणामुळे अस्वस्थ वाटू लागते.

स्टॅ्रपी किंवा सीमस लेपॅटर्न : हल्ली ब्रँड स्टॅ्रपी आणि सीमलेस अंडरगारमेंट्स बाजारात आणत आहेत. अशाप्रकारची अंतर्वस्त्र उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरतात. यांची आरामदायक फिटिंग शरीराला योग्य आकार देतात आणि स्टे्रपी डिझाइनमुळे हवा सहजतेने त्वचेपर्यंत पोहोचते.

ब्रा निवडताना या बाबींची काळजी घ्या

* उन्हाळी मोसमात अंडरवायर नसणारीच ब्रा वापरा. टीशर्ट ब्रा या सिझनसाठी योग्य ठरू शकेल. ही योग्य फिटिंगबरोबरच आरामदायकसुद्धा असते व कुठल्याही टॉपसोबत तुम्ही वापरू शकता.

* उन्हाळ्याच्या दिवसात डीप बॅक कट ड्रेससोबत बॅलकेस ब्रा वापरू शकता. महिलांमध्ये गैर समज असा आहे की बॅकलेस ब्रा फक्त एकदाच वापरू शकता, पण असं नाहीए.

* लहान ब्रेस्ट असणाऱ्या महिला पुशअप ब्रा वापरू शकतात. या ब्राची विशेषता अशी की जेव्हा गरज असेल तेव्हा पॅड्स लावले जाऊ शकतात व गरज नसताना काढताही येतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें