आरोग्य परामर्श

* डॉ. श्वेता गोस्वामी, गायनोकॉलॉजिस्ट, जे. पी. हॉस्पिटल

प्रश्न. माझं वय २६ वर्षे आहे. प्रत्येक मासिक पाळी जवळपास ४ दिवस आधीच येते आणि त्यादरम्यान संपूर्ण शरीरात खूप वेदना होतात. सांगा, काय करू?

उत्तर. अनियमित मासिक पाळीची अनेक कारणे असू शकतात. उदा. अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, अति व्यायाम करणे, नशापान करणे, कुपोषण, अति तणाव, अधिक औषधांचे सेवन किंवा मग हार्मोनल असंतुलन. तपासणी केल्यानंतरच असे का होतेय, याचे योग्य निदान करता येईल. मासिक पाळीच्या काळात ब्लडप्रेशर चेक करा.

डॉक्टरांना आपल्या प्रत्येक समस्येबाबत सांगा. संकोच करू नका. त्यांच्याकडून आहाराबाबत माहिती घ्या. तेलकट व डबाबंद पदार्थ, चिप्स, केक, बिस्किटे, गोड पेय इ.चं अधिक सेवन करू नका. योग्य मासिकपाळीसाठी आरोग्यपूर्ण आहार गरजेचा आहे. धान्ये, मोसमी फळे, भाज्या, बदाम-पिस्ते, कमी फॅट्स असलेल्या दुधाने बनलेले पदार्थही आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. दिवसाची सुरुवात १-२ ग्लास पाण्याने करा. संपूर्ण दिवसभरात ८-१० ग्लास पाणी जरूर प्या. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आपली हार्मोनल तपासणी जरूर करवून घ्या.

प्रश्न. माझं वय २७ वर्षे आहे. पाळी येण्यापूर्वी पोटाच्या डाव्या बाजूला खूप वेदना होतात. याचे काय कारण असेल?

उत्तर. बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्या-पिण्यातील बदलामुळे नेहमीच महिलांना पाळीच्या काळात खूप वेदना होण्याची समस्या खूप सामान्य गोष्ट आहे. मासिकपाळी अनियमित असण्यानेही महिन्याचे ते दिवस खूप वेदनादायी असतात.

आपल्याला पोटाच्या विशिष्ट भागात वेदना होत असतील, तर याची तपासणी करणे आवश्यक आहे. अंडाशयातील गाठही वेदनेचे कारण बनते. अल्ट्रासाउंड करणेही आवश्यक आहे. संपूर्ण तपासणी केल्यानंतरच काही सांगता येईल

प्रश्न. माझं वय २४ वर्षे आहे. माझे माझ्या प्रियकराशी शारीरिक संबंध आले आहेत. अर्थात, आम्ही संबंधाच्या काळात सुरक्षेची काळजी घेत होतो. तरीही मला भीती वाटते की कुठे समस्या निर्माण होऊ नये. सांगा काय करू?

उत्तर. आपण गायनोकोलॉजिस्टकडून आपली तपासणी करून घ्या. आपल्या गर्भावस्थेची तपासणीही केली जाऊ शकते. त्याचबरोबर, आपल्याला हा सल्लाही देतो की भविष्यात स्वत:ला कधी अशा कृत्यात सामील करू नका.

प्रश्न. माझं वय २९ वर्षे आहे. माझी मासिकपाळी अनियमित आहे. त्याचबरोबर त्या दिवसांत खूप वेदनाही होतात. मी पीसीओएसने पीडित आहे का आणि मी आई बनू शकते का?

उत्तर. जर आपली पाळी अनियमित आहे व खूप जास्त गरमी लागण्याची आणि घाम येण्याची समस्या आहे, तर लवकरात लवकर एखाद्या फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्या. रक्ततपासणीत आपला फॉल्यिक्यूल स्टिम्यूलेटिंग हार्मोन २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला पीओएफचा धोका असू शकतो.

अर्थात, ही समस्या आनुवंशिक आहे. परंतु पर्यावरण आणि जीवनशैली उदा. धूम्रपान, दारूचं सेवन, दीर्घ आजारपण उदा. थायरॉइड, रेडियो थेरपी किंवा किमोथेरपी इ.ही याची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे संपूर्ण तपासणी खूप आवश्यक आहे.

प्रश्न. माझं वय ३१ वर्षे आहे. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत, पण आम्हाला अजूनही संतानप्राप्ती झाली नाही. आम्ही तपासणी करण्याची गरज आहे का?

उत्तर. गर्भधारणा न होण्याची अनेक कारणे असू शकतात. आपण व आपल्या जोडीदाराने संपूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे. जर इन्फर्टिलिटीचे कारण पतिमध्ये आढळले, तर याचा अर्थ असा आहे की ही समस्या आवश्यकतेपेक्षा कमी शुक्राणूंच्या निर्मितीशी संबंधित आहे. दुसरं कारण हेही असू शकते की पतिमध्ये शुक्राणूंची पुरेशी निर्मिती तर होते, पण ते आपल्या अंडाणूंपर्यंत पोहोचत नाहीत. महिलांमध्ये स्त्रीबीज जनन चक्रात समस्याही इन्फर्टिलिटीचे खूप मोठे कारण असते.

या समस्येमुळे महिलेमध्ये आवश्यक असलेल्या बीजांड निर्मिती होत नाही किंवा मग बीजांड निर्मिती प्रक्रियेमध्ये गडबड होऊ शकते. ज्या महिला थायरॉइडच्या समस्येतून जात आहेत, त्यांच्यामध्ये स्त्रीबीज जनन प्रक्रिया बाधित होते आणि त्यांच्यात गर्भधारणा होणे थोडे कठीण होते. परंतु कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी संपूर्ण तपासणी खूप आवश्यक आहे.

प्रश्न. माझ्या पत्नीच्या ओव्हरीमध्ये ७ सेंटीमीटरचे सिस्ट आहे. प्रेग्नंसीला ११ आठवडे झाले आहेत. आता होमियोपॅथिक औषधे चालू आहेत. कृपया सांगा कोणते औषध घेतले पाहिजे?

उत्तर. सिस्ट या अशा गाठी असतात, ज्या महिलांच्या गर्भाशयात किंवा त्याच्या आजूबाजूला निर्माण होतात. तसेही १६ ते ५० वर्षांपर्यंतच्या महिला कधीही या आजाराच्या विळख्यात सापडू शकतात. या गाठी वेगवेगळ्या आकाराच्या असतात. यांचा आकार तेव्हाच वाढतो, जेव्हा अॅस्ट्रोजनची पातळी वाढू लागते. उदा. गर्भावस्थेच्या काळात. यांचा आकार तेव्हा घटू लागतो, जेव्हा अॅस्ट्रोजनची पातळी घटू लागते. उदा. मोनोपॉजनंतर. एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडून संपूर्ण चेकअप करून घ्या.

माझ्या ओठांवर बारीक केस आहेत. केस नाहीसे करण्याकरिता काही उपाय सांगा?

प्रश्न

मी २५ वर्षीय युवती आहे. माझ्या ओठांवर बारीक केस आहेत, ज्यामुळे ओठ खूपच खराब दिसतात. केस नाहीसे करण्याकरिता काही उपाय सांगा. एखादा घरगुती उपाय असेल तर तो ही सांगा?

उत्तर

तुम्ही गव्हाच्या पिठात निरसे दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. मग हे १० मिनिटे ओठांवर लावून ठेवा. सुकल्यावर हळूहळू  मसाज करत काढा. जर केस जास्त असतील तर ते ब्लिच करूनसुद्धा लपवले जाऊ शकतात. जर केस जास्त राठ असतील तर तुम्ही चॉकलेट वॅक्सिंग करून ते सहज काढू शकता.

जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात.

प्रश्न:  मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी       मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते,  तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?

उत्तर:आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर      त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.

म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.

अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवालाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.

काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.

शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते. सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.

जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें