उत्सवासाठी करा स्वत:ला तयार

– पारुल भटनागर

उत्सवापूर्वीच्या तयारीत काही दम असेल तेव्हाच तर उत्सवाच्या दिवसांत तुमच्या स्किनवर ग्लो दिसून येईल. उत्सवादरम्यान इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी जाणून घेऊ कॉस्मेटोलॉजिस्ट आणि आल्प्स कॉस्मेटिक क्लिनिकच्या फाउंडर डायरेक्टर भारती तनेजा यांच्याकडून काही खास मेकअप टीप्स. या टीप्स आजमावल्यास सणासुदीत जेव्हा तुम्ही शृंगार करून घराबाहेर पडाल लोक तुम्हाला पाहतच राहतील.

फेशिअल चार्म

आपल्या त्वचेची चमक उत्सवाच्या झगमगटीसह मॅच व्हावी यासाठी वेळोवेळी स्किननुसार फेशिअल करून घ्या. या दिवसांत गोल्ड फेशिअल छान दिसते.

या टेक्निकमध्ये एका विशेष स्क्रबर मशीनच्या सहाय्याने डेड सेल्स रिमूव्ह केले जातात आणि मग मशीनद्वारे फळांचा रस आणि गोल्ड सोल्युशन त्वचेत खोलवर पोहोचवले जाते. असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि रक्तातील बॅक्टेरिया नष्ट होतात. हे फेशिअल फेस्टिव्हल सुरू होण्याआधी काही दिवस करून घ्या म्हणजे संपूर्ण फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमचा चेहरा चमकत राहील.

घरगुती उपाय : १ चमचा रवा घेऊन तो गरम दुधात मिसळा व चांगले फेटून घ्या. दाट झाल्यावर या मिश्रणात २ थेंब लिंबाचा रस आणि २ थेंब मध मिसळून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर पाण्याने धुवून टाका. थोडयाच वेळात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला जाणवेल.

बॉडी ग्लो

एकीकडे जिथे उत्सवाच्या खरेदीसाठी मन उत्साहित झालेले असते तिथे दुसरीकडे या उत्सवाच्या तयारीत शरीर पूर्णपणे थकून गेलेले असते. दिवसभर प्रखर उन्हात राहून त्वचा टॅन होते म्हणूनच टॅन फ्री आणि रिलॅक्स होण्यासाठी बॉडी स्क्रबिंग करून घेणे उत्तम असते. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्याचबरोबर टॅनिंगही निघून जाते. यामुळे त्वचा सॉफ्ट तर होतेच पण खुलूनही येते.

घरगुती उपाय : १ चमचा बेसन आणि २ चमचे व्हीट ब्रान घेऊन त्यात चिमूटभर हळद, लिंबाचे काही थेंब आणि साय मिसळा. दररोज अंघोळ करण्याआधी ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावा. सुकल्यावर हलक्या हातांनी ती काढा. हळूहळू बॉडीवर ग्लो आलेला दिसून येईल.

शायनिंग केस

रुक्षपणामुळे केस निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे त्यांना सॉफ्ट आणि सिल्की लुक देण्यासाठी हेअर स्पा करणे जरुरी आहे. हेअर स्पा केल्याने स्कॅल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढते. डिटॉक्सिफिकेशन होते, हेअर फॉल थांबतो आणि त्याचबरोबर केसांना भरपूर पोषणही मिळते, जे केसांसाठी खूप आवश्यक असते.

घरगुती उपाय : घरगुती कंडिशनर म्हणून अंडयात लिंबाचा रस मिसळून त्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळावे. हे मिश्रण केसांना अर्धा तास लावून ठेवावे. मग शॅम्पू करावे, मग पाहा तुमचे शायनी केस कसा तुमचा कॉन्फिडन्स वाढवतात.

सॉफ्ट हॅन्ड आणि फूट

सणासुदीच्या काळात फक्त आपला चेहराच महत्वाचा नसतो तर आपले हात आणि पायही तितकेच आकर्षणाचे केंद्र असतात. म्हणूनच त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मॅनिक्युअर आणि पॅडीक्युअर करत रहा. यामुळे तुमच्या हात आणि पायांचे सौंदर्य तर वाढेलच आणि त्याच बरोबर ते सॉफ्टसुद्धा होतील.

घरगुती उपाय : सर्वप्रथम नेलपॉलिश काढून टाका. त्यानंतर अर्धा टब कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा शँम्पू, १ चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड आणि थोडेसे अँटिसेप्टिक लोशन टाकून त्यात आपले हात ५ मिनिटे डिप करून ठेवा. स्क्रबरच्या मदतीने डेड स्किन काढून टाका. शेवटी मॉईश्चरायजिंग क्रीमने हातांना मसाज करा.

घरीच पेडिक्युअर करण्यासाठी अर्धा टब कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा शॅम्पू, १ चमचा मीठ आणि थोडेसे अँटिसेप्टिक लोशन टाकून त्यात आपले पाय १० मिनिटे डिप करून ठेवा. असे केल्याने नखे मऊ होतील. आता स्क्रबर घेऊन डेड स्किन रिमूव्ह करा आणि नखांना कापून फाइल करा. यानंतर क्युटिकल पुशरने क्युटिकल्सना पुश करून क्युटिकल कटरने काढून टाका. शेवटी मॉईश्चरायजिंग क्रीमने पायांना मसाज करा.

मेकअपच्या आधी क्लिनिंग

चांगल्या मेकअपसाठी स्वच्छ आणि चमकदार त्वचा ही पहिली आवश्यकता आहे. यासाठी सर्वप्रथम त्वचा क्लीन करा. त्वचा क्लीन करायला तुम्ही क्लिंझिंग मिल्कचा वापर करू शकता. कापसावर क्लिंझिंग मिल्क घेऊन चेहरा, मान आणि जवळचा एरिया क्लीन करा. क्लिनिंग नंतर टोनिंग करणे अतिशय आवश्यक आहे. टोनिंगसाठी चांगल्या क्वालिटीचा टोनर वापरा.

टोनिंगसाठी बर्फाचा वापरही करू शकता. मग चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून मेकअप करायला सुरुवात करू शकता. फेस्टिव्ह मूड एक्साइटमेंटने भरलेला असतो, ज्यामुळे घामही पुष्कळ येतो. त्यामुळे मेकअप हा वॉटरप्रुफ असणे आवश्यक असते. यासाठी आपल्या चेहऱ्यावर फाउंडेशन लावा आणि ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्टचा वापर जरूर करा.

ओठांना द्या सुंदर टच

जर ओठ गुलाबांच्या पाकळयांप्रमाणे असतील तर चेहरा अतिशय मोहक दिसतो. जर तुम्हालाही आपले ओठ सुंदर दिसावेत असे वाटत असेल तर ओठांना लिप लायनरने शेप द्या. जर ओठ जाड असतील तर लायनर नॅचरल लायनिंगपासून थोडे आत लावा आणि जर ओठ पातळ असतील तर नॅचरल लाइनच्या थोडे बाहेर लावा.

आय मेकअप

आय मेकअपसाठी फक्त वॉटरप्रुफ प्रॉडक्टचाच वापर करा. चांगल्या मेकअपसाठी बेस सर्वप्रथम आवश्यक असतो. जर तुमच्या त्वचेवर एखादा डाग असेल तर त्यावर कंसीलर लावून तो कंसील करा. जर डोळयांखालील काळी वर्तुळे लपवायची असतील तर एक शेड डार्क कंसीलर लावा.

उत्सवाच्या वेळेस डोळे आकर्षक वाटण्यासाठी रेड किंवा मरून आयशॅडो डोळयांच्या जवळ थोडा लाइट आणि बाहेरच्या बाजूस थोडा डार्क लावा. तुम्हाला हवे असल्यास रात्रीच्या वेळेस तुम्ही गोल्डन कलरची स्पार्कल डस्टही वापरू शकता. आयब्रोजच्या खाली हायलाइटर लावा. शेड्सनुसार हायलाइटर गोल्डन किंवा सिल्व्हर निवडू शकता. आता आयलाइनर लावा. मग पापण्यांना कर्ल करा.

जर तुम्ही रात्री मेकअप करत असाल तर मस्कारा डबल कोटमध्ये लावणे उत्तम. मग आयब्रोजना आयब्रो पेन्सिलने शेप द्या. जर तुम्हाला आयशॅडो लावायचा नसेल तर डोळयांना कलरफुल लायनरने सजवा. शेवटी काजळ लावून डोळयांना द्या एक आकर्षक लुक.

हायफूने मिळवा तेजस्वी रूप

– प्रतिनिधी

आम्ही ३५ व्या वर्षी ४५ वर्षांच्या दिसत आहात का? सुरकुत्यांमुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य हरवलं आहे का? उत्तर ‘हो’ असेल तर तुम्ही वाढत्या वयाच्या या खुणा हायफू अॅन्टीएजिंग स्कीन ट्रीटमेंटच्या सहाय्याने कमी करू शकता. या तंत्रामुळे सैल पडलेल्या त्वचेला तजेला प्राप्त होतोच, शिवाय यामुळे त्वचा तरूण आणि तेजस्वी दिसते.

डर्मेटोलॉजिस्ट डॉ. डिंपल भंखारिया यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘प्रखर ऊन, प्रदूषण, वातावरणातील बदल, तणाव, धूम्रपान, अल्कोहोलसारख्या वाईट सवयींचा परिणाम सर्वात आधी त्वचेवर दिसू लागतो. त्वचा कोरडी, सैल आणि फिकी वाटू लागते.

दिवसेंदिवस त्वचेतील फॅट कमी होऊ लागते. परिणामी त्वचा पातळ आणि कमकुवत होऊ लागते. यामुळे सुरकुत्या, डाग यांसारख्या त्वचेसंबंधी समस्या निर्माण होतात. हे सर्व कमी करण्यासाठी सनस्क्रीन, अॅन्टीएजिंग क्रिम आणि जेंटल मॉइश्चरायजरचा वापर आणि व्यायामासोबतच हायफू अॅन्टीएजिंग स्कीन ट्रीटमेंटची मदत घेऊ शकता.’’

हायफू म्हणजे काय?
‘हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड’ हे ‘हायफू स्किन टाइयनिंग ट्रीटमेंट’ या नावाने ओळखलं जातं. हा एक प्रकारचा अॅन्टीएजिंग उपचार आहे. हे एक नॉनसर्जिकल तंत्र आहे. याच्या सहाय्याने चेहरा व गळ्यासह शरीराच्या अन्य भागांतील त्वचा घट्ट केली जाते. यामुळे त्वचा कायम तरूण राहते.

हायफू कशावर उपयोगी आहे?
हायफूच्या मदतीने भुवया, कपाळ, गाल, हनुवटी, गला, पोट इत्यादींची सैल त्वचा घट्ट केली जाते. याच्या सहाय्याने डोळे, ओठ, डोकं, नाक इत्यादींच्या भोवती पडणाऱ्या सुरकुत्याही नष्ट केल्या जाऊ शकतात. यामुळे त्वचेवरील उघडी छिद्रं बंद होतात. या तंत्राच्या सहाय्याने स्कीन टाइटनिंगसह स्कीन लिफ्टिंगही केलं जाऊ शकतं. जॉ लाइन आणि भुवया मूळ जागेवरून सरकल्या असतील तर जॉ लिफ्टिंग आणि आयब्रोज लिफ्टिंगच्या सहाय्याने आपल्या जागेवर आणता येते.

हायफू कसं काम करतं?

ट्रीटमेंटच्या सुरूवातीला चेहऱ्यावर लोकल अॅनेस्थेशिया क्रिम लावली जाते, यामुळे त्वचा ओलसर होते. त्यानंतर मशिनच्या हंड पीसद्वारे प्रभावित जागेवर शॉट (लेजरच्या किरणांप्रमाणे) दिले जातात. यामुळे हलकासा चटका जाणवतो. यामुळे त्वचेमधील उती आकुंचन पावतात. यामुळे त्वचेला तजेला येतो.

या तंत्रामुळे नव्या कोलोडनचीही निर्मिती होते, कोलोजन एक प्रकारचं स्क्रिन फाइबर असतं, जे वयानुसार कमी होत जातं. यामुळेच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि ओरखडे दिसू लागतात. या ट्रिटमेंटमुळे निर्माण झालेलं कोलोजन सुरकुत्या येऊ देत नाही. संपूर्ण चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि ओरखडे कमी करण्यासाठी ४५ मिनिटं ते १ तास एवढा अवधी लागतो. शिवाय यामध्ये वेदनाही होत नाहीत.

ही ट्रिटमेंट कधी घ्यावी?

३०-३५ वर्षांपासून ६०-६५ वर्षांपर्यंतचे महिला आणि पुरुष ही ट्रिटमेंट घेऊ शकतात. ही ट्रिटमेंट कोणत्याही स्कीन टाइप आणि स्कीन टोनच्या व्यक्ती घेऊ शकतात.

ट्रीटमेंट घेतल्यानंतर ३-४ महिन्यांनी याचा परिणाम दिसू लागतो, जो वर्षभर राहतो. मग हळूहळू ओरखडे आणि सुरकुत्या पुन्हा दिसू लागतात. तेव्हा पुन्हा त्या या ट्रीटमेंटच्या सहाय्याने कमी केल्या जाऊ शकतात. तुमच्या चेहऱ्यावर कमी सुरकुत्या असतील तर वर्षातून एकदा आणि खूप जास्त असतील तर २-३ वेळा ट्रीटमेंट घेतली जाऊ शकते.

जेव्हा हवा असेल नॅचरल लुक

– प्राची भारद्वाज

मेकअप परफेक्ट करणे ही एक कला आहे. अशी कोणती स्त्री असेल जिला मेकअपमध्ये पारंगत व्हायचे नसेल? जसा योग्य मेकअपमुळे चेहरा आकर्षक करता येतो तसेच चुकीच्या मेकअपमुळे चांगला चेहराही खराब दिसू शकतो.

मेकअपच्या कलेत नैपुण्य मिळवणे सोपे नाही. कालानुरूप मेकअप करण्याच्या पद्धतींमध्ये खूपच बदल झालेत आणि लेटेस्ट मेकअपच्या ट्रेंडमध्ये नाव येते ते एअरब्रश मेकअपचे. आजकाल एअरब्रश मेकअप खूपच हिट आहे. चला, माहिती करून घेऊया एअरब्रश मेकअपची.

काय आहे एअरब्रश मेकअप

आतापर्यंत सौंदर्य विशेषज्ञांच्या बोटांद्वारेच मेकअपची जादू पाहायला मिळायची. त्यांची साथ द्यायचे स्पंज आणि विविध प्रकारचे ब्रश. मात्र आता एअरब्रश मेकअप एक युनिक पद्धत आहे, ज्याद्वारे मेकअप चेहऱ्याच्या त्वचेवर स्प्रे केला जातो. याचा प्रयोग जास्त करून नववधू, मॉडेल्स किंवा अभिनेत्रींवर केला जातो. पारंपरिक मेकअपच्या विरुद्ध असलेल्या एअरब्रश मेकअपद्वारे नॅचरल लुक कायम ठेवणे सोपे असते. हे त्वचेशी एकरूप होऊन एकसारख्या त्वचेची अनुभूती देते.

कसा करतात

एअरब्रश मेकअपसाठी तुम्हाला योग्य प्रकारचे टूल्स आणि सोबतच खूप प्रॅक्टिसही गरजेची असते.

एअरब्रश मेकअपचे टूल्स किंवा किट ऑनलाइनही मिळते तेही वॉरंटीसह. टूल्समध्ये एक छोटा कंप्रेसर, एक एअरब्रश गन, स्वच्छ करण्यासाठी ब्रश, हौज पाइप आणि फाउंडेशन कलर व हायलायटरच्या बॉटल्सही येतात.

तुम्हाला एअरब्रश करायला येत नसले तरी मेकअपची बेसिक समज गरजेची आहे. त्यानंतर किटसोबतची माहिती पुस्तिका वाचून किंवा ऑनलाइन व्हिडिओ पाहून शिकता येते.

मेकअपची पद्धत

एअरब्रश मेकअपसाठी हात सरावाचे लागतात. एअरब्रश गन चेहऱ्यापासून किती दूर ठेवायची, किती प्रेशर गरजेचा आहे, हे सर्व सराव आणि मेकअप कसा हवा यावर अवलंबून असते. मेकअपचा कोणता इफेक्ट द्यायचा आहे, संपूर्ण चेहऱ्यावर द्यायचा आहे की काही भागच हायलाइट करायचा आहे, न्यूड लुक हवा की कंटूरिंग, हेवी मेकअप हवाय की लाइट, या सर्व गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. मेकअप करताना लुकनुसार एअर प्रेशर संतुलित ठेवणे आवश्यक आहे.

एअरब्रश मेकअप तुम्ही स्वत:हून शिकू शकता. गरज आहे ती फक्त सराव करत राहण्याची. एअरब्रश मेकअपद्वारे चेहऱ्याला चमकदार लुक मिळतो. पण सोबतच हेदेखील लक्षात ठेवा की ज्यांच्या चेहऱ्यावर लव आहे त्यांनी ती आधी साफ करून घ्यावी जेणेकरून एअरब्रश मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावरील केस फोटोत चमकणार नाहीत.

नववधूच्या मेकअपमध्ये याचे तोटे

नववधूच्या मेकअपसाठी आजकाल एअरब्रश मेकअपची बरीच चलती आहे. चला, जाणून घेऊया याचे तोटे काय आहेत :

* वॉटरप्रुफ असल्यामुळे हा त्या नववधूंसाठी सूट होत नाही, ज्यांची त्वचा गरजेपेक्षा जास्त ड्राय असते.

* शेड्स आणि ब्रँड्सचे यात खूपच कमी पर्याय असतात.

* बजेटमध्येच मेकअप करू इच्छिणाऱ्या नववधूंसाठी हा महाग ठरू शकतो.

एअरब्रश मेकअपचे फायदे

* एअरब्रश मेकअपमुळे फाईन लुक मिळवणे शक्य आहे. हात, स्पंज आणि ब्रशने केलेल्या मेकअपमध्ये त्वचेवरील छिद्रे आणि सुरकुत्या दिसण्याची शक्यता अधिक असतात. एअरब्रश मेकअप एकसारख्या स्किन टोनची अनुभूती देतो.

* एअरब्रश मेकअपमुळे डोळे, ओठ आणि चीक बोन्सना उभारी देणे सोपे होते. सोबतच ट्रेडिशनल मेकअपप्रमाणेच यात कंटूरिंग करणेही शक्य आहे.

* एअरब्रश मेकअपमुळे त्वचा एकसारखी, मुलायम आणि नॅचरल दिसते.

* एअरब्रश मेकअप बराच वेळ टिकून राहतो. भारतीय हवामान आणि तासनतास चालणाऱ्या आपल्या सणसमारंभांमध्ये दीर्घकाळ टिकणारा मेकअपच आपल्या आवडीचा ठरतो. खासकरून नववधूसाठी, जिला लग्नाच्या प्रदीर्घ विधि मेकअपमध्ये राहूनच करायच्या असतात.

* वॉटरप्रूफ मेकअपमध्येही एअरब्रश मेकअप उत्तम असल्याचे सिद्ध होते.

* हायजीन आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही एअरब्रश मेकअप उत्तम आहे, कारण यात हातांऐवजी टूल्सचा वापर केला जातो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें