Diwali Special: दिवाळी स्पेशल मेकअप लुक्स

* इशिका तनेजा

झगमगत्या दिवाळी संध्येत जर आपले रूपही सामील झाले, तर त्याची मजाच काही और… इथे सादर आहेत, मेकअपच्या काही अशा टीप्स ज्या आपला दिवाळी लुक अधिक उजळवतील :

ट्रेडिशनल लुक

पारंपरिक शृंगार प्रत्येकालाच आवडतो. तुम्हालाही जर ट्रेडिशनल लुक धारण करू इच्छित असाल, तर पेहरावामध्ये घागरा-चोळी, साडी किंवा सलवार-सूटची निवड करा.

* अशा प्रकारच्या मेकअपसाठी सर्वप्रथम चेहऱ्यावर बेस म्हणून सुफल्याचा वापर करा. हा लावताच पावडर फॉर्ममध्ये बदलतो आणि चेहऱ्याला मॅट लुक देतो. परंतु जर आपली स्किन ड्राय असेल, तर आपण फाउंडेशन म्हणून टिंटिड मॉइश्चरायजरचा वापर करू शकता. त्यामुळे आपली स्किन सॉफ्ट होईल आणि त्वचाही ग्लो करू लागेल. त्यानंतर गालांना पिंक किंवा पीच कलरचे ब्लशऑन लावा.

* डोळयांच्या मेकअपसाठी ड्रेसला मॅचिंग आयशॅडो लावा. आयशॅडो आयलीडवर खालून वर लाइट टोन देत लावा. मात्र, साइड कॉर्नर्सला हलकेच डार्क आयशॅडो लावा. जर तुम्ही मल्टिशेड लेहंगा, साडी किंवा सूट घालणार असाल, तर एकाच रंगाचा आयशॅडो लावा आणि दुसऱ्या कलरचा लायनर लावा.

* पापण्यांना दाट लुक देण्यासाठी आर्टिफिशियल लॅशेजचा वापर करू शकता. यासाठी आधी पापण्यांना कर्लरने कर्ल करा. मग लाँग लॅश मस्काऱ्याचा कोट लावा. फिनिश करण्यासाठी वॉटर लाइनवर काजळ जरूर लावा.

* एथनिक पेहरावाला कंप्लीट लुक देण्यासाठी कपाळावर स्टड किंवा स्वरोस्कीजडीत बिंदी लावू शकता. आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच लोक आपल्या हातांच्या सौंदर्यावरही मोहीत होण्यासाठी आपण नखांवर ३डी नेलआर्ट करू शकता.

* लिपस्टिक आपल्या ड्रेसला मॅचिंग, परंतु थोडी डार्क लावा. उदा. प्लम, चेरी, हॉट पिंक, फ्युशिया इ. तुम्हाला ओठांना परफेक्ट शेप द्यायचा असेल तर लिपस्टिकला मॅच करणाऱ्या लिपलाइनरने ओठांच्या कमी-जास्त शेपची निवड करू शकता.

हेअरस्टाईल

फटाक्यांचा आनंद घेताना आपण केसांना मोकळे सोडण्याऐवजी त्यांना स्टायलिश पद्धतीने बांधणे उत्तम. सध्याच्या काळात ब्रेड्स फॅशनमध्ये आहेत. अशा वेळी समोरून स्टायलिंग करण्यासाठी आपण केसांचे ब्रेड्स बनवून त्यांना मागे मागे आणत बन बनवू शकता किंवा मग मागील केसांची साइड वेणी घालू शकता. स्वरोस्कीजडीत हेअर एक्सेसरीज आपले रूप अजून खुलवेल. अशा वेळी वेणी किंवा बनला सजविण्यासाठी आपण याचा उत्तमप्रकारे वापर करू शकता.

इंडोवेस्टर्न फ्यूजन लुक

जर आपल्याला दिवाळीच्या दिवसांत इंडोवेस्टर्न फ्यूजनच्या रूपात सजायचे असेल तर मेकअपही मिक्स स्वरूपात करा. मेकअपपूर्वी फेस क्लीन जरूर करा. त्यानंतर एखाद्या चांगल्या मॉइश्चरायजरने चेहऱ्याचा मसाज करा. सावळया रंगाच्या महिलांनी बेस बनविण्यासाठी आपल्या रंगाहून एक शेड हलकेच फाउंडेशन लावा आणि गोऱ्या त्वचेसाठी फाउंडेशन किंवा बेसची निवड आपल्या त्वचेच्या रंगानुसार करा. डार्क कॉम्प्लेक्शनवर पीच आणि पिची ब्राउन रंगाचे ब्लशऑन करू शकता. गोऱ्या रंगावर रेडीश ब्राउन आणि पिंक कलरचा हलका डार्क ब्लशर लावू शकता.

* मिक्स फ्यूजनमध्ये आपल्या डोळयांना स्मोकी लुक देऊन आकर्षक करू शकता. अशा लुकसाठी आयलीडवर ग्रेइश ब्लॅक किंवा ब्लू कलरचा आयशॅडो लावा. डोळयांना हायलाइट करण्यासाठी सिल्व्हर कलरचा हायलाइटर लावू शकता. डोळयांच्या वरील व खालील भागावर बोल्ड लायनर लावा. स्मोकी लुक अजून आकर्षक करण्यासाठी आर्टिफिशिअल आयलॅशेजचा वापर करू शकता.

* इंडोवेस्टर्न लुकबरोबर पारंपरिक ज्वेलरी वापरण्याऐवजी मनगट, दंड, नाभी, मान व शरीराच्या अन्य मोकळया भागांवर फँटसी मेकअप करू शकता. नखांवर आपल्या ड्रेसला मॅच होणारी डिझाइन बनवा किंवा मग पाना-फुलांच्या डिझाइनही बनवू शकता.

* जर आपल्याला बिंदी लावायची इच्छा असेल तर स्वरोस्कीची एक लांबट लाइन आपल्या कपाळावर लावू शकता. अर्थात, डोळयांना व्हायब्रेंट स्मोकी लुक दिला असेल तर लिप्सवर लाइट शेडची लिपस्टिक किंवा लिपग्लॉस लावू शकता.

जर केस मोकळे सोडायचे असतील तर फ्रंटला कर्ल करून ते मोकळे ठेवू शकता किंवा मग हायबन बनवून स्टायलिश हेअर एक्सेसरीजने सजवू शकता. सर्वप्रथम क्राउन एरियातून मागच्या बाजूला जात केसांना तीन भागांत विभागा आणि मग तीन फ्रेंच वेण्या बनवा. या तिन्ही वेण्या मानेपर्यंत घातल्यानंतर सर्व वेण्यांचे केस एकत्र करून खजुरी वेणी घाला.

त्यानंतर लेफ्ट साइडच्या केसांमधून पातळशी लेअर घ्या आणि राइटच्या केसांत मिसळा. अशाच प्रकारे राइट साइडच्या केसांमधून पातळशी लेअर घ्या आणि लेफ्टच्या केसांत मिसळा. या दोन्ही स्टेप्स आलटून-पालटून करत राहा. आपली खजुरी वेणी तयार होईल. अशा प्रकारच्या वेणीमुळे आपला इंडोवेस्टर्न पेहराव आणखी खुलून दिसेल.

चॉकलेट फेशिअल वाढत्या वयातील सौंदर्य…

* अनुराधा गुप्ता

वाढत्या वयात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवणं महिलांसाठी एक मोठं आव्हान असतं. खासकरून तिशीला पोहोचलेल्या महिलांना त्वचेतील सैलपणा आणि सुरकुत्यांच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. खरंतर तिसाव्या वर्षानंतर त्वचेमधील नैसर्गिक माइश्चरायझर बनवण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे त्वचेमध्ये पूर्वीसारखं तेज राहात नाही. चॉकेलेट फेशिअलचा तिशीतील महिलांना नक्कीच फायदा होतो.

ब्यूटी एक्सपर्ट मीनू अरोरा यांनीही या गोष्टीला दुजोरा देत म्हटलं, ‘‘चॉकलेटमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग प्रॉपर्टीज असतात, जे लिंफेटीक डे्रनेजसह त्वचेवर चढलेल्या डेड सेल्स काढून टाकतात आणि त्वचेला तजेला आणि चमक प्राप्त होते.’’

चॉकलेट फेशिअलमुळे आराम मिळतो

शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे की चॉकलेटचा स्वाद आणि सुगंध दोन्हीमुळे मानवी शरीरात हॅप्पी हार्मोन्स स्त्रवतात. यामुळे मानसिक तणाव दूर होऊन व्यक्ती आनंदी राहते. चॉकलेट फेशिअलचे काम काहीसं असंच असतं. कारण या फेशिअलमुळे रक्तातील सॅरोटेनिन यौगिक वाढवतं. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

योग्य स्क्रबिंगमुळे होतो योग्य परिणाम

चॉकलेट फेशिअल करताना सुरूवातीला चेहऱ्याला दुधाने क्लिजिंग केलं जातं. यानंतर ओटमील, डिस्प्रीन टॅबलेट, शुगर फ्री चॉकलेटचे विरघळलेले तुकडे, एक चमचा कॉफी पावडर आणि मधाने चेहऱ्याला स्क्रब केलं जातं.

स्क्रबिंगची योग्य पद्धत सांगताना मीनू म्हणतात, ‘‘कधी स्क्रब करताना चेहरा रगडू नये. काहीवेळ स्क्रबर चेहऱ्यावर लावून ठेवावा आणि मग हळुहळु बोटांनी गोलाकार फिरवून स्क्रबिंग केलं पाहिजे. यामुळे रक्तपुरवठा सुरू होतो आणि त्वचेचे डेड सेल्स निघून जातात.’’

कोल्ड कंप्रेशर आवश्यक

स्क्रबिंगनंतर त्वचेला हॉट कंप्रेशर देण्यासाठी स्टीमऐवजी पाण्यामध्ये बोरिक अॅसिड मिसळून त्यात भिजवलेला रूमाल चेहऱ्यावर काहीवेळ ठेवला जातो. हॉट कंप्रेशरमुळे त्वचेवरचे पोर्स उघडून त्यांचा आकार मोठा होतो. मोठे पोर्स कुरूप दिसतात. त्यामुळे हॉट कंप्रेशरनंतर लगेच कोल्ड कंप्रेशर देणं आवश्यक असतं. यासाठी थंड पाण्याची किंवा बर्फाचा वापर केला जातो.

मसाजचं महत्व

त्वचेला पेनिटे्रट करण्यासाठी चॉकलेटचे विरघळलेले तुकडे एलोवेरा जेलमध्ये मिसळून त्वचेवर लावले जातात आणि नारळाच्या पाण्यासह अल्ट्रासोनिक मसाज दिला जातो. सीसॉल्ट घालून त्वचेला मसाज दिला जातो. वास्तविक सीसॉल्ट त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतं.

स्कीन टाइटनींग क्रिमने चेहऱ्यावर करण्यात येणारा मसाज अॅन्टीएजिंग फेशिअलमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामुळे त्वचेला तजेला आणि चमक दोन्ही येते. मीनू सांगतात की या मसाजमध्ये चेहऱ्याचे काही खास प्रेशर पॉइंट्स दाबले जातात यामुळे रक्तभिसरण वाढते आणि आराम मिळतो.

फेशिअलचा शेवटचा टप्पा

सर्वात शेवटी ग्लो पॅकमध्ये विरघळलेलं चॉकलेट घालून ५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावलं जातं. यानंतर पुन्हा चेहऱ्याला हॉट कंप्रेशर आणि कोल्ड कंप्रेशर दिलं जातं.

चॉकलेट फेशिअलनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने जरूर धुवा, कारण चेहऱ्यावर चॉकलेटचा चिकटपणा तसाच राहातो. एसपीएफ क्रिम न लावता उन्हात जाऊ नका, त्वचा पातळ होते आणि पातळ त्वचा होरपळू शकते.

फेशिअल करण्याआधी हे लक्षात ठेवा

* फेशिअलच्या आधी ब्लीच करू नका. ब्लीचमुळे त्वचेवर केमिकलचा थर जमतो. त्यामुळे फेशिअलचा परिणाम चेहऱ्यावर कमी दिसतो.

* फेशिअलच्या दोन तास आधी काहीही खाऊ नका. कारण शरीर एकावेळी एकच कार्य करू शकते. एकतर अन्नपचन करू शकते किंवा मानसिक तणाव कमी करून रक्ताभिसरण करू शकते.

* चेहऱ्यावर पिंपल्स असतील किंवा पुरळ असेल तर आधी त्यावर उपचार करून घ्या. फेशिअल करण्याच्या आठवडाभर आधी कच्च्या दुधात लवंग भिजवून पुरळांवर लावा. ३ दिवसांत पुरळ सुकेल.

* दर २५ दिवसांनी फेशिअल करा. त्याआधी केलं तर त्वचेतील मृतपेशींसह कार्यरत पेशीही निघून जातील, जे त्वचेसाठी हानिकारक ठरते.

चॉकलेट फेशिअलचे फायदे

* चॉकलेट फेशिअल कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर केले जाऊ शकते.

* चॉकलेटमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल डॅमेजपासून वाचवतात.

* चॉकलेटमध्ये त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्याची क्षमता असते.

* यामुळे त्वचा हायडे्रट होते आणि त्वचेची कोमलता टिकून राहाते.

* चॉकलेट फेशिअल त्वचेमध्ये वेगाने कोलोजन बनवते. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहाते.

उत्सवासाठी करा स्वत:ला तयार

– पारुल भटनागर

उत्सवापूर्वीच्या तयारीत काही दम असेल तेव्हाच तर उत्सवाच्या दिवसांत तुमच्या स्किनवर ग्लो दिसून येईल. उत्सवादरम्यान इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी जाणून घेऊ कॉस्मेटोलॉजिस्ट आणि आल्प्स कॉस्मेटिक क्लिनिकच्या फाउंडर डायरेक्टर भारती तनेजा यांच्याकडून काही खास मेकअप टीप्स. या टीप्स आजमावल्यास सणासुदीत जेव्हा तुम्ही शृंगार करून घराबाहेर पडाल लोक तुम्हाला पाहतच राहतील.

फेशिअल चार्म

आपल्या त्वचेची चमक उत्सवाच्या झगमगटीसह मॅच व्हावी यासाठी वेळोवेळी स्किननुसार फेशिअल करून घ्या. या दिवसांत गोल्ड फेशिअल छान दिसते.

या टेक्निकमध्ये एका विशेष स्क्रबर मशीनच्या सहाय्याने डेड सेल्स रिमूव्ह केले जातात आणि मग मशीनद्वारे फळांचा रस आणि गोल्ड सोल्युशन त्वचेत खोलवर पोहोचवले जाते. असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि रक्तातील बॅक्टेरिया नष्ट होतात. हे फेशिअल फेस्टिव्हल सुरू होण्याआधी काही दिवस करून घ्या म्हणजे संपूर्ण फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमचा चेहरा चमकत राहील.

घरगुती उपाय : १ चमचा रवा घेऊन तो गरम दुधात मिसळा व चांगले फेटून घ्या. दाट झाल्यावर या मिश्रणात २ थेंब लिंबाचा रस आणि २ थेंब मध मिसळून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर पाण्याने धुवून टाका. थोडयाच वेळात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला जाणवेल.

बॉडी ग्लो

एकीकडे जिथे उत्सवाच्या खरेदीसाठी मन उत्साहित झालेले असते तिथे दुसरीकडे या उत्सवाच्या तयारीत शरीर पूर्णपणे थकून गेलेले असते. दिवसभर प्रखर उन्हात राहून त्वचा टॅन होते म्हणूनच टॅन फ्री आणि रिलॅक्स होण्यासाठी बॉडी स्क्रबिंग करून घेणे उत्तम असते. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्याचबरोबर टॅनिंगही निघून जाते. यामुळे त्वचा सॉफ्ट तर होतेच पण खुलूनही येते.

घरगुती उपाय : १ चमचा बेसन आणि २ चमचे व्हीट ब्रान घेऊन त्यात चिमूटभर हळद, लिंबाचे काही थेंब आणि साय मिसळा. दररोज अंघोळ करण्याआधी ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावा. सुकल्यावर हलक्या हातांनी ती काढा. हळूहळू बॉडीवर ग्लो आलेला दिसून येईल.

शायनिंग केस

रुक्षपणामुळे केस निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे त्यांना सॉफ्ट आणि सिल्की लुक देण्यासाठी हेअर स्पा करणे जरुरी आहे. हेअर स्पा केल्याने स्कॅल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढते. डिटॉक्सिफिकेशन होते, हेअर फॉल थांबतो आणि त्याचबरोबर केसांना भरपूर पोषणही मिळते, जे केसांसाठी खूप आवश्यक असते.

घरगुती उपाय : घरगुती कंडिशनर म्हणून अंडयात लिंबाचा रस मिसळून त्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळावे. हे मिश्रण केसांना अर्धा तास लावून ठेवावे. मग शॅम्पू करावे, मग पाहा तुमचे शायनी केस कसा तुमचा कॉन्फिडन्स वाढवतात.

सॉफ्ट हॅन्ड आणि फूट

सणासुदीच्या काळात फक्त आपला चेहराच महत्वाचा नसतो तर आपले हात आणि पायही तितकेच आकर्षणाचे केंद्र असतात. म्हणूनच त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मॅनिक्युअर आणि पॅडीक्युअर करत रहा. यामुळे तुमच्या हात आणि पायांचे सौंदर्य तर वाढेलच आणि त्याच बरोबर ते सॉफ्टसुद्धा होतील.

घरगुती उपाय : सर्वप्रथम नेलपॉलिश काढून टाका. त्यानंतर अर्धा टब कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा शँम्पू, १ चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड आणि थोडेसे अँटिसेप्टिक लोशन टाकून त्यात आपले हात ५ मिनिटे डिप करून ठेवा. स्क्रबरच्या मदतीने डेड स्किन काढून टाका. शेवटी मॉईश्चरायजिंग क्रीमने हातांना मसाज करा.

घरीच पेडिक्युअर करण्यासाठी अर्धा टब कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा शॅम्पू, १ चमचा मीठ आणि थोडेसे अँटिसेप्टिक लोशन टाकून त्यात आपले पाय १० मिनिटे डिप करून ठेवा. असे केल्याने नखे मऊ होतील. आता स्क्रबर घेऊन डेड स्किन रिमूव्ह करा आणि नखांना कापून फाइल करा. यानंतर क्युटिकल पुशरने क्युटिकल्सना पुश करून क्युटिकल कटरने काढून टाका. शेवटी मॉईश्चरायजिंग क्रीमने पायांना मसाज करा.

मेकअपच्या आधी क्लिनिंग

चांगल्या मेकअपसाठी स्वच्छ आणि चमकदार त्वचा ही पहिली आवश्यकता आहे. यासाठी सर्वप्रथम त्वचा क्लीन करा. त्वचा क्लीन करायला तुम्ही क्लिंझिंग मिल्कचा वापर करू शकता. कापसावर क्लिंझिंग मिल्क घेऊन चेहरा, मान आणि जवळचा एरिया क्लीन करा. क्लिनिंग नंतर टोनिंग करणे अतिशय आवश्यक आहे. टोनिंगसाठी चांगल्या क्वालिटीचा टोनर वापरा.

टोनिंगसाठी बर्फाचा वापरही करू शकता. मग चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून मेकअप करायला सुरुवात करू शकता. फेस्टिव्ह मूड एक्साइटमेंटने भरलेला असतो, ज्यामुळे घामही पुष्कळ येतो. त्यामुळे मेकअप हा वॉटरप्रुफ असणे आवश्यक असते. यासाठी आपल्या चेहऱ्यावर फाउंडेशन लावा आणि ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्टचा वापर जरूर करा.

ओठांना द्या सुंदर टच

जर ओठ गुलाबांच्या पाकळयांप्रमाणे असतील तर चेहरा अतिशय मोहक दिसतो. जर तुम्हालाही आपले ओठ सुंदर दिसावेत असे वाटत असेल तर ओठांना लिप लायनरने शेप द्या. जर ओठ जाड असतील तर लायनर नॅचरल लायनिंगपासून थोडे आत लावा आणि जर ओठ पातळ असतील तर नॅचरल लाइनच्या थोडे बाहेर लावा.

आय मेकअप

आय मेकअपसाठी फक्त वॉटरप्रुफ प्रॉडक्टचाच वापर करा. चांगल्या मेकअपसाठी बेस सर्वप्रथम आवश्यक असतो. जर तुमच्या त्वचेवर एखादा डाग असेल तर त्यावर कंसीलर लावून तो कंसील करा. जर डोळयांखालील काळी वर्तुळे लपवायची असतील तर एक शेड डार्क कंसीलर लावा.

उत्सवाच्या वेळेस डोळे आकर्षक वाटण्यासाठी रेड किंवा मरून आयशॅडो डोळयांच्या जवळ थोडा लाइट आणि बाहेरच्या बाजूस थोडा डार्क लावा. तुम्हाला हवे असल्यास रात्रीच्या वेळेस तुम्ही गोल्डन कलरची स्पार्कल डस्टही वापरू शकता. आयब्रोजच्या खाली हायलाइटर लावा. शेड्सनुसार हायलाइटर गोल्डन किंवा सिल्व्हर निवडू शकता. आता आयलाइनर लावा. मग पापण्यांना कर्ल करा.

जर तुम्ही रात्री मेकअप करत असाल तर मस्कारा डबल कोटमध्ये लावणे उत्तम. मग आयब्रोजना आयब्रो पेन्सिलने शेप द्या. जर तुम्हाला आयशॅडो लावायचा नसेल तर डोळयांना कलरफुल लायनरने सजवा. शेवटी काजळ लावून डोळयांना द्या एक आकर्षक लुक.

आयलायनरच्या लेटेस्ट स्टाइल

– प्रतिनिधी

नवनवीन फॅशन करून पाहणं आवडत असेल तर रेग्यूलर आयलायनर स्टाइलला बायबाय म्हणून आयलायनरच्या लेटेस्ट स्टाइलला आपलेसे करा. हल्ली आयलायनरच्या कोणकोणत्या स्टाइल टे्न्डमध्ये आहेत हे जाणून घेऊ मेकअप आर्टिस्ट मनीष केरकरकडून :

फ्लोरल आयलायनर

डोळ्यांच्या मेकअपमध्ये सूपर कुल लुक देण्यासाठी फ्लोरल आयलायनर हा एक छान पर्याय आहे. आय मेकअपमध्ये बहुतांशी काळे किंवा ब्राऊन शेडचे आयलायनर अधिकीने वापरले जाते. पण फ्लोरल आयलायनर स्टाईलमध्ये पांढऱ्या रंगापासून पिवळा, गुलाबी, लाल, जांभळा असे बोल्ड शेड्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

या रंगीबेरंगी आयलायनर्सनी पापण्यांवर वेगवेगळ्या फुलांची डिझाइन काढली जाते. म्हणून याला फ्लोरल आयलायनर स्टाइल म्हणतात. पूर्ण पापणीवर किंवा दोन्ही पापण्यांच्या सुरूवातीला किंवा टोकाच्या बाजूला फुलांची डिझाइन काढली जाते. आयलायनरची ही स्टाईल डे पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. फ्लोरल डिझाइनला योग्य आकार देण्यासाठी पेन आणि लिक्विड आयलायनरचा वापर करा.

क्रिस्टल आयलायनर

तुमच्या डिझायनर डे्सवर परफेक्ट मॅच होण्यासाठी क्रिस्टल आयलायनर हल्लीच फॅशनमध्ये आले आहे. यासाठी सर्वात आधी काळे, ब्राउन किंवा निळे असे घातलेल्या पेहरावाला मॅचिंग असणारे कोणत्याही एका शेडचे आयलायनर पापणीवर व खालीसुद्धा लावू घ्यावे.

हे व्यवस्थित वाळून सेट झाल्यानंतर आयलायनरच्या जवळ किंवा वर गोल्डन किंवा सिल्वर शेडच्या छोट्या छोट्या टिकल्या ओळीत चिकटवा. यामुळे तुमच्या आयलायनरला क्रिस्टल इफेक्ट मिळेल आणि लाइट पडताच तुमचा आयमेकअप चमकू लागेल. लग्नप्रसंगी किंवा नाईट पार्टी, काही विशेष सोहळ्यांसाठीही क्रिस्टल आयलायनर स्टाइल अतिशय बेस्ट आहे.

स्टिक ऑन आयलायनर

जर तुम्हालाही आयलायनरच्या वेगवेगळ्या शेड्स ट्राय करून पाहायच्या असतील, पण कुठल्याही प्रोफेशनलच्या मदतीशिवाय स्वत: वेगळ्या स्टाइलचा आयमेकअप करायची हिंमत होत नसेल किंवा आयलायनरला योग्य आकार देता येत नसेल तर समजून घ्या की स्टिक ऑन आयलायनर खास तुमच्याचसाठी आहे.

बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या शेड्स आणि डिझाइनचे स्टिक ऑन आयलायनर लावून तुम्ही तुमच्या आय मेकअपला आकर्षक लुक देऊ शकता. यासाठी तुम्हाला फार काही करायची गरज नाही. फक्त आयलायनर स्टिकर पापण्यांवर योग्य जागी चिकटवायचे असते. स्टिक ऑन आयलायनर दिवसा असणाऱ्या कार्यक्रमांऐवजी रात्रीच्या कार्यक्रमात जास्त आकर्षक व उठून दिसते.

कॅन्डी केन आयलायनर

जर तुम्ही मजा मस्तीच्या किंवा सुट्टीच्या मूडमध्ये असाल व तुमच्या आय मेकअपला तुम्हाला वेगळा लुक द्यायचा असेल तर कॅन्डी केन आयलायनरद्वारे तुम्ही आय मेकअपला कॅन्डी केन लुक देवू शकता. या आयलायनर स्टाइलसाठी तुम्हाला फार काही करायचे नाही. फक्त व्हाईट आणि रेड शेड्च्या पेन्सिल, लिक्विड, पेन आयलायनर जे तुम्हाला आवडेल ते खरेदी करा. मग त्यावर रेड शेडच्या आयलायनरने थोड्या थोड्या अंतरावर तिरक्या रेषा बनवा.

डे पार्टी किंवा गेटटुगेदरमध्ये फंकी लुकसाठी कॅन्डी केन आयलायनर लावू शकता. सुंदर लुक दिसणारे हे कॅन्डी केन आयलायनर तेव्हाच लावा, जेव्हा तुमच्या डे्रसचा रंग व्हाईट आणि रेड असेल.

बबल आयलायनर

जर तुम्ही नेहमीसारखे स्टे्ट आयलायनर लावून कंटाळला असाल तर बबल आयलायनर ट्राय करून पाहा. स्टे्ट आयलायनर प्रमाणेच हे आयलायनरही तुम्ही नेहमी लावू शकता. यासाठी नेहमी वापरण्यात येणारे ब्लॅक आयलायनर नेहमीप्रमाणे स्टे्ट न लावता डॉट डॉट करून बबलप्रमाणे बनवावेत म्हणजे ती सरळ लाईन न दिसता वर खाली दिसू लागेल.

तुम्हाला आवडत असेल तर बबलच्या मधोमध व्हाईट पेन आयलायनरने डॉट बनवून त्याला अधिक आकर्षक लुक देऊ शकता. बबल आयलायनर तुम्ही रोज लावू शकता व दैनंदिन आऊटफिटसोबत ते मॅचसुद्धा होते.

रिबन आयलायनर

स्टे्ट, राऊंड आणि फिश कटशिवाय काही वेगळी आयलायनर स्टाइल ट्राय करायची असेल तर रिबन आयलायनर स्टाइल ट्राय करून पाहा. यासाठी वरच्या पापणीवर ब्लॅक लिक्विड वा जेल आयलायनर लावा. आता खालील पापणीवर ब्लॅक आणि ब्राउन किंवा अन्य एखाद्या शेडचे पेन आयलायनर लावा आणि शेवटच्या टोकाला जाताच वर लावलेल्या ब्लॅक आयलायनरला रिबीनप्रमाणे लपेटून लावल्याप्रमाणे लावा.

रिबन आयलायनर स्टाइल तुम्ही कुठल्याही विशेष प्रसंगी किंवा रेग्यूलर दिवशीही लावू शकता. पारंपरिक कपड्यांपेक्षा वेस्टर्नवर हे स्टायलिश दिसते.

ग्लिटर आयलायनर

ग्लिटर लिपस्टिक, ग्लिटर आयशॅडो आणि ग्लिटर हेअर हायलायटर याबरोबरीनेच सध्या ग्लिटर आयलायनरचीसुद्धा चलती आहे. हे पारंपरिक व वेस्टर्न वेअरवरही सूट होते. हे फक्त वर किंवा वर खाली दोन्ही पापण्यांना लावू शकता. केवळ ग्लिटर आयलायनर किंवा ब्लॅक, ब्राऊन, ब्लू यांसारख्या दुसऱ्या शेडचे आयलायनर लावून त्यावरही ग्लिटर आयलायनर लावू शकता.

सिल्वर, गोल्डन याबरोबरच पिंक, ब्लू, पर्पल, रेड, यलो असे शेड्ससुद्धा या ग्लिटर आयलायनरमध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक दिसण्यासाठी जेल आयलायनर वापरा. नाईट पार्टी किंवा समारंभात मेकअप हायलाइट करण्यासाठी ग्लिटर आयलायनर स्टाइलहून उत्तम पर्याय असूच शकत नाही.

हायफूने मिळवा तेजस्वी रूप

– प्रतिनिधी

आम्ही ३५ व्या वर्षी ४५ वर्षांच्या दिसत आहात का? सुरकुत्यांमुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य हरवलं आहे का? उत्तर ‘हो’ असेल तर तुम्ही वाढत्या वयाच्या या खुणा हायफू अॅन्टीएजिंग स्कीन ट्रीटमेंटच्या सहाय्याने कमी करू शकता. या तंत्रामुळे सैल पडलेल्या त्वचेला तजेला प्राप्त होतोच, शिवाय यामुळे त्वचा तरूण आणि तेजस्वी दिसते.

डर्मेटोलॉजिस्ट डॉ. डिंपल भंखारिया यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘प्रखर ऊन, प्रदूषण, वातावरणातील बदल, तणाव, धूम्रपान, अल्कोहोलसारख्या वाईट सवयींचा परिणाम सर्वात आधी त्वचेवर दिसू लागतो. त्वचा कोरडी, सैल आणि फिकी वाटू लागते.

दिवसेंदिवस त्वचेतील फॅट कमी होऊ लागते. परिणामी त्वचा पातळ आणि कमकुवत होऊ लागते. यामुळे सुरकुत्या, डाग यांसारख्या त्वचेसंबंधी समस्या निर्माण होतात. हे सर्व कमी करण्यासाठी सनस्क्रीन, अॅन्टीएजिंग क्रिम आणि जेंटल मॉइश्चरायजरचा वापर आणि व्यायामासोबतच हायफू अॅन्टीएजिंग स्कीन ट्रीटमेंटची मदत घेऊ शकता.’’

हायफू म्हणजे काय?
‘हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड’ हे ‘हायफू स्किन टाइयनिंग ट्रीटमेंट’ या नावाने ओळखलं जातं. हा एक प्रकारचा अॅन्टीएजिंग उपचार आहे. हे एक नॉनसर्जिकल तंत्र आहे. याच्या सहाय्याने चेहरा व गळ्यासह शरीराच्या अन्य भागांतील त्वचा घट्ट केली जाते. यामुळे त्वचा कायम तरूण राहते.

हायफू कशावर उपयोगी आहे?
हायफूच्या मदतीने भुवया, कपाळ, गाल, हनुवटी, गला, पोट इत्यादींची सैल त्वचा घट्ट केली जाते. याच्या सहाय्याने डोळे, ओठ, डोकं, नाक इत्यादींच्या भोवती पडणाऱ्या सुरकुत्याही नष्ट केल्या जाऊ शकतात. यामुळे त्वचेवरील उघडी छिद्रं बंद होतात. या तंत्राच्या सहाय्याने स्कीन टाइटनिंगसह स्कीन लिफ्टिंगही केलं जाऊ शकतं. जॉ लाइन आणि भुवया मूळ जागेवरून सरकल्या असतील तर जॉ लिफ्टिंग आणि आयब्रोज लिफ्टिंगच्या सहाय्याने आपल्या जागेवर आणता येते.

हायफू कसं काम करतं?

ट्रीटमेंटच्या सुरूवातीला चेहऱ्यावर लोकल अॅनेस्थेशिया क्रिम लावली जाते, यामुळे त्वचा ओलसर होते. त्यानंतर मशिनच्या हंड पीसद्वारे प्रभावित जागेवर शॉट (लेजरच्या किरणांप्रमाणे) दिले जातात. यामुळे हलकासा चटका जाणवतो. यामुळे त्वचेमधील उती आकुंचन पावतात. यामुळे त्वचेला तजेला येतो.

या तंत्रामुळे नव्या कोलोडनचीही निर्मिती होते, कोलोजन एक प्रकारचं स्क्रिन फाइबर असतं, जे वयानुसार कमी होत जातं. यामुळेच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि ओरखडे दिसू लागतात. या ट्रिटमेंटमुळे निर्माण झालेलं कोलोजन सुरकुत्या येऊ देत नाही. संपूर्ण चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि ओरखडे कमी करण्यासाठी ४५ मिनिटं ते १ तास एवढा अवधी लागतो. शिवाय यामध्ये वेदनाही होत नाहीत.

ही ट्रिटमेंट कधी घ्यावी?

३०-३५ वर्षांपासून ६०-६५ वर्षांपर्यंतचे महिला आणि पुरुष ही ट्रिटमेंट घेऊ शकतात. ही ट्रिटमेंट कोणत्याही स्कीन टाइप आणि स्कीन टोनच्या व्यक्ती घेऊ शकतात.

ट्रीटमेंट घेतल्यानंतर ३-४ महिन्यांनी याचा परिणाम दिसू लागतो, जो वर्षभर राहतो. मग हळूहळू ओरखडे आणि सुरकुत्या पुन्हा दिसू लागतात. तेव्हा पुन्हा त्या या ट्रीटमेंटच्या सहाय्याने कमी केल्या जाऊ शकतात. तुमच्या चेहऱ्यावर कमी सुरकुत्या असतील तर वर्षातून एकदा आणि खूप जास्त असतील तर २-३ वेळा ट्रीटमेंट घेतली जाऊ शकते.

लेट नाइट पार्टी मेकअप

– सोमा घोष

पार्टीत जाणं प्रत्येकाला आवडतं. पण पार्टी रात्रीच्या वेळेस असल्यावर मात्र स्त्रियांच्या मनात प्रश्न उद्भवतो की मेकअप कसा करावा. याबाबत ब्यूटी एक्सपर्ट आणि मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनी सांगतात की रात्रीच्या पार्टीमध्ये कधीही भडक मेकअप चांगला दिसतो. त्यावेळेस मिडनाइट लाइट, सॉफ्ट लाइट आणि कँडल लाइटचं वातावरण असतं. जिथे भडक रंगाच्या आउटफिटबरोबरच डार्क, ग्लिटरिंग आइज, स्मोकी आइज इत्यादी चांगले दिसतात. मोकळे केस आणि लाल, तांबूस किंवा मरून लिपस्टिक लावून तुम्ही आणखीन जास्त सुंदर दिसू शकता. पार्टीमध्ये डान्सफ्लोअर असेल तर अशाप्रकारचा मेकअप तुम्हाला आणखीन जास्त आकर्षक दाखवतो. मात्र हा मेकअप जास्त वेळ टिकून राहावा म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणं फार जरुरी आहे :

* सर्वप्रथम चेहरा मॉश्चराइज करा. साधारणपणे १५ मिनिटे मॉश्चरायझर लावून ठेवल्यानंतर आपल्या स्क्रिन टोनच्या अनुरूप फाउंडेशनचा वापर करा. फाउंडेशन लावण्यापूर्वी फेस प्रायमर लावून घ्या. यामुळे मेकअप बराच वेळ टिकून राहातो. हे त्वचा आणि फाउंडेशनमध्ये एका आवरणाचं काम करतं. फाउंडेशन क्रीम, पावडर, जेल इत्यादी कोणत्याही प्रकारचं असू शकतं. जर क्रीम फाउंडेशन लावलं असेल तर कॉम्पेक्ट पावडर वापरणं फार जरूरी आहे.

* डोळ्यांचा मेकअप विशिष्ट असतो जो तुमच्या आउटफिटनुसारच असावा. आउटफिटच्या अपोजिट रंगांचा वापर करणंही चांगलं ठरतं. फ्लॅट आयशॅडो ब्रशच्या मदतीने आयशॅडो लावून घ्या. त्यानंतर मऊ ब्रशच्या मदतीने ते चांगल्याप्रकारे ब्लेण्ड करा. डोळ्यांच्या उभाराच्या बाजूला गडद रंग लावत जाऊन आयब्रोजपर्यंत फिका रंग लावा.

* त्यानंतर ब्लॅक, ब्लू, ब्राउन किंवा ग्रीन काजळ लावा. पेन्सिल किंवा आयलायनर लावल्यानंतर मसकारा लावणंही गरजेचं असतं. स्मोकी आइज आणि गडद लाल लिपस्टिक अशा पार्टीमध्ये फार छान दिसतं.

* ब्लशर कायम आपल्या स्किनटोनपेक्षा दोन शेड डार्क लावा. याने मंद प्रकाशातही गालांची चमक उठून दिसते.

* ओठांवर लिपग्लॉसचा पातळ थर लावा. त्यानंतर लिप पेन्सिलीने ओठांना आउटलाइन द्या आणि मग लिपस्टिक लावा. त्यानंतर ओठांवर टिशू पेपर ठेवा आणि मग ब्रशच्या मदतीने लूड पावडर लावा. टिशूपेपर काढून पुन्हा लिपस्टिकचा थर द्या.

नम्रता पुढे सांगते की मेकअपमध्ये केसांकडेही विशेष लक्ष द्यावं लागतं. केस लांब असतील तर ब्लोड्राय चांगलं दिसतं आणि कर्ली असतील तर ते मोकळे ठेवा. ऑफिस गोइंग असाल तर मधोमध पार्टीशन करून एक नॉट किंवा जुडा बनवा, जो तुम्हाला ऐलिगेंट लुक देतो.

मेकअप बराच वेळ टिकवून ठेवण्यासाठी अधूनमधून टचअप करणंही फार जरुरी असतं. जेणेकरून तुम्ही फ्रेश दिसाल. यासाठी लिपस्टिक, कॉम्पेक्ट पावडर, टिशू पेपर इत्यादी सोबत ठेवावं. एकदीड तासांनी वॉशरूममध्ये जाऊन लिपस्टिक आणि कॉम्पेक्ट पावडर लावा; कारण तुम्ही जर डान्स फ्लोरवर असाल किंवा काही खाल्लं असेल तर लिपस्टिक रूमच होण्याची भीती असते.

अशावेळी वारंवार पावडर न लावता टिशू पेपर चेहऱ्यावर हळुवारपणे ठेवून चेहऱ्यावर सुटलेलं तेल आणि घाम सुकवा. याने तुमच्या चेहऱ्यावरील चमक दिसून राहील. मेकअप फ्रेश दाखवण्यासाठी चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारून टिशू पेपरने ते सुकवून घ्या. तुम्हाला ताजंतवानं वाटेल.

तुम्ही जर स्मोकी आइज किंवा डार्क आइजचा मेकअप केला असेल तर डोळ्यांवर बोटांच्या मदतीने हळुवारपणे हायलायटिंग पावडरने डॅब करा. यामुळे डोळ्यांची चमक टिकून राहील.

या सर्व गोष्टींबरोबरच जरूरी आहे तुमची गोड स्माइल, जी तुम्हाला कायम तुमच्या सौंदर्याची जाणीव करून देत असते. म्हणून त्यात कंजूषपणा करू नका.

जेव्हा हवा असेल नॅचरल लुक

– प्राची भारद्वाज

मेकअप परफेक्ट करणे ही एक कला आहे. अशी कोणती स्त्री असेल जिला मेकअपमध्ये पारंगत व्हायचे नसेल? जसा योग्य मेकअपमुळे चेहरा आकर्षक करता येतो तसेच चुकीच्या मेकअपमुळे चांगला चेहराही खराब दिसू शकतो.

मेकअपच्या कलेत नैपुण्य मिळवणे सोपे नाही. कालानुरूप मेकअप करण्याच्या पद्धतींमध्ये खूपच बदल झालेत आणि लेटेस्ट मेकअपच्या ट्रेंडमध्ये नाव येते ते एअरब्रश मेकअपचे. आजकाल एअरब्रश मेकअप खूपच हिट आहे. चला, माहिती करून घेऊया एअरब्रश मेकअपची.

काय आहे एअरब्रश मेकअप

आतापर्यंत सौंदर्य विशेषज्ञांच्या बोटांद्वारेच मेकअपची जादू पाहायला मिळायची. त्यांची साथ द्यायचे स्पंज आणि विविध प्रकारचे ब्रश. मात्र आता एअरब्रश मेकअप एक युनिक पद्धत आहे, ज्याद्वारे मेकअप चेहऱ्याच्या त्वचेवर स्प्रे केला जातो. याचा प्रयोग जास्त करून नववधू, मॉडेल्स किंवा अभिनेत्रींवर केला जातो. पारंपरिक मेकअपच्या विरुद्ध असलेल्या एअरब्रश मेकअपद्वारे नॅचरल लुक कायम ठेवणे सोपे असते. हे त्वचेशी एकरूप होऊन एकसारख्या त्वचेची अनुभूती देते.

कसा करतात

एअरब्रश मेकअपसाठी तुम्हाला योग्य प्रकारचे टूल्स आणि सोबतच खूप प्रॅक्टिसही गरजेची असते.

एअरब्रश मेकअपचे टूल्स किंवा किट ऑनलाइनही मिळते तेही वॉरंटीसह. टूल्समध्ये एक छोटा कंप्रेसर, एक एअरब्रश गन, स्वच्छ करण्यासाठी ब्रश, हौज पाइप आणि फाउंडेशन कलर व हायलायटरच्या बॉटल्सही येतात.

तुम्हाला एअरब्रश करायला येत नसले तरी मेकअपची बेसिक समज गरजेची आहे. त्यानंतर किटसोबतची माहिती पुस्तिका वाचून किंवा ऑनलाइन व्हिडिओ पाहून शिकता येते.

मेकअपची पद्धत

एअरब्रश मेकअपसाठी हात सरावाचे लागतात. एअरब्रश गन चेहऱ्यापासून किती दूर ठेवायची, किती प्रेशर गरजेचा आहे, हे सर्व सराव आणि मेकअप कसा हवा यावर अवलंबून असते. मेकअपचा कोणता इफेक्ट द्यायचा आहे, संपूर्ण चेहऱ्यावर द्यायचा आहे की काही भागच हायलाइट करायचा आहे, न्यूड लुक हवा की कंटूरिंग, हेवी मेकअप हवाय की लाइट, या सर्व गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. मेकअप करताना लुकनुसार एअर प्रेशर संतुलित ठेवणे आवश्यक आहे.

एअरब्रश मेकअप तुम्ही स्वत:हून शिकू शकता. गरज आहे ती फक्त सराव करत राहण्याची. एअरब्रश मेकअपद्वारे चेहऱ्याला चमकदार लुक मिळतो. पण सोबतच हेदेखील लक्षात ठेवा की ज्यांच्या चेहऱ्यावर लव आहे त्यांनी ती आधी साफ करून घ्यावी जेणेकरून एअरब्रश मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावरील केस फोटोत चमकणार नाहीत.

नववधूच्या मेकअपमध्ये याचे तोटे

नववधूच्या मेकअपसाठी आजकाल एअरब्रश मेकअपची बरीच चलती आहे. चला, जाणून घेऊया याचे तोटे काय आहेत :

* वॉटरप्रुफ असल्यामुळे हा त्या नववधूंसाठी सूट होत नाही, ज्यांची त्वचा गरजेपेक्षा जास्त ड्राय असते.

* शेड्स आणि ब्रँड्सचे यात खूपच कमी पर्याय असतात.

* बजेटमध्येच मेकअप करू इच्छिणाऱ्या नववधूंसाठी हा महाग ठरू शकतो.

एअरब्रश मेकअपचे फायदे

* एअरब्रश मेकअपमुळे फाईन लुक मिळवणे शक्य आहे. हात, स्पंज आणि ब्रशने केलेल्या मेकअपमध्ये त्वचेवरील छिद्रे आणि सुरकुत्या दिसण्याची शक्यता अधिक असतात. एअरब्रश मेकअप एकसारख्या स्किन टोनची अनुभूती देतो.

* एअरब्रश मेकअपमुळे डोळे, ओठ आणि चीक बोन्सना उभारी देणे सोपे होते. सोबतच ट्रेडिशनल मेकअपप्रमाणेच यात कंटूरिंग करणेही शक्य आहे.

* एअरब्रश मेकअपमुळे त्वचा एकसारखी, मुलायम आणि नॅचरल दिसते.

* एअरब्रश मेकअप बराच वेळ टिकून राहतो. भारतीय हवामान आणि तासनतास चालणाऱ्या आपल्या सणसमारंभांमध्ये दीर्घकाळ टिकणारा मेकअपच आपल्या आवडीचा ठरतो. खासकरून नववधूसाठी, जिला लग्नाच्या प्रदीर्घ विधि मेकअपमध्ये राहूनच करायच्या असतात.

* वॉटरप्रूफ मेकअपमध्येही एअरब्रश मेकअप उत्तम असल्याचे सिद्ध होते.

* हायजीन आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही एअरब्रश मेकअप उत्तम आहे, कारण यात हातांऐवजी टूल्सचा वापर केला जातो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें