सौंदर्य समस्या

* समाधान ब्यूटी एक्सपर्र्ट, पूजा साहनी

मी ४२ वर्षांची स्त्री आहे. मी माझ्या पांढऱ्या केसांमुळे खूप चिंतित आहे. खरं तर मी जो हेअरकलर वापरते, त्यामध्ये असलेल्या पीपीडीने मला एलर्जी होते. मी हर्बल मेंदीदेखील वापरून बघितली पण काहीच फायदा झाला नाही. कृपया मला हेअरकलर करण्याची अशी एखादी पद्धत सांगा जी नॉन एलर्जिक असावी किंवा पीपीडीरहित असावी?

तुम्ही हे सांगितलं नाही की हेअरकलर यूज केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची एलर्जी होते. सामान्यपणे अनेक लोकांना हेअर कलरमध्ये असलेल्या पीपीडीने घबराट, खाज, सूज यासारख्या समस्या होतात. याचा एकमेव उपाय हा आहे की तुम्ही अशा हेअर कलरचा वापर करा, ज्यामध्ये पीपीडी नसेल किंवा हेअर कलर वापरण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही एण्टीएलर्जिक औषध घ्या, म्हणजे तुम्हाला एलर्जी होणार नाही.

मी १८ वर्षांची तरुणी आहे. माझी त्वचा सावळट आहे. मला स्किन व्हाइटनिंग आणि गोरेपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे जेणेकरून माझा रंग सुधारेल?

गोरेपणा किंवा सावळटपणा हे नैसर्गिक असतं. पण काही उपाय करून त्वचेचा रंग नितळवला जाऊ शकतो. त्वचेचा रंग नितळवण्यासाठी तुम्ही १० तुळशीची पानं वाटून त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिसळून १५ ते २० मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. असं सलग २० दिवस करा. तुम्हाला तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये जरूर फरक दिसेल. ब्यूटी ट्रीटमेंटबद्दल म्हणावं तर तुम्ही व्हाइटनिंग फेशियलही करून घेऊ शकता. घरगुती उपाय म्हणून तुम्ही दही किंवा कच्च्या बटाट्याचा रसही वापरू शकता. त्यानेदेखील तुमची त्वचा नितळेल.

मी २८ वर्षांची तरुणी आहे. माझ्या चेहऱ्याच्या त्वचेवर मुरमांमुळे डाग पडलेत. हे दूर करण्याचा उपाय सांगा?

मुरमांचे डाग कमी करण्यासाठी तुम्ही मेथीच्या पानांचा पॅक चेहऱ्यावर लावू शकता. जर मेथीची पानं नसतील तर मेथीचं बी उकळूनदेखील तुम्ही पॅक बनवू शकता. हा पॅक तुम्ही चेहऱ्यावर १५-२० मिनिटं लावून ठेवा, मग चेहरा धुवा. शिवाय जिथे जिथे मुरमांचे डाग आहेत तिथे लिंबाच्या रसामध्ये कापूस भिजवून तोपर्यंत त्वचेवर ठेवा जोपर्यंत लिंबाचा रस त्वचेमध्ये पूर्णपणे मुरत नाही. लिंबाचा रस एका नैसर्गिक ब्लीचचं काम करतं. याने मुरमांचे डाग कमी होण्यास मदत होईल.

मी १७ वर्षांची तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरमांमुळे ओपन पोर्स झाले आहेत. ते बंद करण्याचा एखादा उपाय सांगा?

बाजारात ओपन पोर्सना घट्ट करण्यासाठी अनेक ओपन पोर्स रिड्यूसिंग लोशन मिळतात. तुम्ही हवं तर ते वापरू शकता. याशिवाय ओपन पोर्सना बंद करण्यासाठी तुम्ही दररोज टोनरचा वापर करा. शिवाय अंड्याचा मास्कही तुम्ही वापरू शकता. अंड्याचा मास्क तुमच्या त्वचेला टाइटनिंग इफेक्ट देईल.

मी २८ वर्षांची तरुणी आहे. उन्हात गेल्यावर घाम येऊन माझे केस चिकट होतात, त्यामुळे मी माझे केस मोकळे ठेवू शकत नाही. केसांचा चिकटपणा दूर करण्याचा उपाय सांगा?

उन्हात गेल्यावर गरमी आणि घामामुळे केस चिकट होत असतात. या समस्येपासून बचावण्यासाठी केस धुण्यासाठी अशा शाम्पूचा वापर करा ज्यामध्ये कमी प्रमाणात मॉश्चरायझर असेल. जास्त मॉश्चरायझारयुक्त शाम्पूमुळे केस लवकरच तेलकट आणि चिकट होतात. याशिवाय केस धुण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करा. स्काल्पवर कंडीशरनचा वापर करू नका आणि केस सुकल्याशिवाय बांधू नका.

मी २२ वर्षांची तरुणी असून माझी त्वचा खूपच संवेदनशील आहे. जरासं उन्हात गेले किंवा हवामान बदलताच त्याचा परिणाम माझ्या चेहऱ्यावर दिसू लागतो. काही कारण नसताना माझ्या त्वचेवर खाज आणि कंड सुटू लागतो. मी माझ्या त्वचेची काळजी कशी घेऊ?

ही समस्या स्वच्छतेची कमी, प्रदूषण, स्टेस आणि हार्मोनल बदल इत्यादीमुळेही होऊ शकते. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वी ती पूर्णपणे तपासून घ्यावी. उन्हात बाहेर निघताना सनस्क्रीन लोशन वापरावं. नॅचरल प्रसाधनांचा वापर करावा.

मी १८ वर्षांची तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर फिकट काळ्या रंगाचे डाग झाले आहेत. शिवाय डोळ्यांखाली काळी वर्तुळंही झाली आहेत. मी अनेक प्रकारच्या फेशियल क्रीम्स आणि फेसवॉशचाही वापर केला, पण काहीच फरक दिसत नाहीए. कृपया एखादा उपाय सांगा, ज्याने हे डाग आणि काळी वर्तुळं दूर होतील?

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी कडुलिंब आणि तुळशीची पानं उकळून घ्या. मग त्या पाण्यामध्ये मुलतानी माती मिसळून फेसवॉश पॅक बनवा आणि चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुऊन काढा. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. काळ्या वर्तुळांबाबत म्हणावं तर त्यासाठी भरपूर झोप घ्या. झोपतेवेळी डोळ्यांखाली बदामाचं तेल लावा आणि हळुवारपणे मालीश करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें