सोप्या टीप्स राखतील फिट एंड फाइन

– मोनिका अग्रवाल

तुम्ही तंदुरुस्त राहू इच्छित असाल, तर काही टीप्सचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करता आणि डाएटही कंट्रोल करता. सुरूवात तर एकदम उत्साहाने करता, पण काही वेळाने हा उत्साह धरू लागतो आणि तुम्ही फास्टफूड खायला सुरूवात करता. मग हळु हळु पुर्वपदावर येता, असं तुम्हीच नाही तर प्रत्येक स्त्री करते.

फिट राहण्यासाठी ध्येय ठरवा

तुम्हाला सर्वात आधी ध्येय ठरवावं लागेल की कशाप्रकारे तुम्हाला फिटनेस हवा आहे. यासाठी तुम्ही मोठे नाही तर लहान ध्येय ठेवा. फिटनेस दिवा शिल्पा शेट्टीनुसार फिट राहण्यासाठी स्मार्ट ध्येय निश्चित करा. स्मार्ट ध्येय म्हणजे असा व्यायाम करा की जो सहजतेने करता येईल आणि परिणामही लवकर समोर येईल. सुरूवातीच्या दिवसात थोडं अंतरच पळा जे १५-२० मिनिटातच पूर्ण केलं जाऊ शकेल.

ठरवून जेवण तयार करा

कामाची घाई गडबड असो अन्य आणखीन काही महत्वाचा कार्यक्रम असो वेळेवर खाल्लंच पाहिजे. खाण्याची वेळ टाळू नये वा हलगर्जीपणा करू नये. योजना आखून पूर्ण आठवडयासाठी पोषण तत्वांनी परिपूर्ण असं जेवण बनवा. थोडा वेळ काढून पोषक तत्वांनी युक्त जेवण गरम करून खात जा. घरातून बाहेर जाताना आपलं जेवण आणि पाणी सोबत घेऊन जा.

चांगला जोडीदार निवडा

फिट राहण्यासाठी एका चांगल्या साथीदाराची निवड करा. त्यामुळे तुमच्यात उत्साह संचारेल. दोघं एकमेकांना प्रेरित कराल आणि रोजच्या दिनक्रमात उशीर होणार नाही. शक्य असेल तर एखाद्या व्यायाम शिकविणाऱ्या इंस्ट्रक्टरचा सल्ला घ्या.

मनावर नियंत्रण ठेवा

समजा बर्गर, पिझ्झा, चाट तुमची आवड आहे आणि तुम्ही ते बघून स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर आपला मार्ग बदला. खाण्याची इच्छा झाली, राहावलं नसेल तरी या भावनांवर नियंत्रण ठेवणं आपल्याच हाती आहे.

व्यायामाचा आनंद घ्या

फक्त कॅलरी कमी करायची आहे, हा विचार करून व्यायाम करू नका. तुम्हाला जे काम करायला आवडतं जसं की घराची सफाई, बागकाम, नृत्य यासारखी कामं मन लावून करा. आनंद घेत बॅडमिंटन, रश्शीउडया, टेनिस खेळणे वगैरे फिटनेस मेण्टेन करायचे सोपे प्रकार आहेत.

स्वत:ला बदला

जर दररोजच्या आयुष्याला कंटाळला असाल तर काहीतरी नवीन करा, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. जेव्हा फार कंटाळा येईल, तेव्हा काहीतरी नवीन करा, मग भले ते स्वयंपाक करणं असेल किंवा डांसिंग असेल किंवा इतर काही हलकफुलकं जे तुम्ही ऐन्जॉय कराल.

व्यस्त राहा स्वस्थ रहा

बारीक व्हायचं आहे, हा विचार करुन स्वत:ला त्रास करून घेऊ नका. काहीच न खाणं किंवा शिळं अन्न खाणं योग्य नाही. मनावर नियत्रंण ठेवून हलकंफुलकं आणि पौष्टीक खा. भरपूर पाणी प्या. उपाशी पोटी राहू नका आणि नियमित व्यायाम करा. विश्वास ठेवा तुम्हाला पाहुन आरसाही लाजेल.

युरिनरी इन्फेक्शनकडे करू नका दुर्लक्ष

– डॉ. अनुभा सिंह,

महिलांच्या बाबतीत मूत्रमार्गाशी संबंधीत समस्या चिंतेचे मोठे कारण ठरू शकतात.

एक समस्या आहे युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) शरीरातील मूत्रमार्ग आयुष्यभर अशा काही जिवाणूंना लघवीच्या पिशवीत जाण्याचा मार्ग देत असतो आणि त्याचमुळे यूटीआय ही समस्या उद्भवते. त्यामुळेच बऱ्याचशा स्त्रियांना आयुष्यात एकदातरी यूटीआयचा सामना करावा लागतो.

खरंतर रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजन संप्रेरकांच्या कमतरतेमुळे संक्रमण तयार करणारे जिवाणू निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते. स्त्रियांच्या प्रजनन काळात एस्ट्रोजन हानिकारक जिवाणूंना योनिमार्गात घर बनवण्यापासून थांबवतात. त्यांचा पीएच स्तर कमी ठेवतात आणि त्यासाठी आवश्यक जिवाणूंच्या वाढीसाठी मदत करतात. हेच जिवाणू यूटीआयशी लढतात.

काय आहे युटीआय

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गातील संक्रमणाला सोप्या भाषेत यूटीआय असे म्हणतात. हे खरंतर जिवाणूंचे संक्रमण आहे. मूत्रमार्गाच्या कुठल्याही भागाला हे बाधित करू शकतात. मुख्यत्वे ई-कोलाई नावाच्या जिवाणूंमुळे ही समस्या निर्माण होते. अनेक प्रकारचे जिवाणू बुरशी व परजीवांमुळेही युटीआय समस्या होते. यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जसे की नावावरून स्पष्ट होते की हे आपल्या मूत्र प्रक्रियेचे संक्रमण आहे. या प्रक्रियेचे भाग आहेत किडनी, मूत्राशय आणि मूत्रमार्ग. यापैकी कुठल्याही भागाला संक्रमण झाले की त्याला यूटीआय असे म्हटले जाते.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच मूत्र संक्रमण ही खूप गंभीर समस्या नाही, पण वेळेवर इलाज न केल्यास या संक्रमणामुळे इतर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

यूटीआयची काही सामान्य कारणे आहेत
मासिक पाळीच्या काळात योनी व गुदमार्गाची स्वच्छता न ठेवल्यास प्रोस्टेस्टची वाढ व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे.

मूत्र मार्गात व आसपासच्या भागात असणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात वाढते. ही समस्या स्त्रियांना व पुरुषांना दोघांनाही असते, पण स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मूत्र मार्ग छोटा असतो.

थांवण्याचे उपाय

* शारिरीक स्वच्छतेकडे लक्ष देणे जसे की शारीरिक सबंधांआधी व नंतर लघवी करणे.

* द्रव पदार्थ जास्त प्रमाणात खाणे व जास्त वेळ लघवी थांबवू नये. क्रॅनबरी खाणे किंवा त्याचा रस पिणे. अननसाचा रस पिणे हासुद्धा आजाराला धोके कमी करण्यास मदत करतो.

* पुरेशा प्रमाणात क जीवनसत्त्वाचा आहारात समावेश असल्यास लघवीत जिवाणू उत्पन्न होत नाहीत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें