वार्डरोब ठेवा सुव्यवस्थित

* रोचिका शर्मा

तुमची तब्येत आणि फिटनेस यांची काळजी घेतल्यास तुम्ही ४०शी नंतरही कमनीय आणि सुंदर राहू शकता आणि आता वेळ आहे हे सौंदर्य अजून खुलवण्याची आणि त्यासाठी आवश्यकता आहे स्वत:ला नवीन ट्रेंडनुसार अपडेट राखण्याची.

जर तुम्ही नोकरदार महिला असाल तर तुमच्या कार्यालयानुसार कपडे वापरा. पण कपडे स्वच्छ आणि चमकदार असावेत. फक्त कपडेच नाही तर तुमच्या सँण्ड्ल्सही कपड्यांना अनुरूप असावेत. चेहऱ्यावरील मेकअपसुद्धा कार्यालयाला साजेसा असावा. गृहिणींनीसुद्धा याबाबतीत स्वत:ला कमी समजू नये. स्वत:चा वॉर्डरोब आमि राहणीमान व्यवस्थित ठेवावा. यासाठी काही टीप्स :

* काही वेळ ठरवून ठेवा आणि त्या निश्चित वेळेनुसार तुम्ही नवीन कपडे खरेदी करा कारण रोज वापरल्याने कपड्यांचा रंग उडतो आणि फॅशनही संपलेली असते.

* कार्यालयात होणाऱ्या विशेष मिटिंगसाठी काही कपडे वेगळे ठेवा कारण तुमच्या सिनिअर बॉसला तुम्ही कधीतरीच भेटता आणि पहिले इंप्रेशन शेवटचे असते.

* स्वत:च्या आवडीचा परफ्यूम खरेदी करा आणि फक्त एकाच प्रकारचा नाही तर वेगवेगळे प्रकार घ्या. म्हणजे अदलून बदलून वापरता येतात आणि नाविन्य राखता येईल.

* जेव्हा नवीन ड्रेस घ्याल तेव्हा त्यावर मॅचिंग अॅक्सेसरीज घ्यायला विसरू नका आणि ज्वेलरी वॉर्डरोबपासून जवळच ठेवा म्हणजे बाहेर पडताना तुम्हाला मॅचिंग ज्वेलरी शोधायला वेळ लागणार नाही.

* इस्त्री केलेले कपडे ओळीत हँगरवर ठेवा.

* जिमसाठी असलेली टॅ्रकपण्ट व टिशर्ट वेगळे ठेवा. घरात ते घालू नका.

* रात्री झोपताना तुमच्या आवडीची नाईटी वेगळी ठेवा. कशाला बदलायची, कोण बघतंय असा विचार करू नका.

* आपल्या आवडीच्या लिपस्टिक शेड जवळ बाळगा, शिवाय एका नॅचरल शेडसुद्धासोबत ठेवत चला, जी बाहेर जाताना वापरता येईल.

* उन्हात जाताना सनस्किनचा वापर करण्यास विसरू नये. यामुळे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून बचाव होतो.

* वॉर्डरोब स्वच्छ करून पेपर बदलत राहा, नाहीतर त्यात धूळ जमा होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें