हिवाळ्यातही स्वस्थ राहतील अस्थमाचे रूग्ण

* सोमा घोष

१५ वर्षीय अनुरिमाला दमा आहे. लहानपणापासूनच तिला दम्याचे झटके येत असत. नंतर तर वाढत्या वयाबरोबर अजून वाढत गेले. यासाठी तिला नियमित औषधं घ्यावी लागतात. खरंतर हा त्रास थंडीच्या दिवसांत खूपच वाढतो कारण थंडीच्या दिवसांत श्वासनलिकेत कफ अधिक प्रमाणात साचतो. ज्यामुळे श्वासनलिका भरून जाते व रूग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. परिणामी धाप लागते. काहीजणांना थंडीच्या अॅलर्जीमुळेही अधिक त्रास होतो.

मुंबईतील एसआरवी हॉस्पिटलच्या चेस्ट फिजिशिअन डॉ. इंदू बूबना यासंबंधी सांगतात, ‘‘अतिताण आणि धूम्रपान ही दम्याची दोन मोठी कारणे आहेत. यामुळे दमा सर्वात जास्त बळावतो. याशिवाय अपुरी झोप, प्रदूषण हेसुद्धा याला जबाबदार आहेत.

हिवाळ्याच्या दिवसात हा आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. पण योग्य दिनक्रमाने हा धोका कमी केला जाऊ शकतो. माझ्याकडे असे अनेक रूग्ण येतात जे दम्याचे नाव ऐकूनच घाबरून जातात, जेव्हा की हा आजार जीवघेणा नाहीए.’’

डॉ. इंदू यांच्या मते हिवाळ्याच्या ऋतुमध्ये दम्याच्या रूग्णांनी खाली सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी :

* सर्वप्रथम घर स्वच्छ व हवेशीर ठेवावे.

* श्वास नेहमी नाकानेच घ्यावा. यामुळे हवा गरम होऊन छातीपर्यंत पोहोचते. ज्यामुळे थंडी कमी वाजते. तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करू नये.

* तापाची लस टोचून घ्यावी. यामुळे ७० टक्के व्यक्ती थंडीच्या अॅलर्जीपासून वाचू शकतात.

* घरात जर रूमहीटरचा वापर करत असाल तर वेळोवेळी त्याच्या फिल्टरची स्वच्छता करावी, जेणेकरून त्यावर धूळमाती जमणार नाही.

* घरातील पाळीव प्राणी, टेडीबिअरसारखी फरची खेळणी, झाडे इ. बेडपासून दूर ठेवावेत.

* थंडीपासून वाचण्यासाठी कित्येक जण आगीजवळ किंवा रूमहीटरजवळ बसतात. पण हे योग्य नाही कारण यामुळे लोकरी कापडाचे धागे जळतात. त्यातून निघणारा धूर दम्याच्या रूग्णांसाठी घातक असतो. म्हणून रूम हिटरने घर गरम करावे व त्यापासून दूर रहावे. तसेच घरातील उष्णता कायम राहिल असे पहावे.

* घरात जुने सामान ठेवू नये. साफसफाई करताना धूळ उडवू नये. ओल्या कापडाने घर स्वच्छ करावे.

* जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे कुठल्याही प्रकारच्या जिवाणूंशी संपर्क होणार नाही.

* थंडीच्या दिवसातही वर्कआउट अवश्य करा. पण आधी स्वत:ला वॉर्मअप करणे विसरू नये.

* थंडीत द्रवपदार्थ अधिक प्रमाणात खावेत. घरी बनवलेल्या कमी चरबीयुक्त आहाराचे सेवन करावे. आंबट खाल्ल्याने दमा वाढत नाही. पण ज्यांना अॅलर्जी आहे, त्यांनी खाऊ नये.

* रोज स्वच्छ व धूतलेले कपडे घालावेत. कॉटनचे कपडे घालून त्यावर लोकरीचे कपडे घालावेत.

* जर लहान मुलांना दमा असेल तर त्यांना पौष्टिक व न्यूट्रीशनयुक्त आहार द्यावा.

* औषधांचे नियमित सेवन करावे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें