बेस्ट पंप आता अडचणी झाल्या सोप्या

* पारुल भटनागर

आई होण्याचे सुख जीवनातील प्रत्येक सुखापेक्षा मोठे असते. ते कुटुंबात आनंद आणण्यासोबतच आईच्या जीवनाला एक वेगळी अनुभूती मिळवून देते. ती आपल्या चिमुकल्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार होते. दिवस असो किंवा रात्र, ती आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडते, मात्र अनेकदा इच्छा असूनही सुरुवातीचे ६ महिने बाळासाठी आईचे दूध सर्वकाही असतानाही आई बाळाला स्वत:चे दूध पाजण्यात असमर्थ ठरते. खरंतर या दुधामुळेच बाळाचा सर्वांगीण विकास होत असतो.

अशावेळी दूध पाजण्यात असमर्थ ठरणाऱ्या आईचा त्रास दूर करणारा उपाय म्हणजे ब्रेस्ट पंप. यामुळे आई कुठेही आणि कधीही आपल्या बाळाला आपले दूध पाजून त्याच्या गरजा पूर्ण करू शकते.

कधी येते अडचण?

अनेकदा स्तनांमध्ये दूध येत नाही किंवा जास्त दूध येत असल्यामुळे स्तनांमध्ये प्रचंड वेदना होतात. याव्यतिरिक्त नोकरी करावी लागत असल्यामुळे नाईलाजाने आपल्या बाळाचे पोट भरण्यासाठी फॉर्म्युला मिल्कचा आधार घ्यावा लागतो. तो बाळाची भूक भागवतो, पण त्यातून बाळाला आवश्यक ती सर्व पोषक तत्त्वे मिळत नाहीत. यामुळे भविष्यात याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो, मात्र ब्रेस्ट पंप आईची अडचण सोडवण्यासोबतच बाळाची सतत काळजी घेण्याचे काम करते. भलेही आई त्याच्याजवळ असो किंवा नसो, ते आई आणि बाळाला समाधानी ठेवण्यासोबतच त्यांच्यात प्रेमाचे दृढ बंध निर्माण करण्याचे काम करते.

ब्रेस्ट पंप म्हणजे काय?

ब्रेस्ट पंप हे एक असे यंत्र आहे ज्याच्या मदतीने आई आपल्या स्तनातून दूध काढून ते साठवून ठेवू शकते. ब्रेस्ट पंप मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारचे असतात, जे वॅक्युमच्या दबावानुसार काम करते. मॅन्युअल ब्रेस्ट पंपमध्ये पंपाला हाताने दाबून दूध काढले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेस्ट पंपमध्ये पंप स्तनाला लावताच दूध स्वत:हून निघून पाईपमधून बाहेर येऊन त्याच्यासोबत असलेल्या बाटलीमध्ये भरले जाते. ते साठवून आई गरजेनुसार बाळाला दूध देऊ शकते. तिच्या गैरहजेरीत कुटुंबातील कोणीही सदस्य बाळाला दूध देऊन आईची कमतरता भरून काढू शकतो आणि आई बिनधास्त होऊन आपले काम करू शकते.

ब्रेस्ट पंपचा वापर करणे अतिशय सोपे असते. सोबतच याचे सर्व भाग वेगळे होत असल्याने तुम्ही तो अगदी सहज स्वच्छ करू शकता. फार कमी जागा लागत असल्यामुळे तुम्ही तो कुठेही नेऊ शकता. तो पॉकेट फ्रेंडलीही आहे.

जाणून घेऊया ब्रेस्ट पंपच्या फायद्यासंबंधी

* तुम्ही नोकरदार महिला असाल आणि जबाबदारीच्या ओझ्यामुळे नोकरी सोडणे तुम्हाला शक्य नसेल तर अशा परिस्थितीत ब्रेस्ट पंप तुमच्यासाठी खूपच कामाचा ठरेल. याच्यामुळे तुम्ही असा विचार करून मन लावून काम करू शकाल की, माझ्या बाळाला माझ्या गैरहजेरीतही भरपूर पोषण मिळत आहे.

* काही कारणांमुळे ब्रेस्टमधून दूध निघत नाही. यामुळे स्तन घट्ट होऊन त्यात गाठी पडण्यासह प्रचंड वेदना होऊ लागतात. त्यामुळे मनात असूनही आई आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाही. अशावेळी ब्रेस्ट पंप आईचा बेस्ट मित्र बनून तिची मदत करतो. यामुळे स्तनांमधून सहज दूध निघते. यामुळे आई आणि बाळ दोघांनाही दिलासा मिळतो.

* अनेकदा नवजात बाळाला आईच्या स्तनातून दूध पिताना त्रास होतो. ज्यामुळे त्याचे पोट भरत नाही. अशावेळी ब्रेस्ट पंपच्या मदतीने बाळ सहज दूध पिऊ शकते.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

* ब्रेस्ट पंप खरेदी करताना वजनाने हलका पंप खरेदी करा. त्यामुळे तुम्ही तो कुठेही सहज घेऊन जाऊ शकता.

* ब्रेस्ट पंप कमी आवाज करणारा असावा. यामुळे कोणालाही त्रास न होता तुमचे काम होईल.

* ब्रेस्ट पंप तुमची आवड आणि बजेटवर अवलंबून असतो, पण प्रयत्न करा की, हँड फ्री पंपच घ्या. यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल.

* तो संपूर्णपणे बीपीए फ्री हवा.

* बाळाला दूध देण्यापूर्वी बॉटल नेहमी स्वच्छ करून ठेवा. यामुळे बाळाला संसर्ग होण्याची भीती राहाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ब्रेस्ट पंपाने तुमचा अवघड काळ सर्वसामान्य बनवून स्वत:च्या कामासह आपल्या बाळाचीही संपूर्ण काळजी घेऊ शकाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें