लग्न मंडपांचा नवा दिमाख

* सोमा घोष

लग्नप्रसंगी मंडपाचं आकर्षण प्रत्येक वर वधूला असतं. हे योग्य आहेच कारण त्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलणार असते. म्हणूनच हा क्षण सर्वांनाच आठवणीत राहील असा बनवायचा असतो. तसेच लग्नाच्या जास्तीत जास्त विधी इथेच पार पाडल्या जातात.

एक काळ असा होता जेव्हा मंडप सजवण्यासाठी केळी आणि आब्यांच्या डहाळ्या, फूले, पाने इ. वापरले जात असे. पण बदलत्या काळामुळे यातही आधुनिकीकरण झाले आहे. खरे तर मंडपांचा आवाका हल्ली कमी होत चालला आहे. वेळ तसेच जागेची कमतरता ही त्याची कारणे आहेत. तरीही बरेच लोक आजही पारंपरिक लग्नांनाच महत्त्व देतात. तसेच हल्ली लग्नांसाठी इवेंट मॅनेजमेंटचाही आधार घेतला जातो.

गुड टाईम कॉन्सेप्ट्सचे इवेंट मॅनेजर आशु गर्ग यांच्याशी याबाबतीत बोलले असता ते म्हणतात की, विवाह मंडपांची धारणा आता कमी होत चालली आहे. पण अजूनही काही लोक पारंपरिक विवाहांना चांगलं मानतात व म्हणून ते इवेंट मॅनेजमेंटचा आधार घेतात. आम्हांला प्रत्येक वेळी मंडपासाठी वेगवेगळ्या कल्पना द्याव्या लागतात, जे त्यांच्या बजटनुसार असतात.

मंडप बनवण्यासाठी हल्ली नवनवीन पद्धतींचा वापर केला जातो. ज्यामध्ये थर्माकोल, कागद, रंग, इकोफ्रेन्डली प्रिंटरद्वारे लाकूड, कागद इ. वर विविध प्रकारची चित्रे काढून मंडप सजवला जातो. मंडपांची कल्पना हल्ली चित्रपटांमधूनही मिळते. पण बहुतेक मंडप संकल्पनेवर आधारित असतात. आशूच्या म्हणण्यानुसार हे मंडप अलीकडे अधिक प्रचलित आहेत.

घुमटाकार मंडप : ‘रिच ट्रेडिशन’ आणि परंपरा दर्शवणाऱ्या मुघलकाळापासून प्रचलित असणारे घुमटाकार मंडप लोकांना जास्तीत जास्त आवडतात. हे बनवण्यासाठी सुरेख खांबांचा वापर केला जातो. ज्यामुळे यांचे सौंदर्य वाढते. घुमट सजवण्यासाठी फूले व रंगांचाही वापर केला जातो. पूर्वीच्या काळी आकाशालाही घुमट मानले जायचे म्हणून अशा मंडपांची कल्पना आजही केली जाते.

थीमवर आधारित मंडप : पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आलेला मंडप ज्यात गडद रंग, सोनेरी व गुलाबी रंगसंगतीसोबत सॅटीन कापडाचा, वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. विवाहाच्या प्रत्येक विधीसाठी हा मंडप योग्य असतो. या अंतर्गत फुलाची संकल्पना, रंगांवर आधारित काही संकल्पना ज्यात रॉयल ब्लू, ब्लशिंग राज इ. खूपच लोकप्रिय आहेत.

राजस्थानी पद्धतींचा मंडप : हा मंडप राजस्थानातील गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जयपूरवर आधारित असतो. लाकडी खांबांवर कटवर्क काम करून हा बनवला जातो. यात प्रकाश योजना खूप चांगल्याप्रकारे केली जाते. ज्यात प्रकाशाचे प्रतिबिंब चारही दिशांना व खांबांना पसरते आणि आत असणाऱ्या दांपत्याला राजस्थानातील जयपूरमध्ये असल्याचा आभास वाटतो.

मोराच्या संकल्पनेवर आधारित मंडप : अशापद्धतींच्या मंडपात चारही बाजूंनी सोनेरी खांब उभारले जातात. मंडपाच्या मधोमध मोराची कलाकृती असणारी नक्षी गुलाबी फुलांच्या सहाय्याने बनवली जाते. सोनेरी खांब व गुलाबी फूले या मंडपांचे खास आकर्षण असतात.

रॉयल संकल्पना : राजवाडा मंडप ट्रेडिशनल ट्विस्टसोबत कंटेम्पररी डिझाइन मिळून बनवला जातो. यात खूप फूलांचा प्रयोग करून मोहक लुक दिला जातो. चमकदार गडद रंगांनी बनवण्यात आलेला हा मंडप शाही अंदाजाचा अनुभव मिळवून देतो. यात प्रकाश, पुरातन कलाकृती, रंग व सॅटिन कपड्यांपासून करण्यात आलेली सजावट पाहण्यासारखी असते. मंडपांचे प्रवेशद्वार ही खूपच आकर्षक बनवले जाते. मंडपाच्या आसापस बैठक व्यवस्थेला शाही लुक देण्यासाठी महागडी व सुरेख गाद्या, तकिया तसेच गालिच्यांचा वापर केला जातो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें