‘‘माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे’’ – वैष्णवी शिंदे

* सोमा घोष

२२ वर्षीय वैष्णवी शिंदे औरंगाबादची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिची ही आवड सोशल मीडियावर टाकून सर्वात अधिक लाईक्स मिळवणारी मुलगी बनली. हा तिचा छंद बनला आणि अभ्यासानंतर जेव्हादेखील वेळ मिळायचा तेव्हा ती नृत्य व अभिनय करायची. वैष्णवीला कधीच असं वाटलं नव्हतं की ती चित्रपटात अभिनय करू शकेल. वैष्णवी अभ्यासात खूप हुशार होती. तिने मॅथमॅटिक्समध्ये एमएस्सी केले आणि आता स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहे आणि तिचं स्वप्न आयएएस बनण्याचं आहे. परंतु चित्रपटांच्या चांगल्या ऑफर आल्या तर ती अभिनयदेखील करू शकते.

आयएएस बनल्यावर वैष्णवीला औरंगाबादला उत्तम रस्ते बनवायचे आहेत. जे कधीच कोणी केलं नाही. याबरोबरच क्लीन आणि ग्रीन इंडिया बनविण्याची तिची इच्छा आहे. तिचा मराठी चित्रपट ‘जिंदगानी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कन्सेप्ट वातावरण संरक्षित करण्याबाबत आहे. ज्याचा प्रभाव वास्तविक आयुष्यामध्ये देखील पूर्ण जगात पाहायला मिळत आहे.

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मला लहानपणापासूनच नृत्य, नाटक पाहणं आणि फोटोग्राफीची आवड होती. माझी आवडती अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे. तिला पाहूनच मी अभिनेत्री व्हायचं ठरवलं. परंतु यासाठी काय करायचं हे काही मला समजत नव्हत. मी लहान वयातच सोशल मीडियाशी जोडली गेले आणि काही नवीन गोष्ट म्हणजे नृत्य असो वा अभिनय मी सोशल मीडियावर टाकत गेले. यामुळे मला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळाली. मला सर्वांचे रिएक्शन पाहण्याची आवड होती. मला यामध्ये मजादेखील यायची. आता तर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद झाला आहे. माझ्या कुटुंबातील मी पहिली कलाकार असल्यामुळे माझं या क्षेत्रांमध्ये येणं काही नातेवाईकांना आवडलं तर काहीजणांना अजिबात आवडलं नाही. त्यांना वाटत होतं की हे क्षेत्र माझ्यासाठी उत्तम नाही आहे. मुलींसाठीदेखील सुरक्षित नाही आहे. परंतु माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच सर्वांची रिएक्शन पॉझिटिव्ह येऊ लागली. त्यांना माझा अभिनय आवडला आणि तो कायम राखण्यासाठी ते मला आता सल्ले देत असतात.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

मराठी अभिनेता विनायक साळवेचं माझ्या घरी येणं-जाणं होतं त्यांना माहीत होतं की मी सोशल मीडियावर छोटयाछोटया रिल्स टाकते आणि सर्व तरुणाईला ते आवडतं. त्यांनी एक संवाद अभिनयासोबत बोलायला सांगितला. माझा अभिनय त्यांना थोडाफार बरा वाटला. त्यांनी त्यामध्ये काही बदल सुचविले. मी त्यांनी सांगितल्यानुसार पुन्हा अभिनय केला आणि त्यांना माझा अभिनय आवडला. त्याचवेळी त्यांनी मला चित्रपटात अभिनय करण्याच्याबद्दल विचारलं, मी होकार दिला आणि मला तो चित्रपट मिळाला.

चित्रपटामध्ये अभिनय करण्याबद्दल तू पालकांना सांगितलं तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती? सर्व प्रथम कॅमेरासमोर भीती वाटली का?

माझी आई सुनीता शिंदेला खूप आनंद झाला, कारण पीएचडीचा अभ्यास करूनदेखील त्यांना चित्रपटाची आवड आहे. माझे वडील संपत शिंदे पोलीसमध्ये आहेत. त्यांनीदेखील कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही, म्हणून अभिनय क्षेत्रात येणं सहजसोपं झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सर्वांना माझं काम आवडलं आहे. माझे को-स्टार विनायक साळवे आणि शशांक शिंदे आहेत.

चित्रीकरणाचा पहिला दिवस माझ्यासाठी खूपच तणावपूर्ण होता. परंतु शूटिंग सर्वांसोबत होतं. सर्व मोठमोठे कलाकार होते. सर्वांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली होती, त्यामुळे मला खूपच भीती वाटत होती. सर्वांना ही गोष्ट समजत होती आणि सर्वांनी मला ताण न घेण्याचा सल्ला दिला. माझा पहिला शॉर्ट एवढा छान झाला की सर्वांनी टाळया वाजविल्या.

या चित्रपटामध्ये तुझी भूमिका कोणती आहे?

यामध्ये मी मोनीची भूमिका साकारली आहे. जी दिसते खूप शांत परंतु राग आल्यानंतर डेंजर बनते. खूप छान मुलगी आहे आणि कोणाशीही तिला अधिक बोलायला आवडत नाही.

पहिल्यांदा चेक मिळाल्यानंतर तू काय केलं?

मी सर्वप्रथम माझ्या आईच्या हातात चेक दिला आणि नंतर मी खूप शॉपिंग केलं. आई माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते. ती माझी आवड नावड खूप चांगली समजते.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मला फॅशन खूप आवडते. मी वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही घालते. मी डिझायनर कपडे घालत नाही. स्वत: मिक्स अँड मॅच करून वापरते. मला वेगवेगळया डिश ट्राय करायला खूप आवडतात, परंतु यामध्ये चाट मला अधिक आवडतं. मिठाईदेखील आवडते. आईच्या हातचा बनलेला गाजराचा हलवा खूप आवडतो. मला पोळी भाजी बनवता येते.

हिंदी आणि मराठी कलाकारांकडून तुला काय शिकायला आवडतं?

मला अभिनेत्री कैटरीना कैफ खूप आवडते. कारण तिने दुसऱ्या देशातून येऊन संघर्ष करून स्वत:ला एस्टॅब्लिश केलं आहे. अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा खूप आवडतो. मराठीमध्ये स्मिता पाटील यांचं काम आवडतं. अनेक लोकांनी मला मी स्मिता पाटीलसारखी दिसते असं सांगितलं.

स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरदेखील स्त्रिया घरगुती अत्याचार, बलात्कार इत्यादींना बळी पडत आहेत.

महिला दिनाबद्दल तू काय विचार करतेस?

माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत त्या दुसऱ्यांवर अवलंबून राहतील तोपर्यंत त्या मानसिक व शारीरिकरित्या त्रास भोगत राहतील. यासाठी खरंतर समाज आणि कुटुंबदेखील जबाबदार आहे, जे आपल्या मुलांना लहानपणापासून आई, बहीण, मुलगी आणि पत्नीच्या वेगवेगळया रूपात समजावून सांगत नाहीत. ज्यामुळे अशी मुलं मोठी होऊन कोणत्याही स्त्रीचा सन्मान करणं विसरून जातात आणि वाईट वागतात. या व्यतिरिक्त कायदयानेदेखील वाईट विचार ठेवणाऱ्या विरुद्ध लवकरच निष्पक्ष होऊन आपला निर्णय द्यायला हवा.

आवडता रंग : हिरवा.

आवडता पेहराव : भारतीय.

आवडते पुस्तक : द सीक्रेट.

पर्यटन स्थळ : देशात राजस्थान, परदेशात स्वित्झलँड.

वेळ मिळाल्यावर : झोपते आणि चित्रपट पाहते.

आवडता परफ्युम : पोसेस.

जीवनातील आदर्श : पालकांना अभिमान वाटेल असं.

स्वप्न : रोहित शेट्टीसोबत चित्रपट करणं.

सामाजिक कर्तव्य : रक्तदान प्रसार.

स्वप्नातील राजकुमार : लॉयल, हार्ड वर्किंग.

‘जिंदगानी’ चित्रपटाद्वारे नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण !

* सोमा घोष

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ चित्रपटाद्वारे वैष्णवी शिंदे हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. या चित्रपटात अभिनेते शशांक शेंडे आणि अभिनेते विनायक साळवे यांसमवेत वैष्णवी प्रमुख भूमिकेत आढळून येणार आहे.

‘जिंदगानी’ ह्या वैष्णवीच्या पहिल्याच चित्रपटात काम करतानाच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगताना वैष्णवी म्हणते की, चित्रीकरणाची संपूर्ण प्रोसेस माझ्यासाठी खूपच नवीन होती. त्यामुळे ‘जिंदगानी’ चित्रपटात काम करायची संधी मला मिळतेय हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला शिकता आल्या. शशांक शेंडेंसारख्या दिग्गज कलाकारांबरोंबर काम करण्याचे अविस्मरणीय क्षण गाठीशी बांधता आले.

अभिनेते शशांक शेंडेंबरोबर काम करतानाच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगताना वैष्णवी म्हणते की, हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे आणि शशांक सरांइतके दिग्गज कलाकार समोर असल्यामुळे सुरुवातीला मला खूप दडपण आलं होत. परंतु हे जेव्हा शशांक सरांना कळलं तेव्हा त्यांनी मला खूप छानप्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगत तेथील संपूर्ण वातावरण एकदम हसतं-खेळतं केलं त्यामुळे शूटिंग करायला खूप मजा आली.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली वैष्णवी ‘जिंदगानी’ चित्रपटात अभिनय करण्याच्या मिळालेल्या संधींसंदर्भात सांगते की, मी शाळा आणि कॉलेजमध्ये नाटकात आणि वार्षिक मोहोत्सवात दरवर्षी न चुकता भाग घेत असे. त्याचबरोबर एखाद्या चित्रपटातील पात्र मला आवडलं तर घरी येऊन तसंच तयार होऊन फोटो काढायला मला आवडतं. माझ्या घरी माझे वेगवेगळ्या पात्रांच्या वेशभूषेतील फोटोजदेखील लावलेले आहेत.

एकदा दिग्दर्शक विनायक भिकाजीराव साळवे सहज एका कामानिमित्त घरी आले असता त्यांनी माझे घरी लावलेले फोटोज पाहून माझ्यातील अभिनय कला जाणली आणि मला ‘जिंदगानी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली…

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें