योनिमार्ग संसर्गास प्रतिबंध करणे गरजेचं

* शैलेंद्र सिंह

योनिमार्गाचा संसर्ग म्हणजे योनीमार्गात संसर्ग होणे हे लहान मुलीपासून वृद्ध महिलेपर्यंत कोणालाही होऊ शकते. काही महिलांना आयुष्यात अनेकदा हा संसर्ग होतो. योनीमार्गाचा संसर्ग हा एक सामान्य आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष केल्याने होणारे परिणाम धोकादायक असू शकतात. वंध्यत्वही होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान योनिमार्गाच्या संसर्गामुळे लैंगिक रोगही होऊ शकतात, ज्याचे शिकार न जन्मलेले आईच्या पोटातील बाळही होऊ शकते.

योनिमार्गाच्या संसर्गामुळे ल्युकोरियासारखा आजारही होऊ शकतो, ज्यामुळे योनीतून पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव होतो. यामुळे पोट आणि पाठदुखी होऊ शकते. महिलांमध्ये तापासोबतच अशक्तपणाही येऊ शकतो.

योनिमार्गाच्या संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे. डॉ. मधू गुप्ता सांगतात की, योनीमार्गाच्या संसर्गामुळेही लैंगिक संबंधातून पसरणारे आजार होऊ शकतात. वैयक्तिक स्वच्छतेची अशा प्रकारे घ्या काळजी :

स्वच्छ पाण्याचा वापर करा : शरीर स्वच्छ ठेवण्याचे काम योनी करते. वैयक्तिक स्वच्छतेसाठी, बाथरूम वापरण्यापूर्वी तिथे फ्लश करणे किंवा पाणी ओतणे आवश्यक असते, कारण जर तुमच्या आधी एखाद्या रुग्णाने ते वापरले असेल तर तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो.

मासिक पाळीदरम्यान घ्या विशेष काळजी : मासिक पाळीच्यावेळी संसर्गाचा धोका जास्त असतो, त्यामुळे या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. संसर्गापासून दूर राहण्यासाठी चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड वापरा. आवश्यक तितक्या वेळा पॅड बदलत राहा. टॅम्पन लावण्यापूर्वी योनी पाण्याने धुवा. ते ५ तासांपेक्षा जास्त ठेवू नका.

कॉटनचा वापर उत्तम : पँटी वापरताना ती फक्त कॉटनची आहे याची खात्री करा आणि खूप घट्ट बसणारी पँटी वापरू नका. नायलॉन आणि सिंथेटिक पँटीजचा वापर कमी करा. यामुळे घाम येतो, ज्यामुळे योनिमार्गात त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. पँटी धुताना लक्षात ठेवा की, त्यात साबण राहाणार नाही. ती धुण्यासाठी सुगंधी साबण वापरू नका.

अस्वच्छ शौचालयापासून राहा दूर : संसर्ग टाळण्यासाठी गलिच्छ शौचालय वापरू नका. ज्या शौचालयात बरेच लोक जातात ते अतिशय जपून वापरा, कारण अशा शौचालयाचा वापर केल्यास युरिनरी ट्रॅक्ट संसर्गाचा धोका वाढतो.

स्वत:वर करू नका उपचार : योनीमध्ये किंवा आजूबाजूला खाज येत असेल, तर त्या भागाला चोळू नका. खाज कायम राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या मनाने किंवा केमिस्टच्या सल्ल्याने औषध घेऊ नका, अन्यथा त्रास वाढू शकतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याने करा डचिंग : योनीच्या आतील भाग स्वच्छ करण्यासाठी डचिंगची शिफारस केली जाते. त्यात काही विशिष्ट प्रकारचे औषध सापडते, पण ते स्वत:च्या मनाने लावू नका.

योनीमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे जिवाणू असतात. कधीकधी डचिंगमुळे खराब जिवाणू तसेच चांगले जिवाणूही नष्ट होतात, ज्यामुळे संसर्ग होतो.

अंतर्गत केसांची स्वच्छता : अंतर्गत केस म्हणजे जननेंद्रियाचे केस योनीच्या संरक्षणासाठी असतात. लघवीचा काही भाग योनीत जाण्यापासून रोखण्याचे काम ते करतात. त्यांची वेळोवेळी सफाई करणे फार गरजेचे असते.

तेथील त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे हे केस काढून टाण्यासाठी हेअर रिमूव्हर आणि शेव्हिंग क्रीमचा वापर कमी करा. केस ट्रिमिंग करणे हा सर्वात सुरक्षित उपाय मानला जातो.

वेजाईनल ड्रायनेस आणि वेदना

* डॉ. संचिता दुबे, फिमेल इश्यू एक्सपर्ट, मदरहूड हॉस्पिटल, नोएडा, मोनिका अग्रवाल यांनी केलेल्या बातचीतवर आधारित

वेजाईनल ड्रायनेस म्हणजेच योनीमार्ग कोरडं होण्याची समस्या, ही सर्वच वयोगटातील महिलांना होऊ शकते, मात्र रजोनिवृत्तीनंतर ही समस्या प्रत्येक महिलांमध्ये सर्वसामान्य होऊ लागलीय. संशोधन सांगतात की ही समस्या पोस्टमेनोपोजल स्त्रियांचा साधारणपणे अर्धा भाग प्रभावित करते आणि त्यामध्ये अनेकजणी अशाप्रकारच्या लक्षणांवर उपायदेखील शोधत नाहीत. यामध्ये कोरडेपणा बरोबरच संभोगाच्यावेळी जळजळ आणि वेदना यांचादेखील समावेश आहे.

हे इतर आजाराप्रमाणे जगण्याची गुणवत्ता कमी करू शकतं. रजोनिवृतीच्या काळात हळूहळू सुधारणा होते परंतु योनीचा कोरडेपणा तसाच राहतो कारण हे शारीरिक बदलामुळे उत्पन्न होतं. खासकरून ऐट्रॉफी ऑफ टिशूज, जे इस्ट्रोजनच्या हानिमूळे अगोदर कोरडे आणि कडक होतात.

वेजाईनल ड्रायनेसची लक्षणं

* संभोगाच्या दरम्यान लुब्रिकेशन न झाल्यामुळे वेदना होणं हळूहळू वाढत राहतं. योनीच्या आजूबाजूची त्वचा पातळ झाल्यामुळे ती सहजपणे क्षतीग्रस्त होते. जर लुब्रिकेशन होत नसेल तर सेक्सच्या दरम्यान अधिक त्रास होतो. अगदी कोमल घर्षणानेदेखील वेदना होऊ शकतात. वेदनादायी संभोगामुळे यौन कामेच्छा हळूहळू कमी होऊ लागते.

* योनी आणि वलवाच्या स्थितीत बदल होऊ लागतो. योनीचं वेगळं दिसणं सर्वसामान्य आहे कारण यामुळे तो भाग खूप पातळ होत जाईल.

* योनीच्या स्त्रावात बदल होऊ लागतो. स्त्रियांना हळूहळू त्यांच्या योनीस्त्रावात बदल दिसू लागतो. कारण हे जळजळ सोबतच दुर्गंधीयक्तदेखील असतं. ही लक्षणं चिंताजनक असण्याबरोबरच हार्मोनल बदलानादेखील कारणीभूत ठरतात.

भावनात्मक प्रभाव : योनीच्या कोरडेपणामुळे त्यांना वेगळं पडल्यासारखं वाटतं. शरीरातील बदल स्विकारणं कठीण होऊ शकतं आणि यामुळे होणाऱ्या वेदना आणि त्रास यामुळे आत्मविश्वास आणि संभोगातील आत्मविश्वास यामध्ये कमतरता दिसून येते.

कधीकधी या लक्षणांमुळे संभ्रम निर्माण होतो कारण हे यौन संचारीत रोग वा त्वचा सोलणं या लक्षणांसारखेच असतात. जसं की ही खूपच लज्जास्पद समस्या आहे, अनेक स्त्रिया हे निमूटपणे सहन करतात. खासकरून जर स्त्रिया लाजेखातर जोडीदाराला त्यांना यौन संबंधात रुची का नाही हे सांगण्यास लाजत असतील तर यामुळे त्यांच्या जोडीदाराच्या संबंधावर याचा अधिक परिणाम होतो.

उपाय

जर एखाद्या स्त्रीला वरील लक्षणांचा त्रास होत असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही त्वचेसंबंधित समान लक्षणंदेखील असू शकतात, जसं की योनीवर व आजूबाजूला पातळ, डाग असलेली पांढरी त्वचा, ज्यामुळे पांढरा पदर जाणं जे शेबुडासारखं असतं यामुळे खाज सुटते.

साधारणपणे, डिस्प्लेसिया नावाचं लक्षण यामुळे निर्माण होतं.

वेजाईनल इन्फेक्शन आणि खाजेची लक्षणंदेखील योनीच्या कोरडं होण्याच्या लक्षणांसारखीच असू शकतात.

अनेकदा इकडेतिकडे भटकून जेव्हा काहीच समाधान होत नाही तेव्हा योग्य डॉक्टरांकडे गेल्यास तुम्हाला कोरडेपणावर योग्य उपचार होऊ शकतात. वेजाईनल मॉइश्चरायझर, वेजाईनल इस्ट्रोजन वा इतर उपाय डॉक्टर सांगू शकतात.

काही डॉक्टर संभोगाच्यावेळी एखाद्या स्त्रीला लुब्रीकेंट वापरण्याचा सल्ला देऊ शकतात. हार्मोन थेरपीदेखील देऊ शकतात.

या उपचारांव्यतिरिक्त योग्य आहार तुमच्या योनीला हायड्रेट करण्यात मदत करू शकतं, ज्यामुळे शरीराच्या इतर भागातील कोरडया त्वचेला मदत मिळते.

योनीला लावण्यासाठी तात्पुरतं लोशन देता येतं, तसंच खोबरेल तेल वा ऑलिव ऑइलचा वापर मॉइश्चरायझरच्या रुपात वापर केला जाऊ शकतो. मात्र याचा नियमितपणे वापर केल्यास संक्रमण होऊ शकतं. जर तुमच्या लघवीवर अनियंत्रण असेल आणि यासाठी पॅड वापरत असाल तर त्वचेला सूज येऊ शकते कारण यामध्ये सुगंधित डिटरर्जेंट असू शकतं.

साधारणपणे, सुती पॅन्टी नियमितपणे वापरणं योग्य पर्याय आहे.

एक मौन समस्या

वेजाईनल ड्राइनेसशी संबंधित समस्यांचा सामना करण्यासाठी स्त्रियांची संख्या अधिक असूनदेखील ही आजसुद्धा एक मौन समस्या आहे. अनेक स्त्रिया आपल्या मैत्रिणी, जोडीदार अगदी डॉक्टरांनादेखील या गोष्टी सांगण्यास संकोच करतात. फक्त एक चथुर्ताश स्त्रिया यावर उपचार करण्यासाठी पुढे येतात.

लक्षात ठेवा, रजोनिवृत्तीनंतरच्या अवस्थेत. स्वत:च जीवन जगणाऱ्या महिलांनी रजोनिवृत्तीअगोदर स्वत:ला निरोगी ठेवणं गरजेचं आहे. वेजाईनल ड्राइनेसला वाढत्या वयाच्या अपरिहार्य भागाच्या रुपात उपचार करण्याची गरज नाहीए. त्यावर वेगळं करण्याची गरज आहे. स्त्रियांनी आपल्या समस्यांसाठी पुढे यायला हवं आणि मोकळेपणी बोलायला हवं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें