असे ठेवा, किटाणूमुक्त घर

* सोमा

‘स्वच्छ घरातच सुदृढ कुटुंब नांदते’ असे म्हटले जाते. हे बरोबरदेखील आहे. ऋतु कोणताही असो, प्रत्येकाने घर किटाणूमुक्त ठेवणे गरजेचे आहे. कारण याचा प्रभाव थेट आपल्या स्वास्थ्यावर पडतो. केवळ एखाद्या विशेष प्रसंगी नाही तर प्रत्येक दिवशी साफ-सफाई करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अनेक आजार जसे की श्वाससंबंधी, किटकांमुळे पसरणारे आजार, वायरल फ्लू इत्यादींपासून दूर राहू शकता.

जर घरात लहान मुले आणि वृद्ध असतील तर घर किटाणूरहीत असणे गरजेचे आहे.

मुंबईतील सॅरिनिटी पीसफुल लिव्हिंगचे डिझायनर आणि को फाऊंडर अमृत बोरकाकुटी सांगतात की जर्म फ्री घर असणे खूप गरजेचे आहे. कारण आजकाल अनेक प्रकारचे व्हायरल आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. ज्यामुळे अनेक प्रकारचे व्हायरल फ्लू होतात. यावर योग्यवेळी उपचार न झाल्यास ते जीवघेणे सिद्ध होऊ शकतात.

या काही टीप्सवर लक्ष द्या, ज्यामुळे तुम्ही किटाणूमुक्त घर ठेवू शकता :

* घराची नियमितपणे साफ सफाई करा. जेणेकरून घर पूर्णत: जर्म फ्री होईल. पुसणी किंवा डसटिंगसाठी अरोमा आणि युक्लिप्टस ऑइलचा वापर करा. यामुळे बॅक्टेरियाला निर्मितीची शक्यता उरणार नाही. तसेच यामुळे छोटे छोटे किडे नष्ट होतात.

* सफाई केल्यानंतर तो कपडा चांगल्या पद्धतीने साबणाने धुवून ऊन्हात वाळत घाला. यामुळे पुसणी किंवा डस्टिंग कापड साफ आणि दुर्गंध विरहित राहील.

* स्वंयंपाकघर आणि इतर खोल्यांसाठी वेगेवगळे डस्टिंगचे कापड ठेवा. यामुळे घर हायजिनिक राहील. पुसताना फ्लोर क्लिनर लिक्डिचा वापर नक्की करा. सर्वाधिक किटाणू हे जमिनीवरच आढळतात.

* किचन घरातील विशेष हिस्सा असतो. जिथे जंतू किटाणू सहजपणे प्रवेश करतात. वापरलेली भांडी वेळच्या वेळी धुवा. जर तुमची भांडी दुसऱ्या दिवशी कामवाली धुवत असेल तर सर्व भांडी डिर्टजंटच्या पाण्यात भिजवून ठेवा. अशा भांड्यांकडे किडे लवकर आकर्षित होतात.

* जिथे अधिक ओलावा असतो, तिथे बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर जंतू सहजपणे उद्भवतात आणि दुसऱ्या ठिकाणी पसरू लागतात. अशावेळी या जागेतून ओलावा दूर करण्यासाठी तो भाग धुवून झाल्यानंतर पंखा लावून ठेवा.

* चादरी आणि टॉवेल गरम पाण्यात आणि डिर्टजंटमध्ये नियमितपणे धुवा. जेणेकरून जर्म फ्री राहील.

* पडदे आणि पंख्यांची सफाई वॅक्युम क्लिरनने महिन्यातून एकदा तरी नक्की करा. बऱ्याचदा या ठिकाणी धूळ, माती सहजपणे जमते. मग किटाणू सहजपणे आकर्षित होतात.

* कोणत्याही भांड्यात किंवा डब्यात पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नका. यामुळे मच्छर आणि किटाणू उद्भवतात. १-२ दिवसात पाण्याचा उपयोग करून पुन्हा स्वच्छ पाणी भरा.

* जर घरात लहान मुले किंवा वृद्ध असतील तर जास्त काळजी घेणे आवश्यक असते, कारण कोणताही आजार त्यांना लवकर होतो. साफसफाईनंतर अरोमायुक्त कँडल किंवा अगरबत्ती नक्की लावा.

* बाथरूम आणि वॉश बेसिनची सफाई नियमितपणे करा. यासाठी ब्लीचच्या ऐवजी साबण आणि पाणी वापरणे योग्य राहील.

* टाईल्सची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही डिटर्जंट आणि पाण्याचा वापर करू शकता. जर कुठे अधिक मळ जमा झाला आसेल तर त्याला जुना ब्रश आणि साबणाच्या सहाय्याने घालून स्वच्छ करा.

* दरवाजे खिडक्या आठवड्यातून एकदा साबणाच्या पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून काढा. जेणेकरून त्यावर धुळ, माती चिकटू नये आणि किटाणू आकर्षित होऊ नयेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें