उन्हाळ्यात कशी असावीत अंतर्वस्त्रे

* पारुल भटनागर

उहाळयात विशेष करून थंडावा देणाऱ्या रंगांचे हवेशीर कपडे महिलांना आवडतात. त्यांच्यासाठी हा ऋतू स्वत:ला सुपर सेक्सी दाखवण्यासाठीचा असतो. अशावेळी बाह्य पोशाखासह आपली अंतर्वस्त्रेही इतकी सेक्सी असावीत की, त्यावर स्ट्रीप ड्रेस किंवा इतर कोणताही हॉट ड्रेस घातल्यानंतरचा आपला सुपर सेक्सी लुक लोकांना आकर्षित करणारा ठरावा, असे तुम्हाला वाटत नाही का?

उन्हाळयात स्टाईलसोबतच तुम्हाला आरामदायी वाटणेही गरजेचे असते अन्यथा ही फॅशन तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. चला, जाणून घेऊया की, उन्हाळयात तुमची अंतर्वस्त्रे कशी असायला हवीत :

कॉटन फॅब्रिक असते सर्वोत्तम

बाजारात तुम्हाला वेगवेगळया डिझाईन्स आणि वेगवेगळया फॅब्रिक्सची अंतर्वस्त्रे मिळतात. ती पाहून क्षणभर तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकता, पण त्यांचे फॅब्रिक कॉटनचे असेल, याकडे लक्ष द्या, कारण ओलावा शोषून घेण्याची क्षमता हे या फॅब्रिकचे वैशिष्टय असते.

या फॅब्रिकमुळे आरामदायी वाटते, शिवाय दिवसभर थंडावाही जाणवतो. या कपडयातील गारवा मिळवून देणारा गुण तुमच्या शरीरावर कुठलीही अॅलर्जी होऊ देत नाही. त्यामुळेच कॉटनची अंतर्वस्त्रे वापरा आणि स्वत:ला कूल ठेवा.

साईजकडे लक्ष द्या

ज्याप्रमाणे प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळया आकाराची अंतर्वस्त्रे लागतात. त्यामुळे तुमच्या शरीरयष्टीनुसारच अंतर्वस्त्रे निवडा. सुमारे ७० टक्के महिला चुकीच्या साईजची ब्रा निवडतात.

जास्त घट्ट ब्रा घातल्याने त्वचेवर लालसर व्रण उमटतात. अॅलर्जी होते, जी अत्यंत त्रासदायक असते. यामुळे रक्ताभिसरणावरही परिणाम होतो आणि हे आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते, तर सैल ब्रा घातल्याने कपांना योग्य आकार मिळत नाही, त्यामुळे ब्रेस्ट लटकत राहतात. साहजिकच तुमची फिगर खराब होते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही अंतर्वस्त्रे खरेदी कराल तेव्हा शरीराची साईज अर्थात आकार लक्षात ठेवा.

न्यूड शेडची निवड करा

जर तुम्ही उन्हाळयात न्यूड शेडची ब्रा निवडलीत तर तुम्हाला खूप आरामदायी वाटेल, कारण हे रंग तुम्हाला थंडावा मिळवून देतील आणि टॅनिंगपासूनही दूर ठेवतील. जर तुम्ही जास्त गडद रंगाची ब्रा घातली तर गरम झाल्यासारखे वाटेल. यामुळे तुमची त्वचा टॅन होण्याचीही भीती असते. तुम्हाला काळी ब्रा आणि पँटीज खूपच सेक्सी वाटत असतील, पण थंडावा मिळवण्यासाठी या उन्हाळयात तुम्ही न्यूड शेडच निवडा.

लवलेस ब्रा

या उन्हाळयात सेक्सी दिसण्यासाठी, लेस स्टाईल ब्रा वापरा, कारण ती तुम्ही लो कट टॉपसह, टँक टॉपवरही घालू शकता. यामुळे तुम्ही स्टायलिश दिसता, शिवाय ती तुमच्या ब्रेस्टसाठी आरामदायी ठरेल, अशाच प्रकारे शिवलेली असते. या घामाघूम करणाऱ्या दिवसांमध्ये ती तुमच्या त्वचेला गारवा मिळवून देण्याचे काम करते. त्यामुळे खऱ्याअर्थी ही ब्रा तुम्हाला स्टायलिश, सेक्सी आणि आरामदायी लुक मिळवून देईल.

स्ट्रेपलेस ब्रा निवडा

स्ट्रेपलेस ब्रा ही कुठल्याही हॉट ड्रेसच्या आत चांगली दिसते. यामुळे खांद्यांनाही मोकळेपणा मिळतो, आरामदायी वाटते. खांद्यांवर लालसर व्रण येत नाहीत किंवा जळजळही होत नाही, कारण जेव्हा जास्त वेळ ब्रा घातली जाते तेव्हा कप व्यवस्थित पकडण्यासाठी पट्टया वापरल्या जातात, ज्यामुळे खांद्यांवर थोडासा ताण येतो, पण यात असे काहीच नसते.

टीशर्ट ब्रा ठरते सर्वोत्तम

टीशर्ट ब्रा उन्हाळयात सर्वोत्तम ठरते, कारण ती अतिशय पातळ फॅब्रिकपासून बनवलेली असते, शिवाय वायर फ्रीही असते. यामुळे, तुम्ही कुठलाही त्रास किंवा अस्वस्थतेशिवाय ती दिवसभर घालू शकता. उन्हाळयात ज्यांना जास्त घाम येतो अशा महिलांसाठी टीशर्ट ब्रा उत्तम ठरते.

पँटीज असतात अधिक आरामदायक

उन्हाळयात पँटीज खरेदी करताना थोडासाही निष्काळजीपणा बरा नाही,      कारण हा भाग अतिशय संवेदनशील असतो आणि या भागावर जास्त घाम येत असल्याने त्वचा सोलपटून लाल होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही पँटी खरेदी कराल तेव्हा लक्षात ठेवा की, ती नैसर्गिक फॅब्रिकची म्हणजे कॉटनची असावी आणि त्यावर कोणतीही वजनदार नक्षी नसावी, कारण यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें