अजून चांगले काम करू इच्छिते -तृप्ती तोरडमल

* सोमा घोष

मराठी चित्रपट आणि नाटक ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटामुळे चर्चेत आलेली निर्माता व मराठी अभिनेत्री तृप्ती तोरडमल मुंबईची आहे. तिचे वडील मधुकर तोडरमलसुद्धा प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक होते. लहानपणापासूनच तृप्तीला कलेचे वातावरण मिळाले आणि आज या यशाचे श्रेय ती आपल्या आईवडिलांना देते, ज्यांनी नेहमीच तिला प्रत्येक कामात सहयोग देण्याशिवाय स्वातंत्र्यसुद्धा दिले आहे. तृप्ती आपल्या या यशस्वी जीवनामुळे खूप खुश आहे आणि तिने हे सगळे शेअर केले आहे गृहशोभिकेशी. सादर आहे काही भाग.

या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझे वडील मराठी इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने लहानपणापासून मला हे वातावरण मिळाले. ते या इंडस्ट्रीचे आद्य कलाकार मानले जात होते. त्यामुळे इतर कशाचा विचार करणे संभवच नव्हते. याशिवाय जॉन अब्राहम माझा चांगला मित्र आहे आणि त्याला एक मराठी चित्रपट बनवायचा होता, ज्यात त्याने मला निर्माता बनण्यासोबतच अभिनय करायला सांगितले आणि मी केले. हा चित्रपट ‘सविता दामोदर परांजपे’ होता आणि इथूनच माझी अभिनय सफर सुरु झली. यानंतर मी अनेक मराठी चित्रपट केले आहेत.

लहानपणापासून कलेचे वातावरण असूनही तू अभिनयासाठी एखादे प्रशिक्षण घेतले आहे का?

अभिनय माझ्या रक्तात आहे. माझ्यात अभिनयाचं पॅशन आहे, जे मला माझ्या वडिलांकडून मिळालं आहे. मी कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलं नाहीए. सविताची भूमिका करण्यासाठी मी दिग्दर्शकाचा आधार घेतला. प्रत्यक्षात हे रीमा लागूंचे एक नाटक होते, जे मला खूप आवडायचे. यात माझी भूमिका स्प्लिट पर्सनॅलिटीची होती. ही एक खरी गोष्ट होती. यावरच मी चित्रपट बनवायचा विचार केला. यासाठी मी स्वत: खूप प्रशिक्षण घेतले, कारण मला यात दोन भूमिका करायच्या होत्या. आवाजावरसुद्धा मला खूप काम करावे लागत होते. मी याचे राईट्स घेतले होते. मेहनत खूप करावी लागणार होती. ६ महिने मी बाहेर पडले नव्हते. हा एक थ्रिलर चित्रपट होता. निरनिराळ्या आवाजांवर खूप मेहनत घेतली. लेखकाने यात मला खूप मदत केली .सौम्य व्यक्तिरेखा सोपी होती आणि मी तशीच आहे. या व्यक्तिरेखेशी माझे नाते जुळले होते.

गंभीर भूमिकेतून बाहेर पडणे कितपत कठिण असते?

खूपच कठीण असते. भावनात्मक नाते जास्त असते. पण त्यातून बाहेर पडावेच लागते आणि आता हे मी शिकून घेतले आहे.

तुझी सफर कशी होती?

मी माझ्या व्यक्तिरेखांबाबत अतिशय चुझी आहे, कारण पहिल्याच चित्रपटात मी प्रमुख भूमिका साकारली आणि अनेक पुरस्कार मिळाले. प्रेक्षकांनासुद्धा हे आवडले. यानंतर मी खूप चित्रपट नाकारलेसुद्धा. मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडते. मराठी चित्रपट ‘फत्ते शिकस्त’ मध्ये मी एका योध्द्याची भूमिका केली आहे, जी खूप आव्हानात्मक होती. यासाठी मी घोडेस्वारी आणि तलवार चालवायला शिकले. यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले. याशिवाय सोहेल खान सोबत एका हिंदी वेब शोमध्ये मी काम करत आहे. त्यात माझी प्रमुख भूमिका आहे. शिवाय ‘जंग जौहर’मध्येही मी अभिनय करणार आहे.

या क्षेत्रात व्हानात्मक काय हे असे वाटते?
एका कलाकाराला नेहमीच चांगले काम करायची इच्छा असते. एखाद्या भूमिकेला नकार देणे होकार देण्याहून सोपे असते. होकार दिल्यावर त्या चित्रपटासोबत प्रवास सुरु होतो, अशावेळी तुमच्यासमोर आधीच्या चित्रपटापेक्षा चांगले काम करण्याचे आव्हान असते. पुरस्कार मिळाले की अपेक्षा जास्त असतात. ही स्पर्धा स्वत:शी असते. ही सतत आतमध्ये चालूच असते आणि हीच मानसिकता त्या कलाकाराला पुढे घेऊन जात असते. जर कोणाला असे वाटले की तो परिपूर्ण आहे तर त्याची वाढ खुंटते. मी खूप कष्टाळू आहे. सोशल मिडियामध्ये मला अजिबात रुची नाही. व्यक्तिगत आयुष्य शेअर करणे मला आवडत नाही. मी एक खाजगी व्यक्ती आहे आणि अभिनयाला मी माझा जॉब समजते.

वडिलांची शिकवण तू प्रत्यक्षात कशी उतरवतेस?

माझे आईबाबा दोघेही आता या जगात नाहीत. माझा पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच वडिलांची तब्येत ठिक नव्हती, पण त्यांनी रिलीज होण्याआधी तो चित्रपट बघितला आणि मला आशीर्वाद दिले होते, ज्याचे फळ मला आज मिळत आहे. आईने माझा थोडा प्रवास बघितला आहे. एका वर्षानंतर तिचाही मृत्यू झाला. मी नेहमी त्यांच्या आदर्शांचे पालन करते.

निर्माता आणि अभिनेत्री यात काय जास्त आवडते?

मला अभिनय करायला आवडते, कारण यात फार विचार करावा लागत नाही आणि रात्री तुम्ही निवांत झोपू शकता, याउलट निर्माता बनल्यावर तुम्हाला चित्रपटाची सगळी जबाबदारी घ्यावी लागते आणि हे एका मुलाचे पालन पोषण करण्यासारखे असते.

एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे का?

मला संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करायचे आहे. ते खूप छान काम करतात. मला ताराराणीची भूमिका करायची आहे, जी एक योद्धा होती. शिवाय एखाद्या लिजेंड्री अभिनेत्रीची भूमिका करायची आहे.

किती फूडी आहेस आणि फॅशन करायला कितपत आवडतं?

मला सगळ्या प्रकारचे पदार्थ आवडतात. मी सगळे खाते. कोणत्याही प्रकारचे डाएटिंग करत नाही. मी सगळ्याप्रकारचे जेवण बनवू शकते. फॅशनमध्ये मला ब्रँडेड आणि क्लासी कपडे जास्त आवडतात. निवेदिता साबू आणि मनीष मल्होत्रा यांचे कपडे मी जास्त वापरते.

गृहशोभिका’ मार्फत तू काय संदेश देऊ इच्छितेस?

महिलांचा आदर करायला शिका. त्यांचा अपमान करणे बंद करा.

आवडता रंग – पांढरा

वेशभूषा – जुनी भारतीय आणि वेस्टर्न दोन्ही.

आवडते पुस्तक – सायलेंट मोन्यूमेंट

फावल्या वेळात – जुन्या विषयावरील चित्रपट बघणे.

नकारात्मक भाव दूर करण्याचा उपाय – सकारात्मक विचार स्वत:त रुजवणे.

आवडते पर्यटन स्थळ – विदेशात दुबई, लंडन आणि मिलान, भारतात कुलू मनाली.

आवडता परफ्युम – शेनेल नंबर ५

जीवनातील आदर्श – प्रामाणिकपणा आणि मेहनत.

एखादे सामाजिक काम – जेष्ठ आणि पार्किन्सन रुग्णांसाठी काम करणे, ज्यांना मुलं सोडून जातात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें