ट्रेंडी ज्वेलरीने मिळवा नवा लूक

* तोषिनी राठौड

कपडयांच्या फॅशनप्रमाणे ज्वेलरी ट्रेंडही सातत्याने बदलत असतो. पण काही ज्वेलरी अशी असते, तिची क्रेझ सतत टिकून असते. यात झुमक्यापासून ते नव्या डिझाइन्सचे चोकर, नेकपीस, बिंदी, विविध प्रकारचे कडे इत्यादी महिलांमध्ये प्रचलित आहेत. चला पाहूया, सध्या कोणती ज्वेलरी फॅशनमध्ये इन आहे.

ऑक्सिडाइज ज्वेलरी

आजकाल स्त्रिया सगळीकडे ऑक्सिडाइज ज्वेलरी घालताना दिसतात. पण या ज्वेलरीला एका वेगळया रुपात सादर केलं जातं. जसं की ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये बनवले जाणारे पेंडेंट आणि इतर छोटे छोटे डिझाइन्स मणी हे लोकरीच्या धाग्यांमध्ये ओवले जातात. याव्यतिरिक्त ऑक्सिडाइज सिल्व्हरने बनलेले कडे, हस्तीदंतापासून बनलेल्या कडे आणि मोत्यांच्या ज्वेलरीसोबत वापरले जातात. जे राजस्थानी लुक देतात. तसेच ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबत एअर कफचाही ट्रेंड शीखरावर आहे. ज्यामुळे तुमचं सौंदर्य खुलून दिसेल.

कडे

तुमचा लुक अधिक खुलवण्यासाठी हातामध्ये घातलेल्या कडयांची महत्त्वाची भूमिका असते. हे कडे सर्वांनाच आकर्षित करतात. या सीझनमध्ये इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी तुम्ही असे कडे निवडा, ज्यामुळे तुमचे सौंदर्य उठून दिसेल. आजकाल गोंडे, मोती, रेशीम, लोकर लावलेले कडे ट्रेंडमध्ये आहेत. तसेच ट्रायबल डिझाइन्ससह ऑक्सिडाइज कडे तुमच्या हातावर छान दिसतील. तुम्ही गोल्डनसह सिल्व्हर कडयांचं कॉम्बिनेशन करून ड्रेसनुसार घालू शकता.

वुलन ज्वेलरी

आजकाल वुलन ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड सुरु आहे. ही ज्वेलरी सामान्यपणे हाताने बनवली जाते. यात डिझाइनर पॅचवर हातांनी मोत्यांचं काम केलं जातं. यासह वुलनचे गोंडे, लटकन लावले जातात. याची सुंदरता काही औरच आहे.

वेस्ट बेल्ट

वेस्ट बेल्ट अशी ज्वेलरी आहे, जी तुम्हाला स्टाइलिश लुक मिळवून देते. बाजारात अनेक प्रकारचे वेस्ट बेल्ट उपलब्ध आहेत. यात ऑक्सिडाईज सिल्वरसह वुलन बेल्ट, मिरर वर्क बेल्ट इत्यादी तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार घालू शकता, ज्यामुळे तुमचा ड्रेस अधिक आकर्षक दिसेल.

कंठा ज्वेलरी

कंठा ज्वेलरीची फॅशन खूप वर्षांपूर्वी होती. पण यंदा याच स्टाइलला वेगळया पद्धतीने सादर केलं जात आहे. कंठा ज्वेलरीमध्ये मेटलने बनलेल्या मोत्यांचा वापर केला जातो, जे लोकरीच्या धाग्यात ओवले जातात आणि पेंडेंटसोबत सजवले जातात.

डँग्लर्स अँड ड्रॉप्स

सिनेक्षेत्रात चलती असलेल्या या कानातल्यांचा ट्रेंड सर्वच ठिकाणी दिसून येतो. विशेषत: या ज्वेलरीत चंद्राच्या आकाराचे झुमके ट्रेंडमध्ये आहेत, जे आकारांत मोठे असतात. यामुळे कानांचं सौंदर्य वाढतं. हे कानातले घालून तुम्हालादेखील स्टार असल्यासारखं वाटेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें