– प्रतिनिधी
शरत कटारिया दिग्दर्शित ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात आयुष्मान खुराणाचे भूमी पेडणेकरसोबत लग्न होते, पण पतीसाठी पत्नीच्या शारीरिक सौंदर्यालाचा महत्त्व दिले जाते. लठ्ठ आणि कमी सुंदर असल्यामुळे तो तिच्यावर प्रेम करू शकत नाही.
कोणी कितीही गोरी असली तरी बांधा सुडौल नसेल तर ती आपली जादू पसरवू शकत नाही. अमेरिकेच्या ब्रेब्रास्का लिंकन विद्यापीठाने २४ महिलांचा अभ्यास केला. त्यात असे आढळून आले की, महिलांनी इतर महिलांकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्याऐवजी त्यांचे नितंब आणि स्तनांकडे जास्त वेळ पाहिले आणि ते किती आकर्षक आहेत याचा अंदाज घेतला.
कंबरेखाली, पोटाजवळ, नितंबांच्या आजूबाजूला चरबी जमा झाल्यामुळे लठ्ठपणा दिसू लागला तर ते वाईट दिसते. काही मुलींमध्ये नितंबांच्या सभोवतालची चरबी अनुवांशिक कारणांमुळे असते तर काहींमध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा येतो. लग्नानंतरही पती पत्नीच्या बेडौल बांध्याबद्दल टोमणे मारतात.
जर नितंब मोठे आणि बेडौल असतील आणि तेथे भरपूर चरबी जमा झाली असेल तर त्यामुळे मुलीचा आत्मविश्वास कमी होतो. आता कॉस्मेटिक सर्जरीद्वारे तुमचा बांधा सेक्सी आणि आकर्षक बनवून तुम्ही तुमच्या जोडीदाराला पहिल्या रात्री प्रभावित करू शकता.
जळलेल्याचे व्रण काढून टाकण्यासाठी, नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी, चेहऱ्याला उभारी देण्यासाठी, नितंबांना सेक्सी बनवण्यासाठी कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी ही एक साधी आणि सुरक्षित उपचार पद्धती आहे. यामुळे सर्व काही करणे शक्य आहे. यामुळे केवळ चेहऱ्याचेच नाही तर शरीराच्या प्रत्येक भागाचे सौंदर्य वाढवता येते.
अपोलो रुग्णालयाच्या कॉस्मेटिक विभागाचे वरिष्ठ सल्लागार सांगतात की, आज प्रत्येक मुलीला प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोणसारखा बांधा हवा असतो. मुलांना मल्लिका शेरावत, शर्लिन चोप्रासारखी हॉट बांधा असलेली जोडीदार हवी असते.
गेल्या काही वर्षांत मोटॉक्स काढणे, लिपोसक्शन, ब्रेस्ट इम्प्लांट, संपूर्ण शरीराची लेझर ट्रीटमेंट, ओठ किंवा नाकाचा आकार बदलणे तसेच केसांचे प्रत्यारोपण करणाऱ्या मुलींची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.
चेहरा कितीही सुंदर असला तरी जर नितंब सपाट असतील तर मुलांच्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पडते की, मुलगी सुंदर आहे, पण हॉट नाही.
कॉस्मेटिक सर्जरीमुळे मिळेल परिपूर्ण बांधा
कॉस्मेटिक सर्जरी हे आधुनिक तंत्र आहे. त्याद्वारे नितंबाजवळील चरबी लिपोसक्शनने काढून टाकली जाते. डाग, सैल त्वचा आणि गोठलेली चरबी काढून टाकून नितंबाला एक परिपूर्ण आकार दिला जातो. इतकेच नाही तर नितंब सपाट असल्यामुळे तुम्हाला इच्छा असूनही स्वत:ला सेक्सी दाखवता येत नसेल, तर ते इम्प्लॉटच्या माध्यमातून उठवले जातात.
कशी केली जाते नितंबाची शस्त्रक्रिया?
दिल्लीतील साकेत सिटी रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी सल्लागार डॉ. रोहित नैयर सांगतात की, सध्या लिपोसक्शन आणि हिप इम्प्लांट या नितंब शस्त्रक्रियेच्या दोन मुख्य पद्धती आहेत, ज्याद्वारे नितंबांना आकार दिला जातो.
लिपोसक्शन तंत्रज्ञानामुळे चरबीच्या पेशी कायमस्वरूपी काढून टाकल्या जातात आणि शरीराला सुडौल आकार दिला जातो. नितंब, मांडयांभोवतीची चरबीही लिपोसक्शनने काढून टाकली जाते. या उपचारात सक्शन मशिन कॅट्युलासोबत जोडली जाते. ज्या ठिकाणी चरबी काढायची आहे त्या ठिकाणी लहान छिद्रे केली जातात. या छिद्रांच्या मदतीने त्वचा आणि स्नायूतील अतिरिक्त चरबी बाहेर काढली जाते.
कॅन्युलाचा आकार चरबीच्या प्रमाणानुसार वाढविला जाऊ शकतो. यामध्ये, शरीरात प्रवेश करण्यासाठी सर्वात आधी एक छेद केला जातो आणि तो एअर सक्शन उपकरणाशी जोडला जातो. लिपोसक्शनचे परिणाम ४ ते ६ महिन्यांनंतर दिसून येतात, जेव्हा सूज निघून जाते. तोपर्यंत रुग्णाला घट्ट किंवा दाबाचे कपडे घालावे लागतात. नितंब शस्त्रक्रियेत लिपोसक्शनमध्ये फक्त १ ते २ लिटर चरबी काढून टाकली जाते. लिपोसक्शनचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
लिपोसक्शन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करावे लागते आणि व्यायाम इत्यादीद्वारे कॅलरीजचा वापर वाढवावा लागतो. जीवनशैली बदलली नाही तर चांगले परिणाम मिळू शकत नाहीत.
म्हणून, ही समस्या कमी करण्यासाठी आणि नितंबांना आकार देण्यासाठीही सिलिकॉन आयलेट्सही वापरली जातात. एक लहान चीरा बनविला जातो आणि तो नितंबाच्या स्नायूच्या खाली किंवा वर घातला जातो.
खर्च : सहसा ही संपूर्ण शस्त्रक्रिया रू. ५० हजार ते रू. ७५ हजार रुप्यांदरम्यान होते.
किती वेळ लागतो : शस्त्रक्रियेला साधारणत: २ ते ३ तास लागतात. कधीकधी जास्त वेळ लागतो. तो शरीरात किती चरबी साठते यावर अवलंबून असतो. सर्व प्रकारच्या शस्त्रक्त्रिया, मग त्या पोट, डोळयाच्या असोत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, किंचित वेदना होतात, त्याचप्रमाणे प्लास्टिक सर्जरीमध्येही थोडासा त्रास होतो. नसा शांत करून शस्त्रक्रिया केली जाते, परंतु यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नाही. ती पूर्णपणे सुरक्षित असते.
कोण करू शकते शस्त्रक्रिया : १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही निरोगी व्यक्ती ही शस्त्रक्त्रिया करू शकते. लहान वयात उपचार घेतल्याने योग्य परिणाम मिळत नाहीत, कारण त्यावेळी शरीराचा विकास होत असतो. ते दिसायला अगदी नैसर्गिक नितंबांसारखेच दिसतात. प्लास्टिक सर्जरी केली आहे, हे कळतही नाही. शस्त्रक्रिया केलेली व्यक्ती पूर्वीपेक्षा जास्त कामुक आणि हॉट दिसते.
बरं व्हायला लागतो किती वेळ : नितंबांच्या शस्त्रक्रियेनंतर काही चट्टे तयार होतात जे हळूहळू बरे होतात. डाग पहिल्या काही महिन्यांत थोडे लाल आणि सुजलेले दिसतात, पण काही महिन्यांनंतर बरे होतात. ही महिन्याभरात पूर्ण होणारी शस्त्रक्रिया नाही, त्यामुळे जर तुमचे नितंब जाड असतील आणि तुम्ही कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा विचार करत असाल तर लवकर नियोजन करा, जेणेकरून तुमची शस्त्रक्रिया वेळेत होईल आणि लग्नानंतर तुम्ही तुमचा सुडौल बांधा दाखवून पतीला घायाळ करू शकाल.
कोणत्या प्रकारची समस्या उद्भवू शकते : जरी प्लास्टिक सर्जरी खूप विश्वासार्ह असली आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे कोणतीही विशेष समस्या उद्भवत नसली तरीही काही समस्या आढळून येतात जसे की, रक्तस्त्राव, संसर्ग, संवेदनशीलता, जखम लवकर बरी न होणे, अॅलर्जी, द्रव जमा होणे, नसांमध्ये योग्य प्रकारे रक्ताभिसरण न होणे, लाल चट्टे येणे, त्वचा सोलवटली जाणे. यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही. दिलेल्या औषधांनी या समस्या दूर होऊ शकतात.
फक्त अनुभवी शल्यविशारदाकडूनच करून घ्या : नितंब शस्त्रक्रियेदरम्यान केलेल्या लहानशा निष्काळजीपणामुळेही मोठे नुकसान होऊ शकते. जेव्हा तुम्हाला शस्त्रक्रिया करायची असते तेव्हा तत्पुर्वी संपूर्ण माहिती घ्या. ज्या रुग्णांनी आधीच त्याचा लाभ घेतला आहे त्यांच्याशी बोला. उपचाराचा खर्च आणि वेळ याबद्दल त्यांचे अनुभव जाणून घ्या. हे तंत्र तुमच्यावर कितपत प्रभावी ठरेल तसेच उपचार करण्यापूर्वी आणि नंतर कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
केवळ महिलाच नाही तर पुरुषही करू शकतात शस्त्रक्रिया : अशा प्रकारची शस्त्रक्रिया केवळ महिलाच करू शकतात असे अजिबात नाही, तर पुरुषही कॉस्मेटिक सर्जरीच्या मदतीने आपले शरीर सुडौल करू शकतात. महिलांप्रमाणे त्यांच्या शरीराच्या खालच्या भागावर चरबी जमा होत नाही, तर वरच्या भागावर स्तनांजवळ फुगवटा असतो, जो वाईट दिसतो. त्यामुळे कॉस्मेटिक सर्जरीने तुमच्या शरीराला परिपूर्ण आकार द्या.
तुमच्या जोडीदाराला संतुष्ट करा : तुमच्या मनात हा विचार नक्कीच आला असेल की, शस्त्रक्रिया केल्याने तुमच्या लैंगिक जीवनावर तर परिणाम होणार नाही ना? आणि तुम्ही शस्त्रक्रिया केल्याचे समजल्यानंतर तुमचा जोडीदार चुकीचा समज करून घेणार नाही ना? मुळीच घाबरू नका. अशा गोष्टी मनातून काढून टाका, कारण नितंबांच्या शस्त्रक्रियेने तुम्ही तुमचे बेडौल शरीर सुडौल बनवू शकता.
बॉलिवूडमध्ये शर्लिन चोप्राने स्वत:ला हॉट आणि सेक्सी बनवण्यासाठी दोनदा नितंबांची शस्त्रक्रिया करून घेतली. बट इम्प्लांटमध्ये शिल्पा शेट्टीचेही नाव येते. बट इम्प्लांट हे तिच्या सेक्सी बांध्याचे रहस्य आहे.