आरोग्यास अपायकारक टाइट जीन्स

– एनी अंकिता

अलीकडे मुलींना टाइट आणि स्किनी जीन्स घालणं आवडतं, मग त्यांना हे घालून कम्फर्टेबल वाटत असो वा नसो, पण त्या कॅरी करतात. खरं तर त्यांना वाटतं की हे घातल्याने त्यांची फिगर सेक्सी वाटेल आणि सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित होईल. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की टाइट जीन्स तुम्हाला आजारी पाडत आहे? यामुळे तुम्ही इस्पितळातही पोहोचू शकता?

ऑस्ट्रेलिया येथील ऐडिलेड शहरात एका मुलीसोबत काहीसं असंच घडलं आहे. स्टायलिश आणि सेक्सी दिसण्यासाठी मुलीने टाइट जीन्स घातली तर खरी, पण या टाइट जीन्सने तिला चक्क इस्पितळात पोहोचवलं. तिथे कळलं की तिच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह थांबला आहे. मुलीची अवस्था इतकी वाईट झाली होती की ती आपल्या पायांवर व्यवस्थित उभीदेखील राहू शकत नव्हती. तिला लोकांची मदत घ्यावी लागली.

फॅशनसोबत स्वत:ला अपडेट ठेवणं चांगली गोष्ट आहे, पण यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं नाही. टाइट जीन्स फिगरला सेक्सी लुक देत असली तरी अपायकारक असते. याच्यामुळे अनेक प्रकारचे हेल्द प्रॉब्लेम्स उद्भवतात, ज्याकडे मुली लक्ष देत नाहीत.

बेशुद्ध पडणं

कायम टाइट फिटिंगचे कपडे घातल्याने दम कोंडू लागतो, ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.

पाठदुखी

आजच्या काळात आपल्यापैकी अनेक मुलींना लो वेस्ट जीन्स घालणं आवडतं. टाइट आणि लो वेस्ट जीन्स पाठीच्या स्नायूंना कम्प्रेस आणि हिल बोनच्या मूव्हमेंटमध्ये अडथळा आणतात. त्यामुळे स्पाइन आणि पाठीवर ताण पडतो आणि वेदनेची समस्या उत्पन्न होते.

पोटदुखी

जेव्हा घट्ट कपडे घातले जातात तेव्हा कपडा पोटाला चिकटतो. त्यामुळे पोटावर ताण पडतो आणि पोटदुखी होऊ लागते. इतकंच नव्हे, तर टाइट जीन्समुळे पचनक्रियादेखील असंतुलित होते, ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास उत्पन होतो.

अंगदुखी

टाइट जीन्स थाइजच्या नर्व्सला कंप्रेस करते, ज्यामुळे झिणझिण्या आणि जळजळ जाणवते. यामुळे डोकेदुखी, अंगदुखी यांसारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. इतकंच नव्हे तर, टाइट जीन्स घातल्याने बसायला उठायलाही समस्या होते आणि बॉडीचा पोस्चर बिघडू लागतो.

थकवा जाणवणं

जेव्हा टाइट जीन्स घातली जाते तेव्हा खूप लवकर थकवा येतो, ज्याचा आपल्या कामावरही प्रभाव पडतो. तेव्हा आपण विचार करतो की जर ऑफिसातही नाइट डे्रस घालायचं स्वातंत्र्य असतं तर? म्हणून तुम्हालाही जर असं वाटत असेल तर काही दिवस सैल कपडे घालून बघा. तुम्हाला स्वत:मध्ये फरक दिसून येईल.

यीस्ट इन्फेक्शन

ही समस्या त्या ठिकाणी जास्त दिसून येते, जिथे जास्त घाम येतो. टाइट जीन्स घातल्याने शरीराला हवा लागत नाही, ज्यामुळे शरीरात यीस्टचं प्रोडक्शन वाढतं. यामध्ये खाज, जळजळ आणि वेदना होते. याकडे दुर्लक्ष करणं भयंकर ठरू शकतं.

फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका

टाइट जीन्समुळे फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठतं आणि रॅशेज येतात.

जीन्सव्यतिरिक्तही अनेक आउटफिट आहेत

केवळ टाइट आणि स्किनी जीन्स आपल्याला आजारी करत नाहीत, तर इतरही असे अनेक कपडे आहेत ज्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांच्यापैकी एक आहे शेपवियर. शेपवियर शरीरावरील अधिक फॅट लपवून आपल्याला स्लिम दाखवत असलं तरी याचा आपल्या शरीराच्या अवयवांवर वाईट प्रभाव पडतो. शेपवियरव्यतिरिक्त टाइट ब्रा, पॅण्टी, फिटिंग टीशर्ट, टाइट बेल्ट, आणि हाय हीलचाही वाईट प्रभाव पडतो.

टाइट जीन्स घालणं का आवडतं

* मुलींना वाटतं की त्या टाइट आणि फिटिंग कपड्यांमध्येच सेक्सी दिसू शकतात.

* मुलांचं लक्ष वेधण्यासाठी.

* बोल्ड आणि कॉन्फिडेंट दिसण्यासाठी.

* अपडेट आणि स्टायलिश दिसण्यासाठी.

* मुली आपल्या मैत्रिणींना जळवण्यासाठीदेखील टाइट जीन्स घालणं पसंत करतात.

* काही मुली फक्त दुसऱ्यांचं बघून टाइट जीन्स घालतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें