मान्सून स्पेशल : वडा पाव

पाककृती सहकार्य : सेलिब्रेटी शेफ रणवीर ब्ररार

साहित्य

* ७-८ लसूण पाकळया

* ४-५ हिरव्या मिरच्या

* ३-४ उकडलेले बटाटे

* पाव कप तेल

* १ मोठा चमचा राई

* पाव छोटा चमचा हिंग

* कडीपत्ता

* पाव छोटा चमचा हळद पावडर

* चिरलेली कोथिंबीर थोडीशी

* मीठ चवीनुसार.

बेटरसाठी साहित्य

*  १ कप बेसन

* अर्धा छोटा चमचा हळद पावडर

* पाव छोटा चमचा लाल मिरची पावडर

* मीठ चवीनुसार.

तळणीच्या मिरचीचं साहित्य

* ५-६ मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या

* तळण्यासाठी तेल.

वडापाव छाटणीचं साहित्य

*२ मोठे चमचे तेल

* अर्धा कप शेंगदाणे

* ४-५ लसूण पाकळया

* अर्धा कप तळलेले बेसन चुरा

* ३ मोठे चमचे लाल मिरची पावडर

* तळण्यासाठी तेल द्य  मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये राई, हिंग, कडीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि बटाटयाच्या फोडी टाकून एकत्रित करून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित एकत्रित करून एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवा.

बॅटरसाठी कृती

एका बाउलमध्ये भाजलेले बेसन, हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि गरजेपुरतं पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.

वडापावची कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची व लसूण टाकून व्यवस्थित फ्राय करा. नंतर एक पॅन गरम करून त्यामध्ये तेल, शेंगदाणे, लसूण, तळलेल्या बेसनचा चुरा, लाल मिरची पावडर व मीठ टाकून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. नंतर बटाटयाच्या सारनाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते बेसनच्या बॅटरमध्ये घोळवून घ्या आणि गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. तळलेली मिरची आणि शेंगदाणा चटणीसोबत सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें